रविवार सायंस्मरण

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


भजन - सदगुरुनाथे माझे आई ०।

गणराज गजानन रे , सिंधु आनंदाचा ॥धृ०॥

ऋद्धिसिद्धिचा दाता , स्वामी त्रैलोक्याचा ।

योगी ध्याती सप्रेमे , धन्य महिमा त्याचा ।

चाल । करा घोष या नामाचा ।

ताल मृदंग वीणास्वरे गाउनि , त्यापुढे लोळा नाचा रे ॥१॥

लाडू मोदक दिव्यान्ने , दूर्वा पुष्पे नाना ।

ऐसे अर्पुनी त्याला , मग ध्यानी आणा ।

विघ्नसंकटपापांचे , भस्म होईल जाणा ।

चाल । पावे भक्तां श्रीगणराणा ।

संतति संपत्ति सन्मति सदगति , देतो सत्य जाणा रे ॥२॥

दीनबंधु दयार्णव तो , वाचे वर्णू मी काय ।

आता न सोडी मी या , मोरयाचे पाय ।

रुप पाहता डोळां , अहंममता जाय । चाल ।

सुख अदभुत ऐसे होय ।

दत्तनिरंजन आनंदचिदघन , गोसावीनंदन ध्यायी रे ॥३॥

भजन - पार्वतीच्या नंदना ०।

या दीनेची करुणा येउंदे आई । चरणावरी ठेविते डोई ॥धृ०॥

जन उद्धारार्थ अवतरुनि । हरिमंदिरी वास करोनि ।

सकलांचे हेतु पुरवुनि । आनंदविशी तू आई ।

चरणावरी ठेविते डोई ॥१॥

तू सर्वसाक्षी अससी । सर्वांतर्यामी नित वससी ।

परि गुप्तरुपे तू राहसी । जगी थोर एक तू आई ॥च०॥२॥

बहुरुपी बहुगुणी अससी । क्षणात रंका राव करिसी ।

सकलां परि वरि वरि दिससी ।

तव प्रभाव वानु मी काई ॥च०॥३॥

तू अससी सुखाची जनीता । तव दर्शनमात्रे ताता ।

पाप ताप झडुनि चित्ता । आनंद भरुनि राही ॥च०॥४॥

बोधामृत मज पाजोनि । भवतापाते निरसोनि ।

सुखी केले मज लागोनि । कैशी मी होऊ उतराई ॥च०॥५॥

तुज क्षणभरी नच मी पाही ।

तरी युगसम चित्ता होई । सहवास निरंतर देई ।

तुजविण मज नाठवो काही ॥च०॥६॥

तू लोकत्रयाचा तात । दीन -अनाथांचा नाथ ।

शरणागतांसी कृपावंत ।

तुजविण मज दैवत नाही ॥च०॥७॥

शोभसी जननी जगताला । प्रेमपय पाजवुनि सकलां ।

केले कलिमलहरणाला । सकल तीर्थक्षेत्र तव पायी ॥च०॥८॥

भजन - आनंदे गुरुमाय ०।

सदगुरु माझी माय रे । वंदिताचि पाय रे ।

वत्सा जैसी गाय तैसी । पाजी प्रेमपय रे ॥१॥

सदगुरुला जाणा रे । तुम्ही सदगुरुला वाना रे ।

कृत्रिमछंद सोडुनि अवघे । भजा भक्तराणा रे ॥२॥

जाण तू गुरुमहिमान रे । न लगे साधन आन रे ।

आनंदाची खाण सिद्धारुढ रुक्मिणीप्राण रे ॥३॥

भजन - शांत किती ही ०।

लगाले प्रेम ईश्वरसे । अगर तू मोक्ष चाहता है ॥धृ०॥

रचा उसने जगत सारा करे ओ पालना सबकी ।

ओही मालक दुनियाका पितामाताभी दाता है ॥१॥

नही पातालके अंदर नही आकाशके ऊपर ।

सदा ओ पास है तेरा कहां ढुंढनकू जाता है ॥२॥

करो जप नेम तप भारी रहो जाकर सदा बनमो ।

बिना सदगुरु संगतसे नही ओ दिलमे आता है ॥३॥

पडे जो शरणमे उसकी छोड दुनियाकी लालचकू ।

ओ ब्रह्मानंद निश्चयसे परमसुखधाम पाता है ॥४॥

भजन - सीताराम जय जय राम ०।

हरि हरि बोल बोल बोल । हा मंत्र नाही खोल ॥धृ०॥

हरि म्हणता पाप ताप निवारण ।

वद हे नाम अमोल अमोल अमोल ॥१॥

हरिरस सेविता अमर होसी बापा ।

देशिल प्रेमे डोल डोल डोल ॥२॥

खाता पिता उठता बसता ।

नाम घेता नलगे मोल मोल मोल ॥३॥

तीर्थव्रतादि करुनि देह दंडिसि ।

परि ते नामाविण फोल फोल फोल ॥४॥

रुक्मिणी हरिपदी तल्लीन झाली ।

पाहता रुप सखोल सखोल सखोल ॥५॥

भजन - उपेंद्रा ०।

फकीर झालो मी फकीर बाबा ॥धृ०॥

देणे घेणे हरिनाम हाचि धंदा ।

जन करिति निंदा । नाही फिकीर ॥१॥

संतांची चाकरी भक्तीची भाकरी ।

खाउनि पोटभरी । दिधला ढेकर ॥२॥

कुमार्गझाडणी दंग अनुदिनी ।

प्रेमाची कफनी । घाली निरंतर ॥३॥

दिनरात हासत नाचत खेळत ।

प्रेमानंदे डोले । ध्यात रखुमाईवर ॥४॥

भजन - ॐ नमःशिवाय , तरणोपाय ०।

नजर न आवे आतमज्योती ॥धृ०॥

तेल ना बत्ती बुझ नही जाती ।

नही जागत नही सोती ॥१॥

झिलमिल झिलमिल निशिदिन चमके ।

जैसा निर्मल मोती ॥२॥

कहत कबीर सुन भाई साधु ।

घर घर बाचत पोथी ॥३॥

भजन - बेळगांव शहरी अनगोळमाळी ०।

काय वानु आता , न पुरे ही वाणी ।

मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥

थोरीव सांडिली , आपुली परिसे ।

नेणे शिवो कैसे , लोखंडासी ॥२॥

जगाच्या कल्याणा , संतांच्या विभूति ।

देह कष्टविती , उपकारे ॥३॥

भूतांची ती दया हे , भांडवल संता ।

आपुलिया ममता , नाही देही ॥४॥

तुका म्हणे सुख , परावियां सुखे ।

अमृत हे मुखे , स्त्रवतसे ॥५॥

भजन - सदगुरुमाय दाखवि पाय ०।

अर्जी ते गुरुपादुकाष्टक

॥ श्रीसदगुरुनाथ महाराज की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP