मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ४० खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ४० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत ब्रह्मणस्तपश्चरणम Translation - भाषांतर श्रीगणेश नमः । दक्ष तेव्हां मुद्गला म्हणत । धन्य मी अनुगुहीत । कीं तुम्हीं कथिलें अद्भुत । ब्रह्मप्रद चरित्र वक्रतुंडाचें ॥१॥तें ऐकून वारंवार । तरीही तृप्ती न होत अनिवार । अमृतासम ते ऐकण्या अधीर । सांगा ब्रह्मदेवाची ती कथा ॥२॥पापनाशिनी ही कथा सांगावी । विस्तारानें मजसी बरवी । श्रोत्यास पृच्छका वक्त्यास व्हावी । सर्व सिद्धि प्राप्त येणे ॥३॥सूत सांगती मुनीं प्रत । ऐसें ऐकून दक्षाचे प्रार्थित । मुद्गल म्हणती सांप्रत । ऐक दक्षा महाभागा ॥४॥धन्य तू निःसंशय जगांत । प्रीति वाटे तुज गणराजकथेंत । अल्पपुण्य ज्यांचें असत । त्यांसी नावडे ढुंढि कथा ॥५॥तुझ्या आदरप्रश्नें तोषित । तुज ती दिव्य कथा संक्षेपात । गणेशमहात्म्याची मी सांगत । ऐक गणेशें काय केलें ॥६॥प्रलयापूर्वी पाच सुराधिप निर्मित । त्यांच्या तपःप्रभावें प्रसन्न होत । त्या वरप्रभावें ते समर्थ होत । स्वकार्यांत सावधान ॥७॥सृष्टि निर्माण कार्यांत । ब्रह्मदेव प्रवृत्त होत । परी गणेशानांवे न स्मरत । कार्यारंभी अर्चन विसरुन त्याचें ॥८॥तो मनांत गर्व करीत । माझ्या सम अन्य नसे त्रैलोक्यांत । मीच निर्माता अखिल विश्वांत । एकमेव । अद्वितीय ॥९॥मी जग निर्माण करित । तदनंतर विष्णु पालक होत । रुद्र त्यासी संहारित । शक्ती मोह निर्मीतसे ॥१०॥सूर्य कर्मप्रकाश करित । तेजस्वी प्रभू तो जगांत । परी मी विश्व न सृजित । तरी तो सूर्य काय करीं? ॥११॥माझी पात्रता पाहून करित । मजसी आज्ञा प्रथम संतुष्ट । सृष्टि निर्माण करण्या उचित । मानलें मजसी गणेशानें ॥१२॥म्हणोनी माझ्यासम अन्य नसत । ऐसा गर्व धरी मनांत । तेव्हां विघ्नेशाचे गण बहुत । निर्माण झाले सभोवार ॥१३॥ते सृष्टिरचका विधीस ताडिती । नाना रुपें घेऊन छळिती । त्रिनेत्रधर वा पंचनेत्र असती । पाठीलाही नयन त्यांच्या ॥१४॥दशतुंड सहस्त्रमुखें दाविती । नानारुपें गुण घेती । महावीर ते मारिती । विधीस हातीं धरुनी ॥१५॥बाळ खेळण्यासंगें खेळत । तैसे ते गण ब्रह्मदेवा छळित । तेव्हां गर्व सोडून शरण तो जात । विघ्ननायका गणेशाला ॥१६॥गर्व सोडून हृदयात । जेव्हा ब्रह्मदेव स्मरण करित । तेव्हां गणनायक तुष्ट होत । विघ्नगण अन्तर्धान पावलें ॥१७॥ब्रह्मदेव निर्विघ्न होऊन । परम तप आचरुन । षडक्षर मंत्रज्प करुन । वक्रतुंडा तोषविलें ॥१८॥पादांगुष्ठाग्री उभा राहत । वायुभक्षणें तो जगत । तेजसा वृत्ति लावित । गणेशांत निश्चल तें ॥१९॥ऐसें दिव्य सहस्त्र संवत्सर । तप केलें त्यानें उग्र । व्याकुळ झालीं भूतें समग्र । तेव्हां तोषला वक्रतुंड ॥२०॥तेजोरुपी महाकाय प्रकटत । चतुर्भुज सिंहारुढ दिसत । त्रिनेत्रधर पाशांकुशयुक्त । वरद अभय मुद्रांकित ॥२१॥पृथुवक्ष महोदर विराजित । सिद्धिबुद्धियुत चिंत्तामणि युक्त । नाना अलंकार संयुक्त । शेषभक्ति गजानना ॥२२॥सिंदुर अरुण देहधारी । नाना वस्त्रें अंगावरी । भयभीत त्यास पाहुनी उरी । प्रथम झाला विधाता ॥२३॥परी नंतर स्तवन करित । गणेशा चिंतून हृदयांत । नाना स्तोत्रें म्हणत । तेव्हा वक्रतुंड त्यास म्हणे ॥२४॥विधात्या तू वर माग वांछित । तो मी देईन तुज निश्चित । ऐकून वच घनगंभीर तें त्वरित । म्हणे सौम्यरुपें वर देई ॥२५॥तेव्हा सौम्यतेज युक्त होऊन । म्हणे विधात्यास गजानन । स्वानंदनगरीं माझे वसन । सदा ऐसेचि विलसतसें ॥२६॥मृत्युलोकांत तू राहसी । तरी हें रुप कैसें पाहसी । तुझ्या तपानें भक्तिभावेसी । तोषून धरिलें सौम्यरुप ॥२७॥तूं माझ्यापासून मागून घ्यावें । आता इच्छित मनींचे सांगावें । मी प्रसन्न होता काय व्हावें ॥ दुर्लभ तुला विश्वांत? ॥२८॥गणेशाचें वचन ऐकून । ओंजळ करांची जोडून । प्रथम तयासी प्रणाम करुन । स्तुति स्तोत्र मग गाई ॥२९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमत्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते ब्रह्मणस्पश्चरणं नाम चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP