स्फुट श्लोक - गुरूसी करी तोंडपीटी विकार...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
गुरूसी करी तोंडपीटी विकारी । पुन्हा दावितो भाव नाना प्रकारीं ।
भृकूटी कुटीळा विलोकी मकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥१॥
समस्तांमध्ये मी च श्रेष्ठाधिकारी । अनाथें दिनातें कुशब्दें धिकारी ।
टवाळी टवाळी करी तो विकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥२॥
आम्ही शिष्य तों चालताहे प्रतिष्ठा । आम्हां वेगळे मानिती कोण श्रेष्ठा ।
आम्ही पद्महस्ती गुरु तो भिकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥३॥
बहू मान्यतेकारणें तळमळीतो । जसा ग्राम गर्भीं रसें जळमळीतो ।
देहेबुद्धीनें ताडिला षड् विकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥४॥
जनीं सज्जनीं तेम गुरुदास्य केलें । गुरूचे कृपें सर्व कल्याण जालें ।
असें जाणतो सांगतो स्पोटकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP