मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ५४ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ५४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत वक्रतुंडचरितसमाप्तिः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । याज्ञवल्क्य विश्वामित्रा सांगत । नंतर मी परमप्रीत । जनार्दना प्रणाम करुन जात । योगाभ्यासार्थ तपोवनीं ॥१॥पंचधा वृत्ति क्रमशः जिंकून । चित्तसाधनांचें साहाय्य घेऊन । गण्पा त्या शांतियोगें प्रसन्न । केलें मिळविला तदनुग्रह ॥२॥म्हणोनि तूं शरण जा त्वरित । त्या वक्रतुंडा देवाप्रत । तेणें ब्राह्मणवंद्यता तुज लाभेल निश्चित । विश्वामित्रा महामुने ॥३॥गायत्रीजपानें जें प्राप्त । तें श्रेय ल्दे गजाननाप्रत । त्यामुळे विघ्नहीन होऊन शाश्वत । मित्रभावें राहशील जगीं ॥४॥या विश्वांत सर्वत्र । मित्र भावें तूं कृतार्थ । विश्वामित्र हें नाव सार्थ । तेव्हां जगतीं होईल ॥५॥मुद्गल म्हणती ऐसीं सांगून । याज्ञवल्क्य पूजा स्वीकारुन । गणेशाय नमः हा नाममंत्र उच्चारुन । निघून गेला तेथोनी ॥६॥तेव्हापासून गायत्री जपत । विश्वामित्र धर्मज्ञ अविरत । अहंकार मत्सर सोडून मनांत । विनीतभावें ध्यान करी ॥७॥गणेशार्पण भावें जप करी । गजाननाचें स्मरण करी । त्याचें ध्यान अविरत हरी । अहंकार मत्सरादी तयाचा ॥८॥गायत्री ही वेदमाता । प्रणव हा म्हणती पिता । तोच हा गणनाथ तत्त्वता । ॐकाराकृति मस्तक ॥९॥सगुण हा गणराज ख्यात । ॐकार रुपें जगांत । त्याला गायत्रीजप अर्पण करित । तेणे योगलाभ तयाला ॥१०॥नंतर अल्प कालांतरें जात । लोकपितामह ब्रह्मा प्रमुदित । विश्वामित्रा ब्राह्मणत्व देत । दक्षा कथाभाग मुद्गल सांगती ॥११॥वसिष्ठ मुनी त्यास पूजिती । ब्राह्मणं सह अतिप्रीती । विश्वामित्र महातेजस्वी जगतीं । ब्राह्मण आज प्रख्यात ॥१२॥ह्याची सप्तर्षींत गणती । महातेजस्व्याची महर्षी करिते । तैशी गणेशभक्तांच ख्याती । मुख्यत्वें जगतीं । ब्राह्मण आज प्रख्यात ॥१३॥नित्य पूजाप्रकारांनी पूजित । गजानना त्या यथामति स्तवित । सुस्थिर होऊन भक्तींत । विश्वामित्र अति आनंदे ॥१४॥गणनाथास विघ्नेशास । निर्गुणास गुणपतीस । सर्व वेत्त्यांत श्रेष्ठास । सर्वां प्रिय तुज नमस्कार ॥१५॥गजाकार देवासी । गणेशासी गजावक्त्रासी । ब्रह्मपतीसी अनादीसी । आदि पूज्यासी नमो नमः ॥१६॥सर्वसिद्धि प्रदात्यासी । नाना मायाधारकासी । मायिकां मोहदात्यासी । मोहहीना तुज नमो नमः ॥१७॥बुद्धीच्या पतीसी । बुद्धिपंचक धारकासी । मनोवाणीमयासी । मनोवाणीहीना नमन ॥१८॥सिंहारुढासा देवपतीसी । देवदेवेशसेव्यासी । अनादिसिद्धासी चतुर्भुजासी । मूषकध्वजा नमस्कार ॥१९॥मूषकवाहनासी हेरंबासी । लंबोदरासी शूर्पकर्णासी । योग्यांच्या कुलदेवासी । योगिपतीस नमस्कार ॥२०॥ऐसी तो स्तुति करित । गजानन तेव्हां प्रादुर्भूत । अनंत आदित्यसंकाश असत । सिंहारुढ महोदर ॥२१॥त्यास पाहून साष्टांग नमित । साश्रुनेत्र महामुनि त्वरित । सर्वांग त्याचें पुलकित । भक्तिभावें संप्लुत ॥२२॥गणराज मुनिसत्तमा सांगत । तू रचिलेलें स्तोत्र पुनीत । मला प्रीतीकार जगांत । वाचिता मान्य होय हें ऐकता ॥२३॥त्या नरासी मी देईन । भुक्तिमुक्ति मी प्रसन्न । तू माग वर ते पुरवीन । दुर्लभ असले तरीही ॥२४॥गणेशवचन ऐकून । झाला मुनि सावधान । त्या प्रभूसी नमून । महाभक्तीनें स्तवन करी ॥२५॥विश्वामित्र म्हणे वंश धन्य । जन्म तप यश धन्य । मातापितरें ही धन्य । देवा त्वदंध्रियुगदर्शनें ॥२६॥काय मागूं गणाधीशा जगांत । सर्व मायात्मक असत । म्हणोनि तुझी दृढ भक्ति दे चित्तांत । नाथा तुला नमस्कार ॥२७॥गाणपत्यांत संवास मिळावा । मजला हा वर द्यावा । हाच मायामोह विनाशक पुरवावा वर देवा गजानना ॥२८॥‘तथास्तु’ म्हणोनी अन्तर्धान । पावले तेव्हा गजानन । विश्वामित्र तेव्हापासून । गाणपत्य थोर झाला ॥२९॥ऐसे नानावतार । वक्रतुंडाचे सिद्धीप्रद उदार । भक्तांचे संरक्षक सुंदर । दानवांचे विनाशक ॥३०॥त्या सर्व अवतारांचे चरित्र । वर्णन करण्या पवित्र । प्रयत्न करणें सुपात्र । असंभव विस्तारानें ॥३१॥म्हणोनि संक्षेपानें सांगितलें । वक्रतुंडाचें चरित्र भलें पापनाशक भुक्तिमुक्तिप्रद जें झालें । दक्ष प्रजापते जगांत ॥३२॥जो नर हें ऐकेल । भक्तीनें अन्यां ऐकवील । तो कृतकृत्य होईल निःसंशय जगतांत ॥३३॥पुत्रपौत्रद धनधान्यकर । विद्या आयुष्यप्रद सुंदर । दक्षचरित हें परम सुखकर । सांगितले तुज मी दक्षा ॥३४॥मुद्गल म्हणती तदनंतर । सहस्त्र माघस्नांनी जें पुण्य नर । प्रयागीं मिळवील तें समग्र । वक्रतुंड चरित ऐकतां ॥३५॥आजन्म मरणांत काशीवास । त्याचें फळ जें अति सुरस । तें लाभे यथाविधि ऐकणारास । दक्षचरित्र यथाशास्त्र ॥३६॥इष्टापूर्वादिक समाजकल्याणपर । यज्ञयाग विहीरी बांधी उदार । करता मिळें जें लाखवार । तें पुण्य या पुराणश्रवणें ॥३७॥सांग यज्ञाचें फल लाभत । याच्या श्रवणानें जगांत । काय सांगावें बहुत । ब्रह्मभूयप्रद हें चरित्र ॥३८॥याचें श्रवण जो करित । तो महामते होत पुनीत । अंती त्यासी मुक्ति लाभत । ऐसें अपूर्व माहात्म्य याचें ॥३९॥सूत सांगती शौनकांप्रत । इतुकें सांगून मुद्गल थांबत । तें सर्व चरित्र अद्भूत । कथिलें मी तुम्हांप्रती ॥४०॥वक्रतुंडाचें माहात्म्य कथिलें । शौनका संक्षेपानें वर्णिलें । तुझ्या भक्तिभावें मुखरित केलें । विशेषें करुन मजलागी ॥४१॥मुनिसत्तमा ऐकण्यास । इच्छा आणखी आहे का सरस । तुझ्या सुप्रसादें सुरस । संतुष्ट मीं निःसंशय ॥४२॥वक्रतुंडाचें महिमान । गुह्य वेदरहस्यक शोभून । गोपनीय विशेषे करुन । तेणें सिद्धि नरास लाभे ॥४३॥हें चरित्र दुर्जनांना । तैसेंचि गणेशद्वेष्टयांना । पापकर्मे करणार्यांना । विषयीजनां हें न सांगावे ॥४४॥जरी यांच्यापुढें वाचित । महामुने हे अपूर्व चरित । तरी त्यावर कोप होत । वक्रतुंडाचा निश्चित ॥४५॥ऐश्या कुपात्रां ऐकवित । तरी दहा पूर्वज होय पतित । दहा अपर वंशज पडत । नरकामाजीं सर्वदा ॥४६॥म्हणोनी साधुजनांसी । तैसेंचि गाणपत्यांसी । प्रयत्नें हें सांगणारासी । महापुण्य लाभेल ॥४७॥तो स्वजन कोटी उद्धरील । ऐसा वक्ता श्रोता अमल । स्वकुलोद्भव कोटी विमल । पुरुषसमूह तारील ॥४८॥कलिकल्मष जाळीत । वक्रतुंडाचें हें चरित । कृतयुगांदींत तें दहन करित । पापगणांना हें आश्चर्य नसे ॥४९॥अहो कलींत विकुंठ असत । सर्वदेव चरित्रक उदात्त । गाणपत्य विशेष गतिद ख्यात । सदा सर्वदा जगतांत ॥५०॥शौनक मुने तुज सांगितलें । वक्रतुंडांचें चरित स्तविलें । विप्रर्ष तेणें जीवन झालें । कृतकृत्य माझें सांप्रत ॥५१॥धन्य मे आपुल्या संगतींत । जेथ झालें स्मरण उदात्त । परेश गणेशाचें चरित । सफल माझा जन्म झाला ॥५२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते वक्रतुंडचरित्रसमाप्तिर्नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।॥ इति श्रीमुद्गलपुराणे प्रथमः खंडः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP