मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ९ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अष्टधाप्रकृतिवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीशिव पुढील कथा सांगती । गुणेशा झाली ज्ञानप्राप्ति । वरदानाच्या प्रभावें निश्चिती । सृष्टिनिर्माण कारणीं ॥१॥जेव्हा त्यानें आणिले मनांत । तेव्हा निश्वासांतून निःसूत । वेद तत्क्षणीं झाले ज्ञात । सर्वज्ञानकर प्रभायुक्त ॥२॥सज्जनांचे गुरु साक्षात् । निर्मिले तदनंतर जगांत । गुणेशानें समभूतात्मक त्वरित । सुषुप्तिसंज्ञ महत्तत्त्वसम ॥३॥आनंदाचा व्यवहार होत । म्हणोनी प्रधान हें नाम ख्यात । द्वंद्वभावांचे कारण असत । कारणक नावही म्हणोनी ॥४॥माया तमोगुणातें निर्मित । म्हणोनी तामसता तिज प्राप्त । समान व्यवहार प्रधान होत । मोहदायक ते झालें ॥५॥स्वत्त्वाचा जडभाव ज्ञात । त्याच्या साहाय्यें सदा होत । कर्तव्य अकर्तव्य जेणें ज्ञात । त्यासी म्हणती महत्तत्त्व ॥६॥त्या महत्तत्त्वानें महा उग्र तप । दिव्य सहस्त्रवर्षे अमाप । करिता प्रकटला गणेश सुरुप । भक्तवत्सल प्रत्यक्ष ॥७॥त्यातें स्तविलें पूजिलें । त्या महायश महत् तत्त्वें भले । त्यासी सामर्थ्य योगरुप दिलें । परम प्रसन्न होऊन ॥८॥वेदांनींही घोर तप केलें । परम दारुण तेव्हा झालें । प्रगट त्यांना विघ्नेश भले । विघ्नवारण गजानन ॥९॥वेदांनींही स्तविला देव । आपापल्या स्तोत्रांनीं अभिनव । ब्रह्मणस्पति सूक्तानें स्वभाव । प्रकट केला बहुऋचांनी ॥१०॥गणेश-शांतिकर रचून । यजुर्वेदे केलें स्तवन । नामाष्टकार्थस्तोत्र गुंफून । सामवेदही स्तुती करी ॥११॥अथर्वशीर्षाची रचना केली । आथर्वण वेदानें भली । गाणपत्यांनी त्या वेळीं । विविध स्तोत्रें विरचिलीं ॥१२॥मूळमंत्रानें गणेश पूजिला । तेव्हां विघ्नहर्ता प्रसन्न झाला । त्यानें वेदांसी वर दिधला । सर्वांचे गुरु तुम्ही व्हाल ॥१३॥सर्वमान्य जगता पूज्य । त्यानें केले वेदां योग्य । सांगोपांगसमाचार वन्द्य । गुरु केले जगताचे ॥१४॥पार्वती तेव्हां शंकरासी विचारी । समरुपक प्रधान काय करी । गणेशवर लाभून तदनंतरीं । तें सांगावें मजलागीं ॥१५॥प्रियेनें ऐसा प्रश्न केला । तेव्हां महेश्वर आनंदला । स्मित करुन म्हणाला । शांतिप्रिय श्रीशंकर ॥१६॥मुद्गल म्हणती श्रीशंकर । रोमांचित झालें ज्यांचे शरीर । सांगती पार्वतीस सत्त्वर । विभूती त्या प्रधानाची ॥१७॥गणेश प्रीती वर्धक अससी । प्रधान तत्त्वाचें कार्य पुससी । ऐक आतां सांगतों तुजसी । त्या प्रधानें काय केलें ॥१८॥गणेशाचा वर लाभतां । सूक्ष्मतत्त्वाची रचना तत्त्वता । हिरण्यगर्भ अंतरी सात्त्विकता । स्वप्नरुप सूक्ष्मभूतयुत ॥१९॥महदादि तत्त्वांनी संवृत । द्वंद्व विज्ञानमूळ अंतरिक्षस्थित । बोधहीन ते सूक्ष्मतत्त्व करित । कठिण तप त्या वेळीं ॥२०॥त्याच्या तपें संतुष्ट होत । गणेशान कृपावंत । वरदानें त्याच्या होत । नाना सामर्थ्ययुत तेव्हां ॥२१॥सूक्ष्म हिरण्यगर्भ भगवन्त । स्वप्नमायाधर प्रभू निर्मित । स्थूलस्वरुप राजस पुनीत । स्थूल तत्त्वांकित भोगकर ॥२२॥त्यानेंही तप सुदारुण केलें । गणेश देवा तोषविलें । करुणानिधीने त्यासही दिले । प्रसन्न होऊन वरदान ॥२३॥त्या जाग्रत् अन्नमयास । सामर्थ्य बहुविध अनायास । अनेकांची रचना सुरस । करी अन्नमय ईश्वर तें ॥२४॥जागृति स्वप्न सुषुष्ती नामक । विविधा अवस्था कोटिशः पावक । प्रगटल्या तें सुखदायक । रोमारोमांतून गुणेशाच्या ॥२५॥भिन्न भिन्न अंडीं सर्वत्र निःसृत । त्यांसी व्यापी गुणेश्वर त्वरित । त्यांच्या अभेदभावें होत । प्रकृति ब्रह्मबिंदुका तें ॥२६॥जाग्रत तत्त्वें आकाश निर्मिलें । सर्व प्रकाशमय ब्रह्म तें झालें । शब्द गुणमात्रें विनटलें । सनातन ते आदी रुप ॥२७॥आकाशानें वायू निर्मिला । स्पर्श गुणात्मक तो जाहला । रुपतन्मात्राचा सृजक झाला । तेज निर्मिती करुन ॥२८॥त्या तेजानें निर्मिलें । रसगुणयुक्त आपतत्त्व भलें । त्या जलतत्त्वानें रचिले । स्वरुप गंध गुण पृथ्वीचे ॥२९॥धारणात्मक पृथ्वी असत । पंचीकरण तत्त्वानें चार भूतें प्रवेशत । त्यायोगें पृथ्वी होत । पंचगुणा त्या वेळीं ॥३०॥आपतेजवायु आकाश । असता तीं चार भूतें समस्त । आप जाहलें चारगुणयुक्त । तेजवायू आकाश प्रभावें ॥३१॥तेज त्रिगुणयुक्त झालें । दोन भूतांच्या प्रवेशें बनलें । वायूचें द्विगुणमय झालें । रुप आकाश प्रवेशानें ॥३२॥आकाश एक गुण झालें । ब्रह्म त्यांचें नांव म्हणाले । ऐशा रीती जाहलें । निर्माण पंचमहाभूत संघ ॥३३॥आकाश शब्दगुण एक गुण । वायू शब्दस्पर्शयुक्त द्विगुण । तेज शब्द स्पर्शरुप त्रिगुण । आप चतुर्गुणयुक्त होय ॥३४॥शब्दस्पर्शरुपरसयुक्त । चतुर्गुणयुक्त आप असत । शब्द स्पर्शरुप रस गंधयुक्त । पृथ्वी जाहली पंचगुणा ॥३५॥पंचमहाभूतें तीन अवस्थायुत । अष्टधा प्रकृती म्हणत । कोशरुपा सुशोभना वर्तत । ऐसें शास्त्र सांगितलें ॥३६॥त्यांत कोशीस्वरुपे बिंबित । गुणेश तेणें सामर्थ्य प्राप्त । अष्टरुप प्रकृति सुव्यक्त । अष्टावरणयुत अंडे सृजी ॥३७॥त्यांतून विराट पसरला । हे प्रिये, ऐशिया परी झाला । पन्नासकोटी विस्तार भला । पृथ्वीचा जो मे सांगितला ॥३८॥त्याहून दशाधिक आप विस्तार । त्याहून दहा अधिक तेज फार । त्याहून दशकोटी अधिक वायुविस्तार । त्याहून आकाश दशाधिक ॥३९॥त्याहून दशाधिक वर्तत । जाग्रत् अभिमान ऐसें सांगत । त्याहून दशाधिक होत । स्वप्नाभिमान महत्तत्त्व ॥४०॥त्या महत् तत्त्वाहून अधिक । दशगुणा माया सोषुप्तिक । गाढ झोपेंत जी प्रकट अलौकिक । गुणेश पुरुष परि अनंत ॥४१॥तो अपार चतुर्थक ज्ञेय । त्यानें रचिली ही माया अज्ञेय । विराटाचें आवरण कार्य । पृथ्वी करी सनातना ॥४२॥पाण्यानें वेढिलें पृथ्वीतें । तेजानें वेढिलें आपतत्त्वातें । वायू वेढी त्या तेजातें । आकाशें वेढिला वायुहि तो ॥४३॥अहंकारे आकाश संवृत । पार्वती तेव्हा सदोदित । अहंकार महत्तत्त्वें आवृत । महत् माया प्रभावें ॥४४॥स्वप्नसंज्ञ महत्तत्त्व संवृत । मायेने ते आवरण आन्त्य । ज्ञानी लोकांनी जाणावें सांप्रत । आठ आवरणयुक्त हें ब्रह्माण्ड ॥४५॥ऐशीं ब्रह्माण्डें असंख्यात । प्रिये जाहली खालीवर तिरपी समस्त । गुणेश ज्यांचा धारक होत । स्वरुप अष्टधा प्रकृतीचें ॥४६॥त्या नाना ब्रहाण्डांचे वर्णन । श्रवण करण्या उत्सुक मन । पुढिले अध्यायीं कथन । तोषवी शिव पार्वतीतें ॥४७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन् मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते प्रकृतिवर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP