आतां सीमंत संस्कार सांगतो -
अथसीमंतः हेमाद्रौबैजवापः अथसीमंतोन्नयनंचतुर्थेपंचमेषष्ठेचेति वसिष्ठः चतुर्थेसप्तमेमासिषष्ठेवाप्यथवाष्टमे हेमाद्रौशंखः गर्भस्पंदनेसीमंतोन्नयनंयावद्वानप्रसवः कार्ष्णाजिनिः गर्भलंभनमारभ्ययावन्नप्रसवस्तदा सीमंतोन्नयनंकुर्याच्छंखस्यवचनंयथा मासश्चात्रासौरः सावनोवा कालविधाने चतुर्थषष्ठाष्टममासभाजिसौरेणगर्भेप्रथमेविधेयं सीमंतकर्मद्विजभामिनीनांमासेष्टमेविष्णुबलिंचकुर्यात् वसिष्ठः चतुर्थेसावनेमासिषष्ठेवाप्यथवाष्टमे ज्योतिर्निबंधेनारदः अरिक्तापर्वदिवसेकुजजीवार्कवासरे कालविधाने सीमंतेतिष्यहस्तादितिहरिशशभृत्पौष्णविध्युत्तराख्याः पक्षच्छिद्रंचरिक्तांपितृतिथिमपहायापराः स्युः प्रशस्ताः अदितिः पुनर्वसुः पक्षच्छिद्रंचाहवसिष्ठः चतुर्दशीचतुर्थीच अष्टमीनवमी तथा षष्ठीचद्वादशीचैवपक्षच्छिद्राः प्रकीर्तिताः क्रमादेतासुतिथिषुवर्जनीयाश्चनाडिकाः भूता ५ ष्ट ८ मनु १४ तत्वां २५ क ९ दश १० शेषास्तुशोभनाः कालनिर्णये शुभसंस्थेनिशानाथेचतुर्थींचचतुर्दशीं पौर्णमासींप्रशंसंतिकेचित्सीमंतकर्मणि बृहस्पतिः पूर्वपक्षः शुभः प्रोक्तः कृष्णश्चांत्यत्रिकंविना चतुर्दशीचतुर्थीचशुक्लपक्षेशुभप्रदे नारदः विप्रक्षत्रिययोः कुर्याद्दिवासीमंतकर्मतत् वैश्यशूद्रकयोरेतद्दिवानिश्यपिकेचन वाराः पूर्वोक्ताएव ।
हेमाद्रींत बैजवाप - " आतां सीमंतोन्नयन चवथ्या , पांचव्या व सहाव्या मासांत करावें . " वसिष्ठ - " चवथ्या किंवा सातव्या अथवा सहाव्या किंवा आठव्या मासांत सीमंतोन्नयन करावें . " हेमाद्रींत शंख - " गर्भाचें चलन होऊं लागलें असतां सीमंतोन्नयन करावें . अथवा जोंपर्यंत प्रसूत झाली नाहीं तोंपर्यंत करावें . " कार्ष्णाजिनि - " गर्भधारणाला आरंभ करुन जोंपर्यंत प्रसूती झाली नाहीं तोंपर्यंत सीमंतोन्नयन करावें , असें शंखाचें वचन आहे . " ह्या सीमंतोन्नयनाविषयीं वर सांगितलेला मास तो सौर ( संक्रांतिमास ) किंवा सावन ( तीस दिवसांचा ) घ्यावा . कालविधानांत - " द्विजस्त्रियांचा सीमंत संस्कार सौरमानानें चवथा किंवा सहावा अथवा आठवा मास प्रथम गर्भाला असतां करावा . आणि आठव्या मासांत विष्णुबलि करावा . " वसिष्ठ - " सावन ( तीस दिवसांच्या ) चवथ्या किंवा सहाव्या अथवा आठव्या मासांत सीमंतसंस्कार करावा . " ज्योतिर्निबंधांत नारद - " रिक्ता तिथि , पर्वदिवस वर्ज्य करुन भौम , गुरु , रवि , यांच्या वारीं सीमंत करावा . " कालविधानांत - " सीमंताविषयीं पुष्य , हस्त , पुनर्वसु , श्रवण , मृगशीर्ष , रेवती , अभिजित् तीन उत्तरा हीं नक्षत्रें प्रशस्त आहेत . पक्षच्छिद्र ( पुढील श्लोकांत उक्त ), रिक्ता व पितृतिथि ह्या वर्ज्य करुन बाकीच्या तिथि प्रशस्त आहेत . " पक्षछिद्र सांगतो वसिष्ठ - " चतुर्दशी , चतुर्थी , अष्टमी , नवमी , षष्ठी आणि द्वादशी ह्या तिथि पक्षच्छिद्र म्हटल्या आहेत . ह्या तिथींच्या अनुक्रमानें ५।८।१४।२५।९।१० ह्या घटिका वर्ज्य करुन शेष घटिका शुभ आहेत . " कालनिर्णयांत - " चंद्र शुभ राशीस असतां चतुर्थी , चतुर्दशी व पौर्णमासी ह्या सीमंतकर्माविषयीं प्रशस्त आहेत , असें केचित् सांगतात . " बृहस्पति - " शुक्लपक्ष शुभ आहे . आणि कृष्णपक्ष शेवटचे पांच दिवस वर्ज्य करुन शुभ आहे . शुक्लपक्षांतील चतुर्थी व चतुर्दशी ह्या शुभ आहेत . " नारद - " ब्राह्मण व क्षत्रिय यांचें सीमंतकर्म दिवसा करावें . वैश्य व शूद्र यांचें सीमंतकर्म दिवसा व रात्रींही करावें , असें कोणी सांगतात . " वार पूर्वीं सांगितले आहेतच .
एतच्चसकृत्कार्यमितिविज्ञानेश्वरः सकृच्चसंस्कृतानारीसर्वगर्भेषुसंस्कृतेतिदेवलोक्तेः सकृत् प्रतिगर्भंवाकार्यमितिहेमाद्रिः सकृच्चकृतसंस्काराः सीमंतेनद्विजस्त्रियः यंयंगर्भंप्रसूयंतेससर्वः संस्कृतोभवेदिति हारीतोक्तेः सीमंतोन्नयनंकर्मनस्त्रीसंस्कार इष्यते केचिद्गर्भस्यसंस्कारात्प्रतिगर्भंप्रयुंजत इति हेमाद्रौविष्णुवचनाच्च सएव स्त्रीयद्यकृतसीमंताप्रसूयेतकथंचन गृहीतपुत्राविधिवत्पुनः संस्कारमर्हति सीमंतेभोजनेप्रायश्चित्तमुक्तं पराशरमाधवीयेधौम्येन ब्रह्मौदनेचसोमेचसीमंतोन्नयनेतथा जातकर्मनवश्राद्धेभुक्त्वाचांद्रायणंचरेत् ऋग्विधानेतु अराइवेजपेन्मंत्रंशतवारंनसंशयः सीमंतेचयदाभुंक्तेमुच्यतेकिल्बिषात्तदेति ।
हें सीमंतकर्म एकवार करावें , असें विज्ञानेश्वर सांगतो . कारण , " एकवार संस्कृत झालेली स्त्री सर्व गर्भाचे ठायीं संस्कृत आहे ’ असें देवलवचन आहे . एकवार करावें किंवा प्रतिगर्भाला करावें , असें हेमाद्रि सांगतो . कारण , " सीमंत संस्कारानें एकवार संस्कार केलेल्या द्विजस्त्रिया ज्या ज्या गर्भाला प्रसवतात तो तो गर्भ संस्कृत होतो " असें हारीतवचन आहे . यावरुन एकवार करावें असें झालें . आणि " सीमंतोन्नयन हें कर्म स्त्रीसंस्कार होत नाहीं , म्हणून केचित् विद्वान गर्भसंस्कार असल्यामुळें प्रतिगर्भाला सीमंत करितात " असें हेमाद्रींत विष्णुवचनही आहे . तोच सांगतो - " स्त्रियेचा सीमंत केलेला नसून ती जर प्रसूत होईल तर पुत्रासहित त्या स्त्रियेचा पुनः यथाविधि संस्कार करावा . " सीमंत संस्काराचे ठायीं भोजन केलें असतां प्रायश्चित्त सांगतो पराशरमाधवीयांत धौम्य - " ब्रह्मौदन , सोमयाग , सीमंतोन्नयन , जातकर्म , नवश्राद्ध यांचे ठायीं भोजन केलें असतां चांद्रायण करावें . " ऋग्विधानांत तर - " जेव्हां सीमंताचे ठायीं भोजन करील तेव्हां ‘ अराइवे० ’ या मंत्राचा शंभरवेळां जप करावा , म्हणजे पातकापासून मुक्त होईल , यांत संशय नाहीं . "
अथगर्भिणीतत्पतिधर्माः
वराहः सामिषमशनंयत्नात्प्रमदापरिवर्जयेदतः प्रभृति गृह्यकारिका अंगारभस्मास्थिकपालचुल्लीशूर्पादिकेषूपविशेन्ननारी सोलूखलाद्येदृषदादिकेवायंत्रेतुषाद्येनतथोपविष्टा नोमार्जनीगोमयपिंडकादौकुर्यान्नवारिण्यवगाहनंसा अंगारभूत्याननखैर्लिखेत्क्ष्मांकलिंवपुर्भंगमथोनकुर्यात् नोमुक्तकेशीविवशाथवास्याद्भुंक्तेनसंध्यावसरेनशेते नामंगलंवाक्यमुदीरयेत्साशून्यालयंवृक्षतलंनयायात् विष्णुधर्मोत्तरे कटुतीक्ष्णकषायाणिअत्युष्णलवणानिच आयासंचव्यवायंचगर्भिणीवर्जयेत्सदेति हेमाद्रौकौंडिण्यः मुंडनंपिंडदानंचप्रेतकर्मचसर्वशः नजीवत्पितृकः कुर्याद्गुर्विणीपतिरेवच मिताक्षरायां उदन्वतोंभसिस्नानंनखकेशादिकर्तनं अंतर्वत्नयाः पतिः कुर्यान्नप्रजाजायतेध्रुवं पृथ्वीचंद्रोदयेगारुडे गयायांपिंडदानस्यनकदाचिन्निराक्रिया अत्रकालेदाप्रत्ययस्मृतेर्निषिद्धकालस्यैवापवादोनतुजीवत्पितृकगर्भिणीपत्याशौचादिनिमित्तस्य निमित्तसंयोगस्यकालसंयोगाद्भेदेनापवादाभावात् अग्निहोत्रवत् यावज्जीवपरत्वाभावात् अन्यथाऽऽशौचेपिगयायात्राश्राद्धंचस्यात् यत्रनिमित्तसंयोगस्यापवादोयथाशौचेग्निहोत्रादेर्यथावाजीवत्पितृकस्यापवादोमातुर्गयान्वष्टक्यादौतदेवभवतिनान्यदितिसंक्षेपः ।
आतां गर्भिणी व गर्भिणीपति यांचे धर्म सांगतो - वराह - " गर्भधारण झाल्यापासून स्त्रियेनें मांसभक्षण यत्नानें वर्ज्य करावें . " गृह्यकारिका - " कोळसे , भस्म , हाडें , खापर्या , चूल , शूर्प इत्यादिकांचे ठायीं गर्भिणीनें बसूं नये . तसेंच पाषाण - काष्ठ इत्यादिकांचे उखळ , मुसळ , जांतें यांच्यावर ; तुष , केश इत्यादिकांवर तिनें बसूं नये . केरसुणी , शेणी इत्यादिकांचे ठायीं गर्भिणीनें बसूं नये . उदकांत बुडी मारुं नये . कोळसे , भस्म , नखें , यांनीं भूईवर रेषा काढूं नये . कलह , अंग पिळणें हें गर्भिणीनें करुं नये . केश मोकळे सोडून राहूं नये . व उद्विग्न असूं नये . संध्यासमयीं भोजन व शयन करुं नये . अमंगळ वाक्य उच्चारुं नये . गर्भिणीनें शून्य घरीं व झालाखालीं जाऊं नये . विष्णुधर्मोत्तरांत - " तिखट , तीक्ष्ण , तुरट , अतिउष्ण , अतिखारट , आयास , मैथुन हीं गर्भिणीनें सदा वर्ज्य करावीं . " हेमाद्रींत कौंडिण्य - " मुंडन ( क्षौर ), पिंडदान , आणि सर्व प्रेतकर्म हें जीवत्पितृकानें व गर्भिणीपतीनें करुं नये . " मिताक्षरेंत - " समुद्राच्या उदकांत स्नान आणि नखें व केश यांचें छेदन गर्भिणीपति करील तर प्रजा होणार नाहीं . " पृथ्वीचंद्रोदयांत गारुडांत - " गयेंत पिंडदानाचा कदापि निषेध नाहीं . " येथें ‘ कदा ’ या पदांत काल , या अर्थी ‘ दा ’ प्रत्यय श्रुत असल्यामुळें इतर वचनानें पिंडदानाला निषिद्ध जो काल ( तिथिवारादि ) त्याचाच अपवाद हें वचन आहे . जीवत्पितृकत्व , गर्भिणीपतित्व , आशौच इत्यादिनिमित्तक जो निषेध त्याचा अपवाद हें वचन नाहीं . कारण , निमित्तसंयोग ( जीवत्पितृकत्वादि ) आणि कालसंयोग ( तिथ्यादि ) हे भिन्न असल्यामुळें कालबोधक वचन विजातीय असल्यानें निमित्तसंयोगाचा अपवाद होत नाहीं . जसें - ‘ ब्राह्मणेभ्यो दधि दीयतां , तक्रं कौंडिन्याय ’ येथें कौंडिन्याला तक्रदान सांगितल्यानें त्या तक्रदानाचें सजातीय जें दधिदान त्याचा बाध होतो . इतर दानाचा बाध होत नाहीं - तसें येथें समजावें . अग्निहोत्रहोम जसा यावज्जीवपर्यंत आहे , तसें गयेंतील पिंडदान यावज्जीवपर्यंत असतें तर सर्व निषेधांचा अपवाद हें वचन झालें असतें ; पण यावज्जीवपर्यंत हें पिंडदान नाहीं . असें न मानिलें तर आशौचांत देखील गयायात्रा व गयाश्राद्ध होईल . म्हणून हें वचन निमित्तसंबंधी निषेधाचा अपवाद नाहीं . ज्या ठिकाणीं निमित्तसंबंधी निषेधाचा अपवाद सांगितला आहे , जसा - आशौचांत अग्निहोत्रादिकांविषयीं अपवादवचन आहे . अथवा जीवत्पितृकाला मातृगया , अन्वष्टक्य इत्यादिकांत पिंडदानाविषयीं अपवाद आहे तेंच होतें . इतर होत नाहीं . अर्थात् जीवत्पितृक , गर्भिणीपति इत्यादिकांना गयेंत पिंडदानाविषयीं अपवाद वचन नाहीं , हें संक्षेपानें सांगितलें आहे असें समजावें .
प्रयोगपारिजातेकश्यपः गर्भिणीकुंजराश्वादिशैलहर्म्यादिरोहणम् व्यायामंशीघ्रगमनंशकटारोहणं त्यजेत् शोकंरक्तविमोक्षंचसाध्वसंकुक्कुटासनं व्यवसायंदिवास्वापंरात्रौजागरणंत्यजेत् मदनरत्नेस्कांदे हरिद्रांकुंकुमंचैवसिंदूरंकज्जलंतथा कूर्पासकंचतांबूलंमांगल्याभरणंशुभं केशसंस्कारकबरीकरकर्णविभूषणं भर्तुरायुष्यमिच्छंतीवर्जयेद्गर्भिणीनहि बृहस्पतिः चतुर्थेमासिषष्ठेवाप्यष्टमेगर्भिणीयदा यात्रानित्यंविवर्ज्यास्यादाषाढेतुविशेषतः याज्ञवल्क्यः दौह्रदस्याप्रदानेनगर्भोदोषमवाप्नुयात् वैरुप्यंमरणंवापितस्मात्कार्यं प्रियंस्त्रियाः दौह्रदंगर्भिणीप्रियम् तत्रैवाश्वलायनः वपनंमैथुनंतीर्थंवर्जयेद्गर्भिणीपतिः श्राद्धंचसप्तमान्मासादूर्ध्वंनान्यत्रवेदवित् श्राद्धंतद्भोजनमितिप्रयोगपारिजातः कालविधानेमुहूर्तदीपिकायांच क्षौरंशवानुगमनंनखकृंतनंचयुद्धादिवास्तुकरणंत्वतिदूरयानं उद्वाहमौपनयनंजलधेश्चगाहमायुः क्षयार्थमितिगर्भिणिकापतीनां रत्नसंग्रहेगालवः दहनंवपनंचैवचौलंवैगिरिरोहणं नाव आरोहणंचैववर्जयेद्गर्भिणीपतिः अन्यत्रापि प्रव्यक्तगर्भापतिरब्धियानंमृतस्यवाहंक्षुरकर्मसंगं तस्यांतुयत्नेनगयादितीर्थंयागादिकंवास्तुविधिंनकुर्यात् प्रव्यक्तगर्भावनिताभवेन्मासत्रयात्परं षण्मासात्परतः सूतिर्नवमेरिष्टवासिनी ।
प्रयोगपारिजातांत कश्यप - " गर्भिणीनें हत्ती , घोडा , पर्वत , घराचा उच्च प्रदेश यांजवर चढूं नये . व्यायाम करणें , जलद चालणें , गाडीवर बसणें हें गर्भिणीनें वर्ज्य करावें . तसेंच शोक , रक्तस्त्राव , भीति , कुक्कुटासन , व्यवसाय , दिवसा निद्रा , आणि रात्रीं जागरण , हीं वर्ज्य करावीं . " मदनरत्नांत स्कांदांत - " हळद , कुंकूं , सेंदूर , काजळ , कूर्पासक , तांबूल , मांगल्याभरण , केशसंस्कार , केशांतील हातांतील व कानांतील अलंकार , हीं भर्त्याचें आयुष्य इच्छिणार्या गर्भिणीनें वर्ज्य करुं नयेत . " बृहस्पति - " गर्भिणीनें चवथ्या किंवा सहाव्या अथवा आठव्या मासांत यात्रा ( परगांवीं जाणें ) सदा वर्ज्य करावी . आषाढ मासांत तर विशेषेंकरुन वर्ज्य करावी . " याज्ञवल्क्य - " डोहाळे न पुरविल्यामुळें गर्भाला दोष प्राप्त होईल . त्या योगानें गर्भ विरुप होईल किंवा मरेल , म्हणून स्त्रियेला प्रिय असेल तें करावें . " दौह्रद म्हणजे डोहाळे , तेंच गर्भिणीप्रिय होय . तेथेंच आश्वलायन - " गर्भिणीच्या पतीनें वपन , मैथुन , तीर्थ व श्राद्धभोजन हीं गर्भिणीस सातवा महिना लागल्यावर वर्ज्य करावीं . पूर्वीं वर्ज्य नाहींत . " येथें श्राद्ध म्हणजे श्राद्धभोजन , असें प्रयोगपारिजात सांगतो . कालविधानांत आणि मुहूर्तदीपिकेंत - " क्षौर , प्रेताबरोबर गमन , नखें काढणें , युद्धादि करणें , घर बांधणें , अति दूर गमन करणें , विवाह , उपनयन , समुद्रस्नान , हीं कर्मैं गर्भिणीपतीला आयुष्य नाश करणारीं आहेत . " रत्नसंग्रहांत गालव - " दाह , वपन , चौल , पर्वतावर चढणें , नावेवर चढणें , हीं गर्भिणीपतीनें वर्ज्य करावीं . " अन्य ग्रंथांतही - " जी प्रव्यक्तगर्भा ( जिचा गर्भ चांगला व्यक्त झाला ) तिच्या पतीनें समुद्रयान , प्रेत वाहणें , श्मश्रुकर्म , गर्भिणीचा संग , गयादितीर्थगमन , यज्ञादिकर्म , घर बांधणें , हीं करुं नयेत . " तीन महिन्यांच्या पुढें स्त्रियेचा गर्भ चांगला व्यक्त होतो म्हणून ती सप्रव्यक्तगर्भा म्हटली आहे . सहा मासांपुढें सूति म्हटली आहे . आणि नवव्या मासांत अरिष्ट ( सूतिकागृह ) वास करणारी होय . "
आतां प्रसूतिघरांत प्रवेश सांगतो .
अथसूतिकागृहप्रवेशः गर्गः रोहिण्यैंदवपौष्णेषुस्वातीवरुणयोरपि पुनर्वसौपुष्यहस्तधनिष्ठात्र्युत्तरासुच मैत्रेत्वाष्ट्रेतथाश्विन्यांसूतिकागारवेशनम् एतच्चसंभवे प्रसूतिसमयेकालेसद्यएवप्रवेशयेदिति वसिष्ठोक्तेः तच्चनैऋत्यांकार्यं वारुण्यांभोजनगृहंनैऋत्यांसूतिकागृहमिति वसिष्ठोक्तेः विष्णुधर्मे दशाहंसूतिकागारमायुधैश्चविशेषतः वह्निनातिंदुकालातैः पूर्णकुंभैः प्रदीपकैः मुसलेनतथावारिवर्णकैश्चित्रितेनचेति ।
गर्ग - " रोहिणी , मृग , रेवती , स्वाती , शततारका , पुनर्वसु , पुष्य , हस्त , धनिष्ठा , तीन उत्तरा , अनुराधा , चित्रा , अश्विनी या नक्षत्रांवर गर्भिणीनें प्रसूतिघरांत प्रवेश करावा . " हीं नक्षत्रें मिळण्याचा संभव असेल तर घ्यावीं . कारण , " प्रसूतिसमय प्राप्त झाला असतां तत्कालींच प्रसूतिगृहांत प्रवेश करवावा " असें वसिष्ठवचन आहे . तें प्रसूतिगृह नैऋति दिशेस करावें . कारण , " पश्चिमदिशेस भोजनगृह आणि नैऋतीस सूतिकागृह करावें . " असें वसिष्ठवचन आहे . विष्णुधर्मांत - " सूतिकागृह दहा दिवसपर्यंत विशेषेंकरुन आयुधें , अग्नि , टेंभुरणीचीं पेटतीं लांकडें , पाण्यानें भरलेले कुंभ , दीप , मुसळ , उदक यांनीं युक्त करावें . आणि त्यांत अनेक वर्णाचें रंगवल्ल्यादि काढावें . "