कांबड नाचाची गाणी - पावण्या
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पावण्या
धवल्या घोड्यावरी बसून नारायनु आला
महादेव आमुचा भोला, महादेव आमुचा भोला
सांगते कारभारनीला नारानु पावण्या आला
बोलव ग हिरव्याला, पलीवं धाड त्याला
आनावी मुवाची सोगल दारू
धरावा सात शिर्या कोंबडा
करावी आनंदायी भोजना...
जेवन खावून त्रिपत झालं
घराला निघून गेलं रं
घराला निघून गेलं!
पाहुणा
शुभ्र घोड्यावर बसून नारायण आला
महादेव आमुचा भोळा महादेवा भोळा
सांगतो कारभारणीला, नारान पाहुणा आला
बोलाव ग हिरवेदेवाला, अड्ड्यावर पाठव त्याला
आणवी मोहाची अस्सल दारू
धरावा सात शिरांचा कोंबडा
करावे आनंदाने जेवण....
जेवून खावून तृप्त झाले
घरी निघून गेले रे
देव घरी निघून गेले!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP