मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - अनूरक्त वीरक्त माया प्रपं...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


अनूरक्त वीरक्त माया प्रपंची । गुरूभक्त तो शक्त दृश्या विसंची ।
क्षमासील वेची देहे ऊपकारीं । जनीं तो चि तो शिष्य ज्ञानाधिकारी ॥१॥
मनीं आवडे तो गुरुराज कैसा । बहू प्रीय प्राणाहुनी देव जैसा ।
गुरु ब्रह्म भावी मनीं निर्विकारी । जनीं तो चि तो शिष्य ज्ञानाधिकारी ॥२॥
देहे पुत्र दारा गुरुलगि वेची । वृक्षा सर्वथा काळ तो ही न वेची ।
बळें साधुचीं लक्षणें अंगिकारी । जनीं तो चि तो शिष्य ज्ञानाधिकारी ॥३॥
गुरूला न वंची१ न संची पदार्था । विसंचीत संचीत अध्यात्मग्रंथा ।
दयाळू दिनाचा दिना अंगिकारी । जनीं तो चि तो शिष्य ज्ञानाधिकारी ॥४॥
गुरुदास जे दास्य त्यांचें करीतो । कदा गूणदेषा मनीं नातळे तो ।
विदेही जसा जन्नकू मोक्षकारी । जनीं तो चि तो शिष्य ज्ञानाधिकारी ॥५॥
नसे गोडग्रासी नसे सूखवासी । जसे दत्त गोरक्ष वैराग्यवासी ।
तया दर्शनें सर्व कल्याणकारी । जनीं तो चि तो शिष्य ज्ञानाधिकारी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP