कांबड नाचाची गाणी - कांबड धानी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कांबड धानी
धीना गायेला रं देवा
धीना मी गायेला रं..
धीना गायेला रं यो पण धनतरी मातं, धीना.....
धीना गायेला रं यो पण कणसरी मातं, धीना.....
धीना गायेला रं यो पण गावतरी मातं, धीना.....
धीना गायेला रं यो पण नारान देवा, धीना.....
धीना गायेला रं यो पण हिरोबा देवा, धीना.....
धीना गायेला रं यो पण हिमाय देवा, धीना.....
धीना गायेला रं यो पण तारा धीना, धीना.....
(तारा धीना-चांदणगण/ चांदण्यात गात असलेला गण)
कांबड नाचाचा गाण
गण गात आहे रे देवा
गण गात मी आहे रे....
गण गात आहे मी तुझ्यासाठी धनतरी माते
गण गात आहे मी तुझ्यासाठी कणसरी माते
गण गात आहे मी तुझ्यासाठी गावतरी माते
गण गात आहे मी तुझ्यासाठी नारान देवा
गण गात आहे मी तुझ्यासाठी हिरोबा देवा
गण गात आहे मी तुझ्यासाठी हिमाय देवा
गण गात आहे मी, चांदणगण, गण गात आहे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP