आतां चौलसंस्कार सांगतो .
अथचौलं प्रयोगपारिजातेषड्गगुरुशिष्यः जाताधिकाराज्जन्मादितृतीयेब्देतुचौलकं आद्येब्देकुर्वतेकेचित्पंचमेब्देद्वितीयके उपनीत्यासहैवेतिविकल्पाः कुलधर्मतः बृहस्पतिः तृतीयेब्देशिशोर्गर्भाज्जन्मतोवाविशेषतः पंचमेसप्तमेवापिस्त्रियाः पुंसोपिवासमं तत्रैवनारदः जन्मतस्तुतृतीयेब्देश्रेष्ठमिच्छंतिपंडिताः पंचमेसप्तमेवापिजन्मतोमध्यमंभवेत् अधमंगर्भतः स्यात्तुनवमैकादशेपिवेति पारिजातेबृहस्पतिः उत्तरायणगेसूर्येविशेषात्सौम्यगोलके शुक्लपक्षेशुभंप्रोक्तंकृष्णपक्षेशुभेतरत् अशुभोंत्यत्रिभागः स्यात्कृष्णपक्षेत्रिधाकृते तत्रैववसिष्ठः द्वित्रिपंचमसप्तम्यामेकादश्यांतथैवच दशम्यांचत्रयोदश्यांकार्यंक्षौरंविजानता नृसिंहीये षष्ठ्यष्टमीचतुर्थीचनवमीचचतुर्दशी द्वादशीदर्शपूर्णेद्वेप्रतिपच्चैवनिंदिताः वसिष्ठः रवेरंगारकस्यैवसूर्यपुत्रस्यचैवहि निंदितादिवसाः क्षौरेशेषाः कार्यकराः स्मृताः ज्योतिर्निबंधे बृहस्पतिः पापग्रहाणां वारादौविप्राणांशुभदंरवौ क्षत्रियाणांक्षमासूनौविट्शूद्राणांशनौशुभं हस्ताश्विविष्णुपौष्णाश्चश्रविष्ठादित्यपुष्यभं सौम्यचित्रेनवक्षौरेउत्तमानवतारकः त्रीण्युत्तराणिवायव्यंरोहिणीवारुणंतथा क्षौरेषण्मध्यमाः प्रोक्ताः शेषाद्वादशगर्हिताः निधनेजन्मनक्षत्रेवैनाशेचंद्रमेष्टमे विपत्करेवधेक्षौरंप्रत्यरेचविवर्जयेत् अत्रलग्नशुद्धिरन्येचयोगाज्योतिर्विद्भ्योज्ञेयाः अन्येचविशेषाः श्मश्रुकर्मनिर्णयेवक्ष्यंते ।
प्रयोगपारिजातांत - षड्गुरुशिष्य - " चौलाविषयीं तिसर्या वर्षीं अधिकार प्राप्त झालेला असल्यामुळें जन्मापासून तिसर्या वर्षीं चौल संस्कार करावा . कितीएक विद्वान् प्रथम वर्षीं किंवा पांचव्या वर्षीं अथवा दुसर्या वर्षीं अथवा मौंजीसहवर्तमान करितात . हे विकल्प कुलधर्मावरुन जाणावे . " बृहस्पति - " गर्भापासून किंवा जन्मापासून तिसर्या वर्षीं मुलाचा चौलसंस्कार विशेषेंकरुन करावा . अथवा पांचव्या किंवा सातव्या वर्षीं करावा . हा कन्येचा व पुत्राचाही समान आहे . " तेथेंच नारद - " जन्मापासून तिसर्या वर्षीं करावा तो श्रेष्ठा आहे , असें पंडित सांगतात . जन्मापासून पांचव्या किंवा सातव्या वर्षीं मध्यम होय . गर्भापासूनही नवव्या व अकराव्या वर्षीं अधम होय . " पारिजातांत बृहस्पति - " सूर्य उत्तरायणांत असतां व विशेषेंकरुन उत्तर गोलांत असतां , शुक्लपक्षीं शुभ होय . कृष्णपक्षीं शुभ नाहीं , अर्थात् मध्यम . कृष्णपक्षाचे शेवटचे पांच दिवस अशुभ होत . " तेथेंच वसिष्ठ - " द्वितीया , तृतीया , पंचमी , सप्तमी , एकादशी , दशमी , त्रयोदशी ह्या तिथींचे ठायीं ज्ञात्या पुरुषानें क्षौर करावें . " नृसिंहाच्या ग्रंथांत - " षष्ठी , अष्टमी , चतुर्थी , नवमी , चतुर्दशी , द्वादशी , अमावास्या , पूर्णिमा आणि प्रतिपदा ह्या तिथि क्षौरकर्माविषयीं निंदित होत . " वसिष्ठ - " रवि , मंगळ , शनि हे वार क्षौराविषयीं निषिद्ध होत . इतर वार शुभ जाणावे . " ज्योतिर्निबंधांत - बृहस्पति - " पापग्रहांचे जे वार त्यांपैकीं रविवार ब्राह्मणांस शुभ ; भौमवार क्षत्रियांस शुभ ; आणि शनिवार वैश्य व शूद्र यांना शुभ . हस्त , अश्विनी , श्रवण , रेवती , धनिष्ठा , पुनर्वसु , पुष्य , मृग , चित्रा हीं नऊ नक्षत्रें नवीन क्षौराविषयीं उत्तम होत . तीन उत्तरा , स्वाती , रोहिणी , शततारका हीं सहा नक्षत्रें क्षौराविषयीं मध्यम . बाकीचीं बारा नक्षत्रें निंदित होत . " निधनतारा , जन्मतारा , वैनाशतारा , अष्टमचंद्र , विपद्तारा , वधतारा आणि प्रत्यरितारा ह्या क्षौराविषयीं वर्ज्य कराव्या . " ह्या चौल संस्काराविषयीं लग्नशुद्धि व इतर योग ज्योतिष ग्रंथांतून जाणावे . इतर विशेष निर्णय श्मश्रुकर्माचे निर्णयप्रसंगीं पुढें सांगूं .
एतच्चशिशोर्मातरिगर्भिण्यांनकार्यम् तदाहज्योतिर्निबंधेमदनरत्नेचवृद्धगार्ग्यः पुत्रचूडाकृतौ मातायदिसागर्भिणीभवेत् शस्त्रेणमृत्युमाप्नोतितस्मात्क्षौरंविवर्जयेत् अस्यापवादमाहतत्रैवनारदः सूनोर्मातरिगर्भिण्यांचूडाकर्मनकारयेत् पंचाब्दात्प्रागथोर्ध्वंतुगर्भिण्यामपिकारयेत् यदिगर्भविपत्तिः स्याच्छिशोर्वामरणंयदि सहोपनीत्याकुर्याच्चेत्तदादोषोनविद्यते बृहस्पतिः गर्भिण्यांमातरिशिशोः क्षौरकर्मनकारयेत् व्रताभिषेकेप्येवंस्यात्कालोवेदव्रतेष्वपि अभिषेकः समावर्तनं गर्भिण्यामपिपंचममासपर्यंतंनदोष इत्युक्तंमुहूर्तदीपिकायांगर्गेण पंचममासादूर्ध्वंमातुर्गर्भस्यजायतेमृत्युरिति मदनरत्नेबृहस्पतिः पुत्रचूडाकृतौमातागर्भिणीयदिवाभवेत् विपद्यतेगुरुस्तत्रदंपतीशिशुरब्दतः गर्भेमातुः कुमारस्यनकुर्याच्चौलकर्मतु पंचमासादधः कुर्यादतऊर्ध्वंनकारयेत् गर्गः ज्वरस्योत्पादनंयस्यलग्नंतस्यनकारयेत् दोषनिर्गमनात्पश्चात्स्वस्थोधर्मंसमाचरेत् लग्नमितिमंगलोपलक्षणम् ज्योतिर्गर्गः विवाहोत्सवयज्ञेषुमातायदिरजस्वला तदासमृत्युमाप्नोतिपंचमंदिवसंविना वसिष्ठः यस्यमांगलिकंकार्यंतस्यमातारजस्वला अर्धंतदेव तत्रैवबृहस्पतिः प्राप्तमभ्युदयश्राद्धंपुत्रसंस्कारकर्मणि पत्नीरजस्वलाचेत्स्यान्नकुर्यात्तत्पितातदा पितेतिकर्तृमात्रोपलक्षणं संकटेतु वाक्यसारेउक्तं अलाभेसुमुहूर्तस्यरजोदोषेह्युपस्थिते श्रियंसंपूज्यविधिवत्ततोमंगलमाचरेत् ।
हा चौलसंस्कार ज्याचा करावयाचा त्याची माता गर्भिणी असतां करुं नये ; तें सांगतो - ज्योतिर्निबंधांत व मदनरत्नांत वृद्धगार्ग्य - " माता गर्भिणी असतां पुत्राचा चौलसंस्कार केला तर तिला शस्त्रापासून मृत्यु प्राप्त होतो ; यास्तव चौल करुं नये . " याचा अपवाद सांगतो - तेथेंच नारद - " माता गर्भिणी असेल तर पुत्राचें चौल करुं नये . पुत्राचें वय पांच वर्षांहून अधिक असल्यास माता गर्भिणी असतांही करावें . जर गर्भाला विपत्ति प्राप्त होईल किंवा शिशूला मरण प्राप्त होईल , असा दोष सांगितला आहे , असें कोणी म्हणेल तर मौंजीसह चौल करावें , म्हणजे तो दोष नाहीं . " बृहस्पति - " माता गर्भिणी असतां पुत्राचें क्षौर ( चौल ) करुं नये . मौंजीचें समावर्तन , वेदव्रतें ( ब्रह्मचार्यानें करावयाचीं तीं ) यांविषयींही असाच काल जाणावा . " माता गर्भिणी असली तरी पांच मासपर्यंत दोष नाहीं , असें सांगतो मुहूर्तदीपिकेंत गर्ग - " गर्भिणीला पांच महिने होऊन गेल्यानंतर ( पुत्राचें चौल केलें असतां ) मातेच्या गर्भाला मृत्यु प्राप्त होतो . " मदनरत्नांत बृहस्पति - " माता गर्भिणी असतां पुत्राचा चौल संस्कार होईल तर गुरु ( आचार्य ), दंपती , आणि शिशु हे एका वर्षांत नाश पावतात , यास्तव माता गर्भिणी असतां पुत्राचें चौल करुं नये . पांच महिन्यांचे पूर्वीं करावें , पांच महिन्यांनंतर करुं नये . " गर्ग - " ज्याला ज्वर उत्पन्न होईल त्याचें लग्न ( मंगलकार्य ) करुं नये . ज्वरादिक दोष दूर झाल्यानंतर स्वस्थ झाल्यावर धर्म ( मंगलकार्य ) करावा . " ज्योतिर्गर्ग - " विवाह , उत्सव , यज्ञ , यांमध्यें जर माता रजस्वला होईल तर कर्त्याला मृत्यु प्राप्त होतो . पांचव्या दिवशीं विवाहादि केलें असतां दोष नाहीं . " वसिष्ठ - " ज्याचें मंगलकार्य करावयाचें आहे त्याची माता रजस्वला असेल आणि पांचव्या दिवसावांचून पूर्वीच मंगल केलें असेल तर त्याला मृत्यु प्राप्त होईल . पांचव्या दिवशीं दोष नाहीं . " तेथेंच बृहस्पति - " पुत्राच्या संस्कारकर्मांत प्राप्त झालेलें नांदीश्राद्ध , जर पत्नी रजस्वला असेल तर पित्यानें तें नांदीश्राद्ध करुं नय्ये . " पित्यानें ’ म्हणजे जे कोणी कर्ता असेल त्यानें , असें समजावें . संकटविषय असतां वाक्यसारांत सांगतो - " कर्त्याची पत्नी रजस्वला झाली असून सन्निध सुमुहूर्त नसेल तर श्रीशांति करुन मंगलकार्य करावें . "
एतच्चमंडनोत्तरंनकार्यं नमंडनाच्चापिहिमुंडनंचगोत्रैकतायांयदिनाब्दभेद इति मदनरत्नेवसिष्ठोक्तेः तत्रैवकात्यायनः कुलेऋतुत्रयादर्वाड्मंडनान्नतुमुंडनं प्रवेशान्निर्गमोनेष्टोनकुर्यान्मंगलत्रयं तथावृद्धमनुः एकमातृजयोरेकवत्सरेपुरुषस्त्रियोः नसमानक्रियांकुर्यान्मातृभेदेविधीयते आशौचेतुसंग्रहे संकटेसमनुप्राप्तेसूतकेसमुपागते कूष्मांडीभिर्घृतंहुत्वागांचदद्यात्पयस्विनीम् चूडोपनयनोद्वाहप्रतिष्ठादिकमाचरेदिति ज्योतिर्निबंधे षष्ठेब्देषोडशेवर्षेविवाहाब्देतथैवच अंतर्वत्न्यांचजायायांनेष्यतेमुंडनंक्कचित् अन्योपिविशेषोविवाहप्रकरणेवक्ष्यते दीपिकायां नचूडाजन्मभाग्नेयदारुणेषुशनौकुजे प्रतिपद्भद्ररिक्तासुविद्यारंभस्तुपंचमे ।
हें चौल मंडनोत्तर ( मंगल कार्य केल्यानंतर ) करुं नये . कारण , " एक गोत्रांत ( त्रिपुरुषांत ) मंगलकार्य केल्यानंतर वर्ष भिन्न झाल्यावांचून मुंडन ( चौलादि ) करुं नये . वर्षभेद झाला असतां दोष नाहीं . " असें मदनरत्नांत वसिष्ठवचन आहे . तेथेंच कात्यायन - " एका कुलांत ( त्रिपुरुषांत ) सहा महिन्यांच्या आंत मंगलकार्योत्तर मुंडन करुं नये . आणि प्रवेश ( पुत्रविवाह ) केल्यावर निर्गम ( कन्याविवाह ) इष्ट नाहीं . आणि तीन मंगलकार्ये करुं नयेत . " तसाच वृद्धमनु - एका संवत्सरांत सहोदर अशा कन्यापुत्रांचे समान संस्कार करुं नयेत . माता भिन्न असतील तर करावे . " आशौच प्राप्त असेल तर सांगतो संग्रहांत - " मृताशौच अथवा जननाशौच प्राप्त असेल तर कूष्मांडी ऋचांनीं घृताचा होम करुन दुभती गाय ब्राह्मणाला द्यावी . आणि चौल , मुंज , विवाह , प्रतिष्ठा इत्यादि शुभ कार्य करावें " ज्योतिर्निबंधांत - " सहाव्या वर्षीं , सोळाव्या वर्षीं , विवाह केला असेल त्या वर्षीं आणि स्त्री गर्भिणी असतां कधींही मुंडन करुं नये . " इतरही विशेष निर्णय पुढें विवाहप्रकरणीं सांगूं . दीपिकेंत - " जन्मनक्षत्र , कृत्तिका , मूल , ज्येष्ठा , आर्द्रा , आश्लेषा ह्या नक्षत्रांवर ; शनि , मंगळ ह्या वारीं ; प्रतिपदा , भद्रा ( द्वितीया , सप्तमी , द्वादशी ), रिक्ता ( चतुर्थी , नवमी , चतुर्दशी ) ह्या तिथींचे ठायीं चौलसंस्कार करुं नये . विद्यारंभ पांचव्या वर्षीं करावा . "
प्रयोगरत्ने मध्येशिरसिचूडास्याद्वासिष्ठानांतुदक्षिणे उभयोः पार्श्वयोरत्रिकश्यपानांशिखामता माधवीयेप्येवं आपस्तंबस्त्वाह तूष्णींकेशान्विनीययथर्षिशिखानिदधाति यथर्षिप्रवरसंख्यया तासांमध्यशिखावर्जमुपनयनेवपनंकार्यं प्रतिदिशंप्रवपतीत्युपनयनेतेनैवोक्तेः रिक्तोवाएषोनपिहितोयन् मुंडस्तस्मैतदपिधानंयच्छिखेति श्रुतेः विशिखोव्युपवीतश्चयत्करोतिनतत्कृतमितिनिषेधाच्च सत्रेतुवचनात्सशिखंवपनमिति सुदर्शनभाष्येउक्तं यत्तुकुमाराविशिखाइवेतिलिंगंतच्छंदोगपरं अपरार्केमदनरत्नेचलौगाक्षिः दक्षिणतः कमुंजावसिष्ठानामुभयतोत्रिकश्यपानांमुंडाभृगवः पंचचूडाअंगिरसोवाजिमेकेमंगलार्थंशिखिनोऽन्येयथाकुलधर्मंवेति कमुंजाशिखा वाजिः केशपंक्तिः स्मृतिदर्पणे एकाशिखादक्षिणतोवसिष्ठगोत्रस्यपंचांगिरसोभृगोस्तु नैकाशिखाकश्यपगोत्रजानांशिखोभयत्रापियथाकुलंच एतच्छूद्रातिरिक्तविषयम् शूद्रस्यानियताः केशवेशाइतिवसिष्ठोक्तेः यत्तुपाद्मे नशिखीनोपवीतीस्यान्नोच्चरेत्संस्कृतांगिरमितिशूद्रमुपक्रम्योक्तं तदसच्छूद्रस्येतिकेचित् विकल्प इतितुयुक्तं अतएवहारीतः स्त्रीशूद्रौतुशिखांछित्त्वाक्रोधाद्वैराग्यतोपिवा प्राजापत्यंप्रकुर्यातांनिष्कृतिर्नान्यथाभवेत् एतत्परिग्रहपक्षे अत्रदेशभेदाव्द्यवस्थेतिदिक् ।
प्रयोगरत्नांत - " मस्तकाच्या मध्यभागीं शिखा राखावी . वासिष्ठांची शिखा दक्षिणेस राखावी . अत्रि आणि कश्यप यांची शिखा दोन्ही बाजूंस राखावी . " माधवीयांतही असेंच सांगितलें आहे . आपस्तंब तर सांगतो - " जितके प्रवराचे ऋषि तितक्या शिखा ठेवाव्या आणि इतर केश काढून टाकावे . त्याविषयीं मंत्र नाहीं . " चौलसंस्कारांत ज्या शिखा राखल्या असतील त्यांपैकीं एक मध्यशिखा ठेऊन इतर शिखांसह मस्तकाचें वपन उपनयनकालीं करावें . कारण , " मस्तकाच्या प्रत्येक बाजूस वपन करावें " असें उपनयनसंस्कारांत त्यानेंच ( आपस्तंबानेंच ) सांगितलें आहे . यावरुन सार्या बाजूंच्या शिखा काढाव्या असें झालें . आणि " ज्यानें डोक्याचे सर्व केश काढले तो आच्छादित नसल्यामुळें रिक्त ( सर्वरहित ) आहे . त्याला शिखा ही आच्छादन आहे . " अशी श्रुति आहे . आणि " जो शिखारहित व उपवीतरहित असून कर्म करितो , त्याचें तें कर्म केल्यासारखें होत नाहीं " असा शिखारहित असण्याचा निषेधही असल्यामुळें मध्यशिखा राखावी , असें सिद्ध होतें . सत्रयागामध्यें तर शिखासहित वपनाविषयीं वचन असल्यामुळें सर्वशिखांचें वपन होतें , असें सुदर्शनभाष्यांत सांगितलें आहे . आतां जें " शिखारहित जसे कुमार शोभतात " या मंत्रावरुन शिखारहित कुमार असतात असें होतें , तें छंदोगशाखाविषयक आहे . अपरार्कांत आणि मदनरत्नांत लौगाक्षि - " वसिष्ठांची शिखा दक्षिणेकडे राखावी . अत्रि व कश्यप यांची शिखा दोन्ही बाजूंस राखावी . भृगूला शिखा राखूं नये . आंगिरसांना पांच शिखा राखाव्यात . कितीएक मंगलाकरितां केशपंक्ति राखितात . इतरांनीं आपल्या कुलधर्माप्रमाणें शिखा राखाव्या . " स्मृतिदर्पणांत - " वसिष्ठगोत्राला दक्षिणेकडे एक शिखा असावी . आंगिरसांना पांच शिखा . भृगूंना एकही शिखा नाहीं . कश्यपगोत्रजांना दोन्ही बाजूंस शिखा असाव्यात . आणि आपल्या कुलधर्माप्रमाणें शिखा राखाव्यात . " हे शिखांचे विधि शूद्रव्यतिरिक्तविषयक आहेत . कारण , " शूद्रांचे केशवेष अनियत ( नियमरहित ) आहेत " असें वसिष्ठवचन आहे . आतां जें पाद्मांत - " शूद्रानें शिखा राखूं नये , उपवीत धारण करुं नये , आणि संस्कृतवाणीचा उच्चार करुं नये " असें सांगितलें तें असच्छूद्राला समजावें , असें केचित् सांगतात . शूद्राला शिखेविषयीं विकल्प समजावा , हें तर युक्त आहे . म्हणूनच सांगतो हारीत - स्त्रिया व शूद्र हे क्रोधाच्या आवेशानें अथवा वैराग्यानें शिखा तोडतील तर त्यांनीं प्राजापत्य प्रायश्चित्त करावें . त्यावांचून त्यांची निष्कृति होणार नाहीं " , हें वचन शिखाधारणपक्षीं जाणावें . शूद्राला शिखाधारणाचा विकल्प आहे . कोणता पक्ष घ्यावा याची देशभेदानें व्यवस्था जाणावी . याप्रमाणें ही दिशा दाखविली आहे .
ज्योतिर्निबंधे नर्मदोत्तरदेशेतुसिंहस्थेदेवमंत्रिणि शुभकर्मनकुर्वीतनिषेधोनास्तिदक्षिणे अत्रभोजने प्रायश्चित्तमुक्तंपराशरमाधवीये निवृत्तेचूडहोमेतुप्राड्नामकरणात्तथा चरेत्सांतपनंभुक्त्वाजातकर्मणिचैवहि अतोन्येषुतुसंस्कारेषूपवासेनशुध्यति एतेसंस्काराः स्त्रीणाममंत्रकाः कार्याः होमस्तुसमंत्रक इति प्रयोगपारिजाते आश्वलायनोपि होमकृत्यंतुपुंवत्स्यात्स्त्रीणांचूडाकृतावपीति मनुरपि अमंत्रिकातुकार्येयंस्त्रीणामावृदशेषत इति होमोप्यमंत्रक इत्येके संस्काराः स्त्रीणामहोमकास्तूष्णींस्युरितिस्मृत्यर्थसारेहोमोनेतिवृत्तिकृत् ।
ज्योतिर्निबंधांत - " सिंहस्थ गुरु असतां नर्मदेच्या उत्तर देशीं मंगलकार्य करुं नये . नर्मदेच्या दक्षिणदेशीं निषेध नाहीं . " ह्या चौलसंस्कारीं भोजन केलें असतां प्रायश्चित्त सांगतो पराशरमाधवीयांत - " चौलसंस्कार व नामकरणाचे पूर्वी जातकर्म , यांचे ठायीं भोजन केलें असतां सांतपनकृच्छ्र प्रायश्चित्त करावें . यांहून जे इतर संस्कार त्यांचे ठायीं भोजन केलें असतां उपवास करुन शुद्ध होतो . " हे जातकर्मापासून चौलापर्यंत संस्कार स्त्रियांचे अमंत्रक करावे , होम मात्र समंत्रक करावा , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे . आश्वलायनही - " स्त्रियांचे चौलसंस्कारांतही होमकृत्य , पुरुषासारखें समंत्रक करावें . " मनुही - " स्त्रियांचे सर्व संस्कार ( विवाहावांचून ) मंत्रविरहित करावे . " होमही अमंत्रक करावा , असें कितीएक सांगतात . स्त्रियांचे संस्कार होमविरहित अमंत्रक होतात , असें स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे . होम करुं नये . असें वृत्तिकार सांगतो .