रविवार प्रातःस्मरण

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


प्रारंभीपासून भजन - गुरुराया मजवरी ०।

उठा प्रातःकाळ झाला , आत्माराम पाहू चला ।

हा समयो जरि टळला , तरि अंतरला श्रीराम ॥धृ०॥

जीव शिव दोघेजण , भरत आणि शत्रुघ्न ।

आला बंधु लक्ष्मण , मन उन्मन होउनि ॥१॥

विवेकवशिष्ठ सदगुरु , संत सज्जन मुनीश्वरु ।

करिती नामाचा गजरु , हर्षनिर्भर होउनिया ॥२॥

सात्त्विकसुमंत प्रधान , नगरवासी अवघे जन ।

आला वायुचा नंदन , श्रीचरण पहावया ॥३॥

माता जानकी बिघडली , होती प्रारब्धे लिहिली ।

तिची देहबुद्धि जाळिली , आलिंगिली श्रीरामे ॥४॥

आजची दिवाळी दसरा , पर्वकाळ आला घरा ।

रामानंदाच्या दातारा , भेटी माहेरा मज द्यावी ॥५॥

भजन - गुरुवरा सदगुरुवरा ०।

तुझ्या दर्शने जाहलो धन्य रामा ।

भक्तकैवारी आनंदधामा ॥धृ०॥

काय सुंदर रघुराय तव रुप हे ।

माय तू आमुची , पाय दावी ।

वंदितो तव पदा , घालवी आपदा ।

ने मला निजपदा , पूर्णकामा ॥१॥

चरण सेवी हनुमंत पुलकित तनु ।

हस्तधृतशरधनु काय वानू ।

जवळी भ्राता वसे , अंकि सीता बसे ।

लोकमाताचि ही शरण आम्हा ॥२॥

माथि फेटा जटा , नेसी पीतापटा ।

रत्नमय गोमटा , कमरिपट्टा ।

मोतियांचा तुरा , माजि चमके हिरा ।

लाजवी मोहरा , पूर्णसोमा ॥३॥

मुक्तमाळा गळां , कस्तुरीचा टिळा ।

हास्यमुख सांवळा राम माझा ।

सार संसारि या , काही नाही म्हणुनि ।

कृष्णसुत घेई , तव गोड नामा ॥४॥

भजन - मजला उद्धरि ०।

भज मन , रामचरण सुखदाई ॥धृ०॥

जिही चरणनसे निकसी सुरसरी शंकर जटासमाई ।

जटाशंकरी नाम पर्‍यो है त्रिभुवनतारण आई ॥१॥

जिन चरणनकी चरणपादुका भरत रह्यो लवलाही ।

सोही चरण केवट धोय लिनो तब हरि नाव चलाई ॥२॥

सोही चरण संतनजन सेवत सदा रहत सुखदाई ।

सोही चरण गौतुमऋषिनारी परसपरमपद पाई ॥३॥

दंडकवन प्रभु पावन किन्हो ऋषिजन त्रास मिटाई ।

सो ठाकूर त्रिलोकके स्वामी कनकमृगासंग धाई ॥४॥

कपि -सुग्रीव -बंधुभय -व्याकुल तिन जयछत्र धराई ।

रिपुको अनुज बिभीषण निशिचर परसत लंका पाई ॥५॥

शिवसनकादिक अरुब्रह्मादिक शेष सहसमुख गाई ।

तुलसीदास मारुतसुतकी प्रभु निजमुख करत बडाई ॥६॥

भजन - जगदीशा ०।

दे पायांची जोड गुरुराया ॥धृ०॥

भवदुःखे मी बहुतचि गांजलो । दावी तुझे रुप गोड ॥१॥

कल्पनासासू करी अति जाचू । सत्वरि पाय इचे तोड ॥२॥

वासनानणंदुली किती सोसू तिची बोली ।

एक वेळ मोडी खोड ॥३॥

कामदादुला क्षण न सोडी मला ।

याची कंबर मोड ॥४॥

क्रोधसासरा नेदी आसरा त्याचे डोळे फोड ॥५॥

ममताजाऊ छी थूं करिते । जिव्हां छेदुनि सोड ॥६॥

लोभदीर मज लाथ मारितो । असे सर्वाहुनि द्वाड ॥७॥

दयाघना मज सहवेना वेदना । ह्रदयग्रंथी तोड ॥८॥

कलिमलदहना कृपा करोनि । पुरवि मनीचे कोड ॥९॥

भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा ०।

येथे का उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥धृ०॥

काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥१॥

काय केली सीतामाई । येथे राही रखमाबाई ॥२॥

काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥३॥

धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥४॥

काय केले वानरदळ । येथे मिळविले गोपाळ ॥५॥

काय केला हनुमंत । येथे उभा पुंडलिकभक्त ॥६॥

रामी रामदास भाव । जैसा भाव तैसा पंढरीराव ॥७॥

भजन - तुमबिन गुरुजी ०।

संगत संतनकी कर ले ।

जनमका सार्थक कछु कर ले ॥धृ०॥

उत्तम नरदेह पाया प्राणी इसका हित कछु कर ले ।

सदगुरु शरण जाके बाबा जनम -मरण दूर कर ले ॥१॥

कहांसे आया कहां जावेगा ये कछु मालुम करना ।

दो दिनकी जिंदगानी बंदे हुशार होकर चलना ॥२॥

कौन किसीके जोरु लडके कौन किसीके साले ।

जबलग पल्लोमे पैसा भाई तबलग मिठ्ठा बोले ॥३॥

कहत कबीर सुन भाई साधु बार बार नही आना ।

अपना हित कछु कर ले बाबा अखेर अकेला जाना ॥४॥

भजन - सच्चिदानंद कृष्ण ०।

ॐ कारस्वरुपा , सदगुरुसमर्था । अनाथांच्या नाथा , तुज नमो ॥१॥

गुरुरावस्वामी , आहे स्वप्रकाश । ज्यापुढे उदास , चंद्र रवि ॥२॥

वेदा पडले मौन , शास्त्रे वेडावली । वाचा हे निमाली ते श्रीगुरु ॥३॥

श्रीगुरु जयासी , पाहे कृपादृष्टी । तयासी ही सृष्टी , पांडुरंग ॥४॥

प्रभुराज , माझा , स्वामी गुरुराव । देतो मज भाव -शुद्धी भूमी ॥५॥

भूमी शुद्ध करी , ज्ञानबीज पेरी अद्वैत हे धरी , मी तू नेणे ॥६॥

मजलागी माझी , सदगुरु माउली । कृपा करी साउली , वर्णू काय ॥७॥

एकाजनार्दनी , गुरु परब्रह्म तयाचे पै नाम , सदा मुखी ॥८॥

भजन - चला चला रे सर्व मिळोनि ०।

शेवट गोड करी ०। ते विज्ञापना -

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP