आतां तांबूलभक्षण सांगतो .
अथतांबूलभक्षणं चंडेश्वरः सार्धमासद्वयेदद्यात्तांबूलंप्रथमंशिशोः कर्पूरादिकसंमिश्रंविलासायहितायच मूलार्कचित्रकरतिष्यहरींद्रभेषुपौष्णेतथामृगशिरोदितिवासवेषु अर्केंदुजीवभृगुबोधनवासरेषुतांबूलभक्षणविधिर्मुनिभिः प्रदिष्टः ।
चंडेश्वर - बालकास अडीच महिने झाल्यानंतर प्रथम तांबूलभक्षण करवावें . तें तांबूल कर्पूरादि सकल पदार्थांनीं युक्त असें करुन भक्षण करवावें , तें विलास ( शोभा ) कारक व हितकारक होतें . मूल , अनुराधा , चित्रा , हस्त , पुष्य , श्रवण , ज्येष्ठा , रेवती , मृग , पुनर्वसु , धनिष्ठा ह्या नक्षत्रांवर , रवि , इंदु , गुरु , शुक्र , बुध ह्या वारीं तांबूलभक्षणाचा विधि ऋषींनीं सांगितला आहे . "