वरस्यमधुपर्कमाहयाज्ञवल्क्यः प्रतिसंवत्सरंत्वर्च्याः स्नातकाचार्यपार्थिवाः प्रियोविवाह्यश्चतथा यज्ञंप्रत्यृत्विजः पुनः अत्रविशेषोगृह्यपरिशिष्टे वरस्ययाभवेच्छाखातच्छाखागृह्यचोदितः मधुपर्कः प्रदातव्योह्यन्यशाखेपिदातरि अत्रवरदातृशब्दौऋत्विगाद्युपलक्षणम् तदाहुः अर्च्यशाखयामधुपर्कइति अर्च्यस्य यच्छाखीयंकर्मतच्छाखयामधुपर्कइतियाज्ञिकाः जयंतस्तुवरणवत्सर्वत्रयजमानशाखयैवमधुपर्कइत्याह तत्तुनाद्रियंतेवृद्धाः अत्र पंचाशताभवेद्ब्रह्मातदर्धेनतुविष्टरइत्यादिगृह्यपरिशिष्टादेर्विष्टरादिलक्षणंमधुपर्कादिविधिश्चस्वगृह्यादेर्ज्ञेयः ।
वराला मधुपर्क सांगतो याज्ञवल्क्य - “ स्नातक, आचार्य आणि राजा यांची प्रतिवर्षीं मधुपर्कानें पूजा करावी. श्रेष्ठ ब्राह्मण आणि विवाहाला प्राप्त झालेला जो वर त्याची मधुपर्कानें तशीच पूजा करावी. यज्ञामध्यें ऋत्विजांची मधुपर्कानें पूजा करावी. ” या मधुपर्काविषयीं विशेष सांगतो गृह्यपरिशिष्टांत - “ कन्यादाता इतर शाखेचा असला तरी वराची जी शाखा असेल त्या शाखेच्या गृह्यसूत्रानें सांगितलेला मधुपर्क वरास द्यावा. ” या वचनांत ‘ वर ’ आणि ‘ दाता ’ हे शब्द ‘ ऋत्विक् ’ ‘ यजमान ’ इत्यादिकांचे उपलक्षक आहेत. तेंच सांगतात - “ ज्याची पूजा करावयाची त्याच्या शाखेनें मधुपर्क होतो. ” म्हणजे ज्याची पूजा करावयाची असेल त्याचें कर्म ज्या शाखेनें होतें त्या शाखेनें मधुपर्क होतो, असें याज्ञिक सांगतात. जयंत तर - यज्ञांत ऋत्विजांचें वरण जसें यजमानशाखेनें होतें तसा मधुपर्क यजमानाच्या शाखेनेंच होतो, असें सांगतो. तें जयंताचें सांगणें वृद्ध स्वीकारीत नाहींत. या ठिकाणीं ‘ पन्नास दर्भांनीं ब्रह्मा होतो ’ पंचवीस दर्भांनीं विष्टर होतो ’ इत्यादि विष्टरादिकाचें लक्षण गृह्यपरिशिष्टादिकांतून आणि मधुपर्कादिकाचा विधि आपल्या गृह्यसूत्रादिकांतून जाणावा.