मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
ऋणमोक्षाविषयीं मुहूर्त

तृतीयपरिच्छेद - ऋणमोक्षाविषयीं मुहूर्त

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां ऋणमोक्षाविषयीं मुहूर्त सांगतो -
अथ ऋणमोक्षः श्रीधरः वागीशमंददिवसांशकलग्नयुक्तेरिक्तासुमंददिवसेकुलिकोदयेच मैत्रद्वितीयपदमैत्रमुहूर्तयुक्तेराश्युद्गमेचऋणमोक्षमुशंतिसंतः अथराजमुद्रा मृदुध्रुवक्षिप्रचरेषुभेषुयोगेप्रशस्तेशनि चंद्रवर्ज्ये वारेतिथौपूर्णजयाह्वयेचमुद्राप्रतिष्ठाशुभदाहिराज्ञाम् अथनौः चंडेश्वरः पौष्णाश्विनीतुरगवारुणमित्रचित्राशीतोष्णरश्मिवसवोनलवंत्यमूनि वारेचजीवभृगुनंदनकेप्रशस्तनौकादिसंघटनवाहनमेषुकुर्यात्‍ अथभोगः गुरुभरविभानुराधाविधातृपौष्णाश्विरोहिणीषुस्यात्‍ स्वात्युत्तरासुकुर्याच्छयनासनभोगभोगादि ।

श्रीधर - “ गुरु, शनि, हे वार व ह्या वारांचीं लग्नें आणि लग्नांचे अंश, रिक्तातिथि, कुलिक मुहूर्त ( ज्योतिषांत प्रसिद्ध ), अनुराधा नक्षत्राचा द्वितीयपाद, आणि मैत्रमुहूर्त ( दिवसाचा तृतीय मुहूर्त ) युक्त लग्न, यांचे ठायीं ऋणमोक्ष करावा, असें पंडित सांगतात. ” आतां नाणें पाडण्याचा मुहूर्त सांगतो - “ मृदु ( मृग, रेवती, चित्रा, अनुराधा, ) ध्रुव ( रोहिणी, उत्तरात्रय ), क्षिप्र ( हस्त, अश्विनी, पुष्य, अभिजित्‍ ), चर ( स्वाती, पुनर्वसु, श्रवण, धनिष्ठा, शततारका ) ह्या नक्षत्रीं; शुभ योग असतां; शनि व चंद्र हे वार वर्ज्य करुन अन्य वारीं; ३।८।१२।५।१०।१५ ह्या तिथींचे ठायीं राजांनीं टांकशाळेंत नाणें पाडावें. ” आतां नौका ( गलबतें ) बांधण्याचा मुहूर्त सांगतो - चंडेश्वर - “ रेवती, अश्विनी, शततारका, अनुराधा, चित्रा, मृग, हस्त, धनिष्ठा, कृत्तिका ह्या नक्षत्रांवर; गुरु व शुक्र ह्या वारीं नौका इत्यादिक बांधण्यास व हाकारण्यास आरंभ करावा. ” आतां पलंग इत्यादि भोग्यवस्तूंचा उपभोग घेण्याविषयीं मुहूर्त सांगतो - “ पुष्य, हस्त, अनुराधा, अभिजित्‍, रेवती, अश्विनी, रोहिणी, स्वाती, उत्तरात्रय, ह्या नक्षत्रांवर पलंग, आसन, इत्यादि भोग्यवस्तूंचा उपयोग करावा. ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP