मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
प्रतिकूलादिविचार

तृतीयपरिच्छेद - प्रतिकूलादिविचार

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां प्रतिकूलादिविचार सांगतो -

अथप्रतिकूलादि ज्योतिर्निबंधेगर्गः कृतेतुनिश्चयेपश्चान्मृत्युर्भवतिकस्यचित् ‍ तदानमंगलंकुर्यात्कृतेवैधव्यमाप्नुयात् ‍ ज्योतिर्मेधातिथिः वधूवरार्थेघटितेसुनिश्चितेवरस्यगेहेप्यथकन्यकायाः मृत्युर्यदिस्यान्मनुजस्यकस्यचित्तदानकार्यंखलुमंगलंबुधैः मंगलं विवाहः स्मृतिचंद्रिकायाम् ‍ कृतेवाडनिश्चयेपश्चान्मृत्युर्भवतिगोत्रिणः तदानमंगलंकार्यंनारीवैधव्यदंध्रुवं भृगुः वाग्दानानंतरंयत्रकुलयोः कस्यचिन्मृतिः तदोव्दाहोनैवकार्यः स्ववंशक्षयदोषतः शौनकः वरवध्वोः पितामातापितृव्यश्चसहोदरः एतेषांप्रतिकूलंचमहाविघ्नप्रदंभवेत् ‍ पितापितामहश्चैवमाताचैवपितामही पितृव्यः स्त्रीसुतोभ्राताभगिनीचाविवाहिता एभिरत्रविपन्नैश्चप्रतिकूलंबुधैः स्मृतं अन्यैरपिविपन्नैस्तुकेचिदूचुर्नतद्भवेत् ‍ मांडव्यः वाग्दानानंतरंमातापिताभ्राताविपद्यते विवाहोनैवकर्तव्यः स्ववंशस्थितिमिच्छता ।

ज्योतिर्निबंधांत गर्ग - " वधूवरांचा विवाहनिश्चय केल्यावर त्यांच्या कुलांत कोणा एकाला मृत्यु प्राप्त होईल तर त्यांचा विवाह करुं नये . कारण , केला असतां वधूला वैधव्य प्राप्त होईल . " ज्योतिर्मेधातिथि - " वधूवरांचा ज्योतिः शास्त्रोक्त नाडीगणादिक घटितविचार होऊन विवाहनिश्चय झाल्यानंतर वराच्या घरांत किंवा कन्येच्या घरांत कोणाएका मनुष्याला जर मृत्यु प्राप्त होईल तर त्या वधूवरांचा विवाह जाणत्यांनीं करुं नये . " स्मृतिचंद्रिकेंत - " वधूवरांचा वाडनिश्चय झाल्यानंतर गोत्रांतील मनुष्य मरेल तर त्यांचा विवाह करुं नये . कारण , केला असतां वधूला तो वैधव्यदायक आहे . " भृगु - " ज्या विवाहांत वाग्दान केल्यानंतर वधूवरांच्या कुलांत कोणला मृत्यु प्राप्त होईल तर तो विवाह करुं नये . केला असतां वंशाचा क्षय होईल . " शौनक - " वधूचा व वराचा पिता , माता , पितृव्य , सहोदर भ्राता यांपैकीं एकादा मरेल तर तें विवाहप्रतिकूल महाविघ्नदायक होईल . कोणाचें मरण विवाहाला प्रतिकूल होतें तें सांगतो - " वधूवरांचा पिता , पितामह , माता , पितामही , पितृव्य , वराची पूर्वपत्नी व पूर्वपुत्र , भ्राता , अविवाहित भगिनी , यांपैकीं कोणा एकास मरण आलें असतां तें विवाहाला प्रतिकूल असें विद्वानांनीं सांगितलें आहे . वधूवरांच्या कुलांत इतरालाही मरण आलें असतां प्रतिकूल होतें , असें कितीएक सांगतात ; परंतु इतरांचें मरण प्रतिकूल होत नाहीं . " मांडव्य - ‘‘ वाग्दान केल्यानंतर माता , पिता किंवा भ्राता मृत होईल तर , आपला वंश सुरक्षित असावा , अशी इच्छा करणारानें त्यांचा तो विवाह करुं नये . "

संकटेतुमेधातिथिः वाग्दानानंतरंयत्रकुलयोः कस्यचिन्मृतिः तदासंवत्सरादूर्ध्वंविवाहः शुभदोभवेत् ‍ स्मृतिरत्नावल्याम् ‍ पितुरब्दमशौचंस्यात्तदर्धंमातुरेवच मासत्रयंतुभार्यायास्तदर्धंभ्रातृपुत्रयोः अन्येषांतु सपिंडानामाशौचंमासमीरितं तदंतेशांतिकंकृत्वाततोलग्नंविधीयते ज्योतिःप्रकाशे प्रतिकूलेपिकर्तव्योविवाहोमासतः परम् ‍ शांतिंविधायगांदत्वावाग्दानादिचरेत्पुनः शांतिंविनायकशांतिं तथाचमेधातिथिः संकटेसमनुप्राप्तेयाज्ञवल्क्येनयोगिना शांतिरुक्तागणेशस्यकृत्वातांशुभमाचरेदिति प्रतिकूलेनकर्तव्योगच्छेद्यावदृतुत्रयं प्रतिकूलेपिकर्तव्यमित्याहुर्बहुविप्लवे प्रतिकूलेसपिंडस्यमासमेकंविवर्जयेत् ‍ ज्योतिः सागरे दुर्भिक्षेराष्ट्रभंगेचपित्रोर्वाप्राणसंशये प्रौढायामपिकन्यायांनानुकूल्यंप्रतीक्ष्यते मेधातिथिः पुरुषत्रयपर्यंतंप्रतिकूलंस्वगोत्रिणां प्रवेशान्निर्गमस्तद्वत्तथामंडनमुंडने प्रेतकर्माण्यनिर्वर्त्यचरेन्नाभ्युदयक्रियां आचतुर्थंततः पुंसिपंचमेशुभदंभवेत् ‍ ।

संकट ( दुसरा योग्य वर न मिळणें वगैरे ) प्राप्त असेल तर सांगतो मेधातिथि - " ज्या वेळीं वाग्दान केल्यानंतर वधूवरांच्या कुलांत कोणाएकाला मरण प्राप्त होईल त्या वेळीं तो विवाह करुं नये . संवत्सर गेल्यावर त्या वधूवरांचा विवाह करावा , तो शुभदायक होईल . " स्मृतिरत्नावलींत - ‘‘ पित्याचें आशौच एकवर्ष ; मातेचें आशौच सहा महिने ; भार्येचें आशौच तीन महिने ; भ्रात्याचें व पुत्राचें आशौच दीड महिना ; आणि इतर सपिंडांचें आशौच एक महिना सांगितलें आहे . याप्रमाणें सांगितलेलें आशौच संपल्यावर शांति करुन नंतर विवाह करावा . " ज्योतिः प्रकाशांत - " प्रतिकूल ( सपिंडादिमरण ) झालें असलें तरी एक मास गेल्यावर विवाह करावा . विवाहाचे वेळीं विनायकशांति करुन गोप्रदान करुन पुनः वाग्दानादि कृत्य करावें . " येथें शांति सांगितली ती विनायकशांति समजावी . तेंच सांगतो मेधातिथि - " संकटसमय प्राप्त असतां , योगियाज्ञवल्क्यानें विनायकशांति सांगितली आहे ती करुन नंतर मंगलकार्य करावें . प्रतिकूल झालें असतां सहा महिने गेल्यावांचून विवाह करुं नये . चोर , दुष्काळ , देशभंग इत्यादिक बहुत उपद्रव उत्पन्न झाले असतां प्रतिकूल झालेलें असलें तरी विवाहादि मंगलकार्य करावें , असें कितीएक सांगतात . सपिंडाचें प्रतिकूल झालें असतां एकमास वर्ज्य करावा . " ज्योतिः सागरांत - " दुर्भिक्ष पडलें , राष्ट्रभंग झाला , मातापितरांच्या वांचण्याचा संशय उत्पन्न झाला , अथवा कन्या प्रौढ झाली , यांपैकीं कोणतेंही झालें असतां आनुकूल्याची ( प्रतिकूल झाल्यापासून वर्ज्य दिवस सोडून पुढें येणार्‍या अनुकूलदिवसांची ) वाट पाहूं नये . अर्थात् ‍ अनुकूल दिवस येण्यापूर्वीच विवाह करावा . " मेधातिथि - " आपल्या गोत्रांत तीन पुरुषांचे आंत कोणी मरेल तर प्रतिकूल होतें . तसेंच प्रवेश ( पुत्रविवाह ) झाल्यावर निर्गम ( कन्याविवाह ) करुं नये , हा निषेध आणि मंडन ( मौंजी , विवाह ) केल्यावर मुंडन ( चौलादि ) करुं नये हा निषेध तीन पुरुषांपर्यंत समजावा . सपिंडांत चार पुरुषांचे आंत प्राप्त झालेलीं प्रेतकर्मै ( सपिंडीकरण , मासिकें वगैरे ) केल्यावांचून वृद्धिश्राद्ध करुं नये . पांचव्या पुरुषाचे ठायीं , प्रेतकर्मै केल्यावांचून वृद्धिश्राद्ध झालें तरी तें शुभदायक होईल . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP