मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड १| अध्याय ३६ खंड १ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ खंड १ - अध्याय ३६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत सुंदरप्रिय-विषयप्रियवधः Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । दक्ष म्हणती ब्राह्मणश्रेष्ठा सांगावी । पुढती कथा ही बरवी । विस्तारपूर्वक मनीं ठसावी । वक्रतुंडाची दैवी महती ॥१॥मुद्गल म्हणती तयासी । अशक्य विस्तारें वर्णायासी । अग्निपुत्रा अथवा पिनाकीसी । शेषा अथवा विधीला ॥२॥म्हणोनि संक्षेपें तुज सांगत । दैत्यपुत्र शंकरासी काय म्हणत । तें ऐकून महादेव काय करित । तो पुढील कथा भाग ॥३॥थांब थांब महादेवा । आमुचा पराक्रम तू पहावा । तुझ्या सामर्थ्याचा घ्यावा । शोध पुरवा ही मनीषा ॥४॥तूं आमची महासेना मारिलीस । दैत्येंद्रा रणांगणीं पाडलेस । ऐशियापरी दाखविलेस । पौरुष पूर्ण आपुलें तूं ॥५॥आतां आम्ही दोघे त्वरित । वक्रतुंडाच्या पुढयांत । तुज मारुनी नंतर मनांत । विचार करुं त्याचा ॥६॥त्यानंतर वधूं त्यासी । तैसेचि सर्व सुरेंद्रांसी । मुनिगणां ऋषिजनांसी । मृत्युमुखीं पाठवूं ॥७॥ऐसें बोलून धनुष्य करिती । सज्ज ते असुर निश्चिती । तेव्हां महादेव त्यांस म्हणती । स्मित करीत त्या वेळीं ॥८॥तुम्ही उभयता जें सांगितले । गर्वोद्धत क्रूर वचन तें खरें मानिलें । परी वक्रतुंडास प्रथम जिंकिलें । पाहिजे तुम्ही दोघांनी ॥९॥भूभार दूर करण्यास । तैसाचि तुमच्या नाशास । सांप्रत काळ बदलला खास । वक्रतुंड अवतरता ॥१०॥त्या वक्रतुंडाच्या प्रसादानें । अत्यंत उत्साहित मनें । संहारीन मी असुरा त्वरेनें । यांत संशय कांहीं नसे ॥११॥ऐसें बोलून बाणवृष्टी करी शंकर जी उग्र भारी । उभय दैत्य आपुल्या शिरीं । निवारितीं ती क्षणांत ॥१२॥त्यांच्या बाणांनीं छिन्न भिन्न । झाले नंतर देव दीन । शंकर विस्मित होऊन । शूळ त्यावरी फेंकित ॥१३॥त्या शूळावरी सोडित । पाशुपत अस्त्र तें क्षणाधात । तें अनिवार्य भीतिप्रद ज्वलंत । निष्फळ करी त्रिशूलास ॥१४॥पाशुपत अस्त्र भयंकर । पडले अन्तीं शिवहृदयावर । त्या आघातें भूमीवर । शंकर पडले मूर्छित ॥१५॥हाहाकार देवसैन्यात । माजता वक्रतुंड आज्ञापित । आपल्या गणसैन्याप्रत । दैत्यमर्दना आतुर जो ॥१६॥गणेशाचे आठ दूत । प्रमुख ते पुढे जात । आपापली सेना जमवित । महाकाय महाबल ते ॥१७॥प्रमोद आमोद ब्रह्मप्रिय । स्वानंदभोक्ता योगप्रिय । सर्वग सर्वविद् ज्ञानमय । क्रोधयुक्त सारे जमले ॥१८॥ते मंत्रजल प्रोक्षित । तेव्हां देव सारे होत जागृत । मूर्च्छा संपून उत्साहात । सारे उठले रणभूमीवर ॥१९॥श्रमहीन ते तेव्हां झाले । द्विगुणित तेणें तें चमकले । कालांतरानें जिंवंत केले । शुक्राचार्ये असुरही ॥२०॥प्रल्हाद प्रमुख वीर सर्व । प्रचंड आरोळ्या मारुनी गर्व । व्यक्त करिती अपूर्व । ब्रह्मांड तें निनादलें ॥२१॥देवगणांचे शंख वाजती । असुरां ते ऐकून बधिर स्थिति । शंख भेरी दुंदुभी निनादती । वीरांच्या आरोळ्याही ॥२२॥घोडे तेथ खिंकाळती । रथचक्रें आवाज करिती । त्यांचा नाद आसमंती । सर्वत्र नभीं व्याप्त झाला ॥२३॥प्रमोदादी गणांवरती । दैत्य सोडिती शस्त्र संवृष्टी । देवांची शस्त्रास्त्रें ठरती । सकल दैत्य संहार पर ॥२४॥दैत्यराजांचीं मस्तकें फोडिलीं । असुरांची सेना पांगली । ब्रह्मप्रियानें मान पकडिली । असुरांसमक्ष शुक्राची ॥२५॥शुक्रासी पकडुनी गुहेंत । दूर टाकिलें अंधारांत । शुक्र गेल्यावरी होत । दैत्य सारे भयातुर ॥२६॥हाहाकार ते करती । काय करावें याची भरांते । गुरुंस पकडिलें म्हणोनी चित्तीं । खिन्न जाहले दैत्य सारे ॥२७॥आपुल्या जीविताचा आतां । काय उपयोग तत्त्वता । जीविताशा सोडून लढता । असुरें देव बहु मारिले ॥२८॥अनेक देवांस विद्ध केलें । देवसैन्य पुन्हा हादरलें । ब्रह्मप्रियादींनी तें घेतले । परशु त्रिशूळ अंकुश पाश ॥२९॥कालरुद्र प्रजा संहारित । तैसे ते दैत्यांसी शस्त्रें मारित । देवांनी कंदन केलें बहुत । असुर सैन्याचें रोषानें ॥३०॥बहुत दैत्य मरुन पडले । प्रल्हाद प्रमुखही रणी पडले । तेव्हां ते दैत्य कुमार दोघे आले । रणभूमीवर शौर्यानें ॥३१॥प्रमोदादी गणांस म्हणत । तुम्हीं मारिलें दैत्यसैन्य बहुत । दैत्यश्रेष्ठ पडले प्रमूर्च्छित । परी आतां मरण तुमचें ओढवले ॥३२॥तीक्ष्ण शस्त्रांनी ठार करुं । वक्रतुंडादी दुष्टांस संहारुं ऐसें बोलून बाणांचा सागरु । सोडिला त्यांनीं देवांवरती ॥३३॥तेव्हां त्यांचें बल पाहून । दोन देववीर रणांत येऊन । आपली धनुष्यें करीं घेऊन । बाण सोडिती असुरांवर ॥३४॥काल यमासम ते बाण । घेती बहुत दैत्यांचे प्राण । मेले कितीक पडल तत्क्षण । छिन्न भिन्न विकलांग ॥३५॥त्या दोन वीरांचे बल पाहून । मत्सरपुत्र मनीं खिन्न । थरकाप चित्तांत होऊन । अग्नि अस्त्र मंत्रिती बाणावर ॥३६॥परी तत्क्षणीं दोन परशू येत । त्या उभयतांचें मस्तक छेदित । मत्सराचे दोघेही पुत्र रणांत । मरुन पडले महावीर ॥३७॥तें पाहून दैत्यवीर । त्यावेळीं घेती माघार । मत्सरा निवेदिती वृत्तांत समग्र । व्यथित मनें ते सारे ॥३८॥ऐक दैत्येशा रणवृत्तांत । महाभयंकर सांगण्या अनुचित । प्रल्हाद प्रमुख वीर रणांत । घायाळ होऊन पडले असती ॥३९॥ते मेले किंवा वाचले । तें आम्हां न ठाउक झाले । तुझे दोघे महावीर पुत्र गेले । मृत्युमुखीं रणीं लढतांना ॥४०॥वक्रतुंडाचे दोन गण आले । अकस्मात त्यांनीं परशू मारिलें । त्या प्रहारें वीरा लागलें । मर्मभेदी प्रहार ते ॥४१॥वक्रतुंडासम वीर । न झाला पूर्वीं पुढें न होणार । म्हणोनि त्यासी शरण जावें सत्वर । कल्याणास्तव आपुल्या ॥४२॥दैत्येशा गर्व न करावा । दैत्यगणांचा नाश टाळावा । सर्व असुरसंघ वाचवावा । गर्व सोडून शरण जावें ॥४३॥वक्रतुंडांसी शरण जाता । दैत्यकुळ वाचेल तत्त्वता । नाहींतर कुलक्षय होता । महा अनर्थ ओढवेल ॥४४॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदे श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुंडचरिते सुंदरप्रियविषयप्रियवधो नाम षट्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP