मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - जगन्नायकें अन्न निर्माण क...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


जगन्नायकें अन्न निर्माण केलें । जिवा मानवालगि भोक्तृत्व जालें ।
तया दातयाचे मना प्रेम तोषे । वदे आदरें नाम घोषें विशेषे ॥१॥
मखीं ग्रासग्रासीं हरी आठवावा । जिवींचा जिव्हाळा जिवीम सांठवावा ।
ऋषीं अंबरीष धृवादीक घ्याती । इती ते किती तुंबरादीक गाती ॥२॥
कवी व्यास वाल्मीक वाणी पुराणी । बहू आवडी वर्णिला चक्रपाणी ।
इशानी स्मशानीं जपे शूळपाणी । मना सूमना तूं स्मरे च्यापपाणी ॥३॥
मना राम तो धाम कैवल्यदाता । तयाचे दरी ऊदरी तो विधाता ।
विधीसूत गातो हरीचीं चरित्रें । तळी तो बळी शेष वर्णी विचित्रें ॥४॥
अनूरक्त वीरक्त ते भक्त तारी । महा दुष्ट आरिष्ट वारी निवारी ।
मना१ सुंदरा इंदिराकांत ध्यायी । त्यजी कामना पूर्ण कल्याण गाई ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP