गुरुवार सायंस्मरण - भजन - सदगुरुनाथे माझे आई ...

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


भजन - सदगुरुनाथे माझे आई ०।

मज मोरयाचा बहुत लागला छंद बाय ॥धृ०॥

एक घडी पळ विसरु पडेना । नवल मी आता सांगु काय ॥१॥

असता संसारी सहज उदास । लाधला मोरयाचा पाय ॥२॥

गोसावीनंदन स्वामी परात्पर । सुखमय सर्वांठाय ॥३॥

भजन - पार्वतीच्या नंदना ०।

श्रीगुरुकृपाअंबे जय जय जय जगदंब आई ॥धृ०॥

तनमनधन हे अर्पुनि चरणी । शरण मी आलो दीन होउनि ।

नाम तुझे मम वदनी देउनि । ठेवी पायी । माते ॥१॥

नाम तुझे करी पतितां पावन । कलियुगी नाही त्या समान ।

न करिता व्रत तीर्थे दान । मोक्ष देई । माते ॥२॥

आजवरि रक्षिले बहु भक्तांसी नासुनि त्यांच्या पापराशी ।

दिधले सुखसाम्राज्यपदासी । वर्णु म्या कायी । माते ॥३॥

तुज विस्मरता अंगी चढे मद । तुजला स्मरता सदा सावध ।

दासी कला तव पदारविंद । नित्य ध्याई माते ॥४॥

भजन - आनंदे गुरुमाय ०।

सखये पाही गुरुवाचुनि दैवत नाही ॥धृ०॥

गुरु कार्श रामेश्वर । गुरु गोकर्ण पंढरपूर ।

गुरु तीर्थाचे माहेर । गुरु ते ग बाई ॥गुरु०॥१॥

गुरु प्रेमाचा पाझर । गुरु निजशांतीचे घर ।

गुरु परब्रह्मसागर ॥गुरु०॥२॥

गुरु भक्तीची माउली । गुरु ज्ञानाची साउली ।

गुरुपासुनि मुक्ति मिळाली ॥गुरु०॥३॥

गुरु वशिष्ठ श्रीरामाचे । गुरु याज्ञवल्क्य जनकरायाचे ।

गुरु सांदीपन श्रीकृष्णाचे ॥गुरु॥४॥

गुरु आदिनाथ मच्छिंद्राचे । गुरु मच्छिंदर गोरखाचे ।

गुरु जालिंदर मैनावतीचे ॥गुरु०॥५॥

गुरु नागनाथ बहिरंभटाचे । गुरु गहिनीनाथ निवृत्तीचे ।

गुरु निवृत्ति ज्ञानेशाचे गुरु०॥६॥

गुरु ज्ञानेश्वर विसोबारायाचे । गुरु विसोबाराय नामदेवाचे ।

गुरु नामदेव जनाबाईचे ॥गुरु०॥७॥

गुरु नारायण विधीचे । गुरु ब्रह्मदेव अत्रीचे ।

गुरु अत्रिमुनि दत्तात्रयाचे गुरु०॥८॥

गुरु दत्तात्रय जनार्दनाचे । गुरु जनार्दन एकनाथाचे ।

गुरु रमावल्लभदास आवडाबाईचे ॥गुरु०॥९॥

गुरु विमलानंद शांताईचे । गुरु गजदंड सिद्धारुढाचे ।

गुरु सिद्धारुढ कलावतीचे ॥गुरु०॥१०॥

भजन - शांत किती ही ०।

मोरी लागी लटक गुरुचरणनकी ॥धृ०॥

चरणाबिना मुझे कछु नही भावे । झूट माया सब सपननकी ॥१॥

भवसागर सब सूक गया है । फिकिर नही मुझे तरननकी ॥२॥

मीराके प्रभु गिरिधर नागर । उलट भयी मोरे नयननकी ॥३॥

भजन - सीताराम जय जय राम ०।

हा परम सनातन विश्व भरुनि उरला ।

गुरुदत्तराज हा ऋषिकुलात अवतरला ॥धृ०॥

स्मितरम्यवदन काषायवसनधारी । पीयूषयुक्त करि रत्नजडित झारी ।

निजभक्तत्राण कारणी शूल धरिला ॥गुरु०॥१॥

बांधिला कोप मुरडुनि जटा मुकुटी ।

घातली दयावनमाला दिव्य कंठी ।

करधृत डमरुतुनि उपजति ज्ञानकला ॥२॥

मृगचर्म पांघरी शंख चक्र हाती ।

श्रुति श्वानरुप होउनि पुढे पळती ।

भूधेनु कलिभये चाटित चरणाला ॥३॥

करि स्वजन उपाधि भस्मलेप अंगा ।

झोळीत भरी तज्जन्ममरणपिंगा ।

नारायण ह्रदयी रंग भरुनि गेला ॥४॥

भजन - उपेंद्रा ०।

जा शरण गुरुला भव तरशील ॥धृ०॥

अस्थिमांसमय तनु मी समजुनि । किती आरशात तू पहाशील ॥१॥

खाणे पीणे निजणे यातचि । व्यर्थ वेळ तू घालशील ॥२॥

विषय विलासी दिननिशी रमसी । परि शेवटी तू फसशील ॥३॥

पुनरपि जनन पुनरपि मरण । किती फेरे तू फिरशील ॥४॥

अंतकाळी तुज कोणी न वाली । हे कळता दुःख पावशील ॥५॥

नित्यानित्यविचार न करिता । शेवटी अनुतापे रडशील ॥६॥

हरिनामामृत सेविसि जरि तू । दुःख समूळ हरशील ॥७॥

संतवचनी दुर्लक्ष करिसि जरी । हाय हाय मग करशील ॥८॥

विषयी विटसी भजनी नटसि जरी । परमपद पावशील ॥९॥

गुरुपदी अनन्यशरण रिघता । ह्रदयग्रंथी तुटतील ॥१०॥

गुरुकरुणोदये भ्रम निवारुनि । आनंदे रमशील ॥११॥

हर्षखेदादि द्वंद्वापासुनि । गुरुबोधे तू सुटशील ॥१२॥

गुरुमहिमा तुज कळल्यावर मग । बोध वरी वरी झेलशील ॥१३॥

रुक्मिणीह्रदयनिवासी प्रभुला । ध्याता कृतकृत्य होशील ॥१४॥

भजन - ॐ नमःशिवाय , तरणोपाय ०।

आज सखी संतसंगतमे मिलके हरिके गुनगान करो ॥धृ॥

कलिमे हरिनाम समान बडो कोई और उपाय नही जगमे ।

सब पापनिवारण कारण है भवतारण है मनमे सुमरो ॥१॥

बिन संतसमागम ज्ञान नही बिन ज्ञान न मोक्ष मिले कबहि

करले तप तीरथ दान घने चहुंधामन बीच भले बिचरो ॥२॥

विश्वचराचरमे परिपूरण चेतन ब्रह्मस्वरुप सदा ।

घटभीतर जान पिछान सही मन बीच निरंतर ध्यान धरो ॥३॥

सब संशय दूर करावत है निजरुप लखावत है तनमे ।

ब्रह्मानंद सुनो गुरुज्ञान सदा भवसागर दुस्तर पार तरो ॥४॥

भजन - बेळगांव शहरी अनगोळमाळी ०।

सदगुरुकृपे लाभला हो आजी ब्रह्मानंद ॥धृ०॥

चिंता सुटली निश्चिंत झालो । पाहता यशोदानंद ॥१॥

जन्ममरण हर्षखेदादि । तुटले द्वैतबंध ॥२॥

संत सुटला निःसंग झालो । फिरतो आता स्वच्छंद ॥३॥

प्रेम घेणे प्रेम देणे । हाचि आमुचा छंद ।

प्रेमसागरी प्रेमलहरी । उठती अनिर्बंध ॥५॥

दिसते उपाधि परी ती नसते । सदा प्रेमामाजि धुंद ॥६॥

कलिमलदहन भजनी रमता । आटला विषयानंद ॥७॥

भजन - सदगुरुमाय दाखवि पाय ०।

अर्जी ते गुरुपादुकाष्टक

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP