भजन - सदगुरुनाथे माझे आई ०।
मोरेश्वर माउली । प्रेमळ ॥धृ०॥
अनन्य जे नर शरण रिघाले । तयालागी पावली ॥१॥
स्मरणमात्रे संकट हरुनि । दे शांतीची साउली ॥२॥
कलिमलहरण त्वरे कराया । कळवळुनि धावली ॥३॥
भजन - पार्वतीच्या नंदना ०।
गुरुकृपाअंबे जय जगदंबे । प्रीतिकदंबे सारासार नितंबे ॥धृ०॥
गुरुकृपा परमेश्वरी , जयाते हाती धरी । अनंत तयाच्या होती सुदंर लहरी ॥१॥
गुरुकृपा तीच भक्ति , गुरुकृपा तीच शक्ति । गुरुकृपा परिपूर्ण शांति विरक्ति ॥२॥
गुरुकृपा आदिमाता , धन्य ज्या आली हातां । गुरुकृपेविण जन्म वायाचि जाता ॥३॥
गुरुकृपेविण वावो , देवीसहित देवो । गुरुकृपा जाहलिया नाहीच भेवो ॥४॥
श्रीगीताभागवत , गुरुकृपा भावत । श्रीरमावल्लभदास महावाक्य पावत ॥५॥
भजन - आनंदे गुरुमाय ०।
सदगुरु माझे , जीवींचे जीवन । तयाविण आन , नेणे मी हो ॥१॥
सदगुरु माझी , प्रेमळ माउली । कृपेची साउली , वर्णू काय ॥२॥
सदगुरुनी प्रेमपय पाजविले । भजनी गोविले सर्व काळ ॥३॥
सदगुरुनी मज आशीर्वाद दिल्हा । तेणे हरुष भरला , ह्रदयी माझ्या ॥४॥
सदगुरुनी माझ्या शिरी ठेविला करु । आठव ना विसरु , ऐसे झाले ॥५॥
सदगुरुकृपे , तरलो तरलो । आता मी न उरलो , दुजेपणे ॥६॥
अनाथांचा नाथ , पतितपावन । कलिमलदहन , सदगुरु माझा ॥७॥
भजन - शांत किती ही ०।
जगतमे एक सार है धरम , धरम , धरम । करो परोपकारके करम , करम करम ॥धृ०॥
मानुषकी देह पायके हरिनाम नही लिया । भीरता जनम गमा दिया शरम , शरम , शरम ॥१॥
तेरे शरीरमे है दिव्य ज्योत इशकी । गुरुके वचनसे समज ले मरम , मरम , मरम ॥२॥
दुनियाकी सभी वस्तु नाशिवान स्थिर नही । सपने समान देखिले भरम , भरम , भरम ॥३॥
व्यापक है सभी वस्तुमे परब्रह्म जान ले । ब्रह्मानंद मिले मोक्षपद परम , परम , परम ॥४॥
भजन - सीताराम जय जय राम ०।
पांडुरंग , पांडुरंग , पांडुरंग दैवत माझे । अखंड माझ्या ह्रदयी विराजे ॥धृ०॥
पंढरीत भीमातटनिकटी । उभय कराते ठेवुनि कटी ।
पुंडलिकास्तव उभा विटेवरती । भाविक लोकां दर्शन सहजे ॥१॥
पीतपीतांबर कंठी तुलसीहार । कर्णी कुंडले मकराकार ।
मस्तकी मुकुट शोभे मनोहर । भाळी कस्तुरी टिळा साजे ॥२॥
दीन अनाथ जन असंतुष्टि । त्यावरी करितो कृपावृष्टि ।
निशिदिनी ध्याता ह्रदयसंपुष्टि । घे भक्तांचे मीपण ओझे ॥३॥
आषाढी कार्तिकी भरते यात्रा । भावे पूजिति राजीवनेत्रा ।
आनंद न समाये सत्पात्रा । तहान भूक काही न सुचे ॥४॥
वाळुवंटी संत सज्जन जमती । विठ्ठल नामाचा गजर करिती ।
भजनी कीर्तनी रंगुनि जाती । वीणा टाळ मृदंग वाजे ॥५॥
जमुनि उदंड संतमेळा ।
करिती बहु उत्साहे सोहळा भक्तराज रुक्मिणीपति सांवळा ।
अति आनंदे थै थै नाचे ॥६॥
भजन - उपेंद्रा ०।
घे गुरुबोध घुटका रे , प्राण्या ॥धृ०॥
सदगुरुवाचुनि या भवसागरी । कोण करील सुटका रे ॥१॥
क्षणभंगुर तनु मानिसी अमर । काळ क्षणात करि मुटका रे ॥२॥
धनसुतदारा मानिसी आपुले । त्यांचा मोह लटका रे ॥३॥
येता उघडा जाता उघडा संगे च ये मणि फुटका रे ॥४॥
धनासाठी तुज आप्तसोयरे । मानिति काळजाचा कुटका रे ॥५॥
कलिमलहरणगुरुबोधी रमता । गेला अहं मम झटका रे ॥६॥
भजन - ॐ नमःशिवाय , तरणोपाय ०।
भक्तिरसायन बडा जी होवे भवरोगनका झाडा ॥धृ०॥
श्रवण परिक्षिती कीर्तन नारद स्मरण करे प्रल्हादा ।
पगसेवन लछुमीसे हुवा हरिचरण चित्त जडा ॥१॥
अरचन किया पृथुराजने वंदन अक्रूर किया ।
दास्य किया जो हनुमानजीने निशिदिन आगे खडा ॥२॥
सख्यभक्ति अरजुनने पाई बली निवेदन किया ।
तन मन धनहि सब दे डारा , हात जोडकर खडा ॥३॥
भक्ति करेगा जो भवरोगी मुक्ति उनकी दासी ।
पोथी पुरान कुरान देखे दुजा मार्ग नही बडा ॥४॥
भक्तिबिना कोई तरन न जावे सब शास्तरमो देखा ।
दुजा उपाव नही जानके कबीर भक्ति नही छोडा ॥५॥
काय वानु मी या , संतांचे उपकार ।
मज निरंतर , जागविती ॥१॥
काय द्यावे यांसी , व्हावे उतराई ।
ठेविता हा पायी , जीव थोडा ॥२॥
सहज बोलणे , हित -उपदेश । करुनि सायास , शिकविती ॥३॥
तुका म्हणे वत्स , धेनुवेच्या चित्ती । तैसे मज येती , सांभाळीत ॥४॥
भजन - सदगुरुमाय दाखवि पाय ०।
आरती - जय जय जय ॐ कारे ०।
आरती गुरुमाई ०। ते गुरुपादुकाष्टक