स्फुट श्लोक - स्थळ येरमाळें येडेस्वरीचे...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
स्थळ येरमाळें येडेस्वरीचें । वसताति साधू मोक्षश्रियेचे ।
पानीय पानार्थ सन्नीध गुंफा । जन्मांतरींचा उगऊनि गुंफा ॥१॥
हे धर्मशाळा जनपावनची । रमणीय छाया रंभावनाची ।
जाली च वस्ती जगजीवनाची । आखंड आर्ती वृंदावनाची ॥२॥
जाली च नवमी रघुनाथजीची । गेली दिगांताप्रति कीर्ति ज्याची३ ।
ते संत साधू श्रवणें चि पुष्टी । संतर्पणें ब्राह्मण लोक तुष्टी ॥३॥
अखंड यात्रा अगणीत पर्वें । नि: काम बुद्धी करिती अपूर्वें ।
अध्यात्म श्रवणें जो बद्ध तारी । मननें१ चि ध्यासें जना उतारी ॥४॥
रमापतीची रमणीय कीर्ती । अखंड गाती ते धन्य मूर्ती ।
विश्रांति मोठी तपोधनाला । कल्याण जननी ।जनार्दनाला ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP