मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ४५ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ४५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत दंभासुरशांतिकथनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दक्षासी मुद्गल सांगती । दंभाचे कौशल्य वर्णिती । असुर स्वभाव सोडून स्थिति । विगज्वर होत त्याची ॥१॥प्रातःकाळीं उठून । दैत्यां सर्वां बोलावून । तयांसी म्हणे वचन । शुक्राचार्यां सन्निध ॥२॥आपुल्या गुरुनें सांगितलें । तें मज योग्य वाटलें । वक्रतुंडा शरण पाहिजे गेले । कल्याणार्थ निःसंशय ॥३॥तो सुरांचा न अधिपति । तैसाचि दैत्याधिप न जगतीं । ब्रह्माकारें सर्वत्र वसति । सिद्धिबुद्धि पतीची त्या ॥४॥त्याचें तें वचन ऐकून । दानव सारे झाले खिन्न । दंभासुरासी सोडून । गेले आपापल्या घरीं ॥५॥असुर जरी क्रुद्ध झाले । दंभासुरानें मनीं ठरविलें । गणेशाचें पूजन पाहिजे केलें । अन्य उपाय असेना ॥६॥शुक्राचार्यांसहित गेला । दंभासुर शरण गणनाथाला । देवांच्या सन्निध जो विलसला । दंभाच्या नगरा बाहेर ॥७॥साष्टांग नमन त्यासी करुन । करांची ओंजळ जोडून । यथान्याय पूजन करुन । गणध्यक्षाचें स्तवन करीं ॥८॥ब्रह्मरुपासीं ब्रह्माकार शरीरासी । ब्रह्मासी ब्रह्मदात्या गणेशासी । देवेशासी दैत्यदानवरक्षकासी । सर्वत्र योगरुपासी नमन ॥९॥भावहीनासी सिद्धिबुद्धिपतीसी । सिंहध्वजासी गणांच्या पतीसी । हेरंबासी एकदंतासी । अनंत विभवा तुज नमन ॥१०॥विघ्नेशासी महाविघ्ननाशकासी । अपार गुणधारासी दैत्यदानवमर्दकासी । मनोवाणीमयासी । सर्वरुपासी नमन असो ॥११॥मनोवाणीविहीनासी । योग्यांसी योगदायकासी । योगनाथासी योगासी । विश्वपतीसी नमस्कार ॥१२॥मायाधारासी मायाचालकासी । मायाहीनासी सर्वत्र समभावधरासी । अव्यतासी व्यक्तिमूलधरासी । निर्मोह लंबोदरा तुज नमन असो ॥१३॥सांगो वेदही समर्थ नसत । ज्याचें स्तवन करण्या जगतांत । योगींद्र त्रिमूर्तीही थकत । तेथे मीं काय स्तवणार पामर? ॥१४॥ऐसें बोलून धरणीवर । भक्तिभावें पडला दंभासुर । त्याला उठवुनी सत्वर । गणाधीश बोलती तें ॥१५॥दंभासुरा त्वां केलें स्तवन । तें जो वाचील भक्तियुक्त मन । अथवा ऐकवील अन्यांलागून । विनष्ट सर्व तो मिळवील ॥१६॥पुत्रपौत्र कलत्रादींनी युक्त । धनधान्यादींनी संपृक्त । आधि व्याधि विनिर्मुक्त । उपद्रव सर्व नष्ट त्याचा ॥१७॥एकवेळ दोन वेळ । वाचील अथवा त्रिकाळ । जो नर हें स्तोत्र अमल । प्रिय माझा तो होईल ॥१८॥क्रोधवश तुज मारावयासी आलों । परी भक्तींने तव तोषलों । मारणार नाहीं तुज पावलों । चित्तीं आता समाधान ॥१९॥तुझ्या चित्तांत जें कांक्षित । तें वररुपें मग त्वरित । भक्तिभावानें मी संतुष्ट । मागशील तें देईन ॥२०॥गणेशाचें तें वचन । दंभ बोले ऐकून । हर्षभरित त्याचें मन । भक्तिनम्र त्यावेळीं ॥२१॥माझ्यावरी तोषलासी । तरी हाचि वर देई मजसी । तुझ्या अचल दृढ भक्तीसी । माझ्या मनीं स्थान मिळो ॥२२॥माझ्या जीववृत्तीची सोय करी । निवासही दे मज सत्वरी । कामना सफल होईल तुझी ॥२४॥माझ्यावरी अव्यभिचारी । भक्ती तुझे जडेल खरी । आपुल्या स्थानीं राहून करी । आनंदानें ध्यान माझें ॥२५॥तू मज नससी न्यून । देवही अधिक प्रिय कदापि न । आपापल्या धर्मीं राहून । उभयही तुम्हीं प्रिय मला ॥२६॥आपुला धर्म जे सोडिती । त्यांवरी माझा कोप अती । त्यांचा नाश मी करितो जगतीं । ऐसे जाण महा असुरा ॥२७॥आतां तूं निर्भय रहावें । जेथ कार्यारंभी विस्मृतिभावें । विसरतील जन सर्वभावें । दंभभावें तेथ राही तूं ॥२८॥त्यांचा कार्यनाश तूं करी । कर्मारंभीं न पूजित जरी । त्यांचें कार्य निष्फल तरी । दंभासुरा तू करावें ॥२९॥माझे प्रिय जे भक्त जगांत । त्यांना रक्षी प्रयन्तें विनत । दंभभावहीनता त्यांसी प्राप्त । ऐसें करी सर्वदा ॥३०॥जेथ आरंभीं नसें माझें स्मरण । तैसेंचि पूजन मनन । तेथ तुझा भाग जाण । जीवितवृत्ति ती तुझी ॥३१॥ऐसा वर दंभासि देत । गणेश नंतर अंतर्धान पावत । जयजयकार करुन परतत । देव मुनिगण सर्वही ॥३२॥देव गेले स्वर्गांत । विसावले पाताळांत । आपापाल्या स्थानीं भयवर्जित । दीप्तिमंत ते राहती ॥३३॥ऐशिया प्रकारें शांत । दंभासुर केला गजाननें विनीत । ब्रह्मदेवाचा होऊनि सुत । क्रीडा दाखवी वक्रतुंड ॥३४॥जो हें चरित्र नित्य ऐकत । अथवा अन्यां ऐकवित । तो दंभभय विनिर्मुक्त । सनातन ब्रह्माप्रत जाई ॥३५॥आतां वामनाची कथा सुरस । सांगेन दक्षा मी तुज सहर्ष । गणनाथ चरित्र अद्भुत सरस । ऐकता चिंता नष्ट होती ॥३६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते दंभासुरशांतिकथनं नाम पंचचत्वारिंशोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP