मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
देवतांच्या प्रतिमा

तृतीयपरिच्छेद - देवतांच्या प्रतिमा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां देवतांच्या प्रतिमा सांगतो .

अथप्रतिमाः भार्गवार्चनदीपिकायांभविष्ये सौवर्णीराजतीताम्रीमृन्मयीचयथाभवेत् ‍ पाषाणधातुयुक्तावारीतिकांस्यमयीतथा रीतिः पित्तलं शुद्धदारुमयीवापिदेवतार्चाप्रशस्यते अंगुष्ठपर्वादारभ्यवितस्तिंयावदेवतु गृहेषुप्रतिमाकार्यानाधिकाशस्यतेबुधैः पंचरात्रेतु मृद्दारुलाक्षागोमेदमधूच्छिष्टमयींनत्विति निषेधउक्तः भागवते शैलीदारुमयीलौहीलेप्यालेख्याचसैकती मनोमयीमणिमयीप्रतिमाष्टविधास्मृता काष्ठंमधुकस्यैव तत्रकाष्ठेषुमधुकमानीयचवसुंधरे कृत्वातत्प्रतिमांचैवप्रतिष्ठाविधिनार्चयेदितिवाराहोक्तेः देवीपुराणे सप्तांगुलंसमारभ्ययावच्चद्वादशांगुलम् ‍ गृहेष्वर्चासमाख्याताप्रासादेवाधिकाशुभा ।

भार्गवार्चनदीपिकेंत भविष्यांत - " सोन्याची , रुप्याची , तांब्याची , मातीची , किंवा पाषाणाची , पितळेची तशीच कांस्याची अथवा शुद्ध काष्ठाची देवताप्रतिमा प्रशस्त आहे . अंगुष्ठपर्वापासून एक वितीचे आंत उंचीची प्रतिमा घरांत असावी . वितीपेक्षां अधिक उंचीची प्रतिमा घरांत प्रशस्त नाहीं , असें विद्वान् ‍ सांगतात . " पंचरात्रांत तर - " माती , काष्ठ , लाक्षा , गोमेद , मेण यांची प्रतिमा करुं नये " असा निषेध सांगितला आहे . श्रीमद्भागवतांत - " पाषाणाची , काष्ठाची , लोहाची ( धातूची ), मृत्तिकेनें वगैरे लिंपलेली , रंगांनीं काढलेली , वाळूची , मनांत आणलेली , आणि मण्याची केलेली अशी प्रतिमा आठ प्रकारची सांगितली आहे . " काष्ठाची प्रतिमा सांगितली , तें काष्ठ मोहाचेंच असावें . कारण , " त्या काष्ठांमध्यें मधुकाचें ( मोहाचें ) काष्ठ आणून त्याची प्रतिमा करुन प्रतिष्ठाविधीनें तिची पूजा करावी . " असें वराहपुराणवचन आहे . देवीपुराणांत - " सात अंगुलांपासून बारा अंगुलेंपर्यंत उंचीची घरांत अर्चा करावी . याच्याहून मोठी प्रतिमा मंदिरांत शुभकारक होते .

तिथितत्त्वेकालिकापुराणे प्रतिमायाः कपोलौद्वौस्पृष्ट्वादक्षिणपाणिना प्राणप्रतिष्ठांकुर्वीततस्यदेवस्यवाहरेः अन्येषामपिदेवानांप्रतिमासुचपार्थिव प्राणप्रतिष्ठाकर्तव्यातस्यांदेवत्वसिद्धये वासुदेवस्यबीजेनतद्विष्णोरित्यनेनच तथैवह्रदयेंगुष्ठंदत्वाशश्वच्चमंत्रवित् ‍ एभिर्मंत्रैः प्रतिष्ठांतुह्रदयेपिसमाचरेत् ‍ अस्यैप्राणाः प्रतिष्ठंतुअस्यैप्राणाः क्षरंतुच अस्यैदेवत्वमर्चायैमामहेतिचकच्चन हयशीर्षंपंचरात्रे अर्चकस्यतपोयोगादर्चनस्यातिशायनात् ‍ आभिरुप्याच्चबिंबानांदेवः सान्निध्यमृच्छति प्रयोगपारिजातेव्यासः प्रतिमापट्टयंत्राणां नित्यंस्नानंनकारयेत् ‍ कारयेत्पर्वदिवसेयदावामलधारणम् ‍ ।

तिथितत्त्वांत कालिकापुराणांत - " प्रतिमेच्या दोन कपोलांस ( गालांस ) दक्षिण हस्तानें स्पर्श करुन त्या प्रतिमेवर हरीची प्राणप्रतिष्ठा करावी . इतरही देवतांच्या प्रतिमांचे ठायीं देवपणा सिद्ध होण्यासाठीं प्राणप्रतिष्ठा करावी . मंत्रवेत्त्या ब्राह्मणानें वासुदेवाचें बीज आणि ‘ तद्विष्णोः० ’ हा मंत्र उच्चारुन अर्चेच्या ह्रदयाचे ठायीं वारंवार हात देऊन प्राणप्रतिष्ठा करावी . तशीच पुढील मंत्रानेंही ह्रदयाचे ठायीं हात देऊन प्राणप्रतिष्ठा करावी . तो मंत्र - " अस्यै प्राणाः प्रतिष्ठंतु अस्यै प्राणाः क्षरंतु च ॥ अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कच्चन ॥ " हयशीर्षपंचरात्रांत - " अर्चा करणार्‍याच्या तपः सामर्थ्यानें , पूजेचा अतिशय झाल्यानें आणि प्रतिमांच्या सौंदर्यानें प्रतिमांचे ठायीं देवाचें सांनिध्य होतें . " प्रयोगपारिजातांत व्यास - " प्रतिमा , पट्ट आणि यंत्रें यांना नित्य स्नान घालूं नये . पर्वदिवशीं स्नान घालावें . किंवा जेव्हां त्यांच्यावर मळ धरेल तेव्हां स्नान घालावें . "

लिंगेविशेषस्तिथितत्त्वेभविष्ये मृद्भस्मगोशकृत्पिष्टताम्रकांस्यमयंतथा कृत्वालिंगंसकृत्पूज्यवसेत्कल्पायुतंदिवि वार्क्षंवित्तप्रदंलिंगंस्फाटिकंसर्वकामदं कृत्वापूजयविप्रेंद्रलप्स्यसेवांछितंफलम् ‍ तत्रैवकालकौमुद्यांस्कांदे अक्षादल्पपरीमाणंनलिंगंकुत्रचिन्नरः कुर्वीतांगुष्ठतोह्नस्वंनकदाचित्समाचरेत् ‍ अक्षोऽशीतिर्गुंजाः गुंजाः पंचाल्पमाषकः तेषोडशाक्षः कर्षोस्त्रीत्यमरकोशात् ‍ प्रयोगपारिजातेक्रियासारे नवाष्टसप्तांगुलिकंलिंगंश्रेष्ठमिहोच्यते षट्पंचकचतुर्मानंमध्यमंत्रिविधंस्मृतम् ‍ त्रिव्द्येकांगुलिमानंयत्रिविधंतत्कनीयसम् ‍ एवंनवविधंप्रोक्तंचरलिंगंयथाक्रमम् ‍ ।

लिंगाविषयीं विशेष सांगतो तिथितत्त्वांत भविष्यांत - " मृत्तिका , भस्म , गोमय , पीठ , तांबें , कांसें यांपैकीं कोणत्याही पदार्थाचे लिंग करुन एकवार त्याची पूजा केल्यानें अयुत ( दहाहजार ) कल्पपर्यंत स्वर्गांत त्याचा वास होईल . वृक्षाचें लिंग द्रव्य देणारें आहे . स्फटिकाचें लिंग सर्व काम देणारें आहे . हे राजश्रेष्ठा ! तें लिंग तूं करुन त्याची पूजा कर म्हणजे वांछित फल पावशील . " तेथेंच कालकौमुदींत स्कांदांत - " मनुष्यानें अक्षाहून अल्प प्रमाणाचें लिंग कोठेंही करुं नये . आणि अंगुष्ठाहून आंखूड लिंग कधींही करुं नये . " अक्ष म्ह० ८ ० गुंजा . कारण , " पांच गुंजा म्हणजे १ मासा . आणि ते सोळा मासे म्हणजे एक अक्ष . त्यालाच कर्ष असें म्हणतात . " असा अमरकोश आहे . प्रयोगपारिजातांत क्रियासारांत - " नऊ , आठ , किंवा सात अंगुलें प्रमाणाचें तीन प्रकारचें लिंग श्रेष्ठ म्हटलें आहे . सहा , पांच आणि चार अंगुलें प्रमाणाचें तीन प्रकारचें लिंग मध्यम म्हटलें आहे . आणि तीन , दोन , व एक अंगुल प्रमाणाचें तीन प्रकारचें लिंग कनिष्ठ म्हटलें आहे . याप्रमाणें चरलिंग अनुक्रमानें नऊ प्रकारचें सांगितलें आहे . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP