भजन - सदगुरुनाथे माझे आई ०।
सुसंगति सदा , देई मोरया । बहुत कष्टलो , कुसंगतीत या ॥१॥
राग द्वेष हे , फार गांजिती । बरी नव्हे मला , यांची संगति ॥२॥
गोड वाटले , विषय सेविता । पाक विषाचा , तो नको आता ॥३॥
लक्ष्मीगणेशा , मुक्ति दे मला । उभयकरे कृष्णदास नमि तुला ॥४॥
भजन - पार्वतीच्या नंदना ०।
किती प्रेमळ तू गुरुमाय माय माय ॥धृ०॥
घेउनि मायिक । देशी स्थायिक । भावे वंदिता पाय पाय पाय ॥१॥
दाम न घेता । निजधाम दाविसी । वर्णन करु मी काय काय काय ॥२॥
अनन्यभावे तुजसी भजता । कलिमल दूर जाय जाय जाय ॥३॥
भजन - आनंदे गुरुमाय ०।
गुरुराया रे दावी चरण मज आता । तुजविण जगी कोण त्राता ॥धृ०॥
फिरुनि चौर्यांशी लक्ष योनी । दमलो श्रमलो बहु स्वामी ।
सुख न मिळे क्षणभरि चित्ता ॥१॥
खेळी गुंतलो बाळपणी । तरुणपणी झालो कामी ।
शरिरा आली निर्बलता ॥२॥
विषयी किळस उपजेना । मन काही केल्या आवरेना ।
रात्रंदिन जाळी चिंता ॥३॥
संपत्ति असता सारे । धावती सखेसोयरे ।
ना तरी नसे कोणा वार्ता ॥४॥
व्रतनेमतपादि कराया गुंतुनि राहिलो विषयां ।
नेणुनि आपुल्या स्वहिता ॥५॥
नको नको पुनरावृत्ति । मज वाटे ही थोर आपत्ति ।
पदकमळी ठेवितो माथा ॥६॥
मी हीन दीन परदेशी ।
तू नाथ जगाचा होसी तव चरण न सोडी आता ॥७॥
दहा सहांचा गुलाम बनलो ।
म्हणुनि तव चरण विस्मरलो ।
अपराधी थोर मी ताता ॥८॥
कलिमल दहन कराया । तूचि एक समर्थ सखया ।
स्वरुपानंद भोगवी आता ॥९॥
भजन - शांत किती ही ०।
हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हारे ॥धृ०॥
नीर पीवन हेत गयो सिंधुके किनारे ।
सिंधु बीच बसत ग्राह चरण धरी पचारे ॥१॥
चारप्रहर युद्ध भयो ले गये मजा रे ।
नाक , कान डुबन लगे कृष्णको पुकारे ॥२॥
द्वारकासे खबर सुनके गरुड चढी पधारे ।
ग्राहको हरि मारके गजराजको उभारे ॥३॥
सूरदास मगन देख नंदको दुलारे ।
मेरो तेरो विचार है यमराज के द्वारे ॥४॥
भजन - सीताराम जय जय राम ०।
अरे मायबापा दीनदयाळा । तव भजनाचा मज लावी चाळा ॥धृ०॥
सहस्त्र अपराधी मी सत्य जाण ।
परि देवा तुजविण क्षमा करी कोण ॥१॥
इष्ट मित्र येती देखुनि दामा ।
परि संकटी कोणी न येती कामा ॥२॥
हो का दुराचारी विषयी आसक्त ।
कृपा करोनि त्या करिसी तू मुक्त ॥३॥
तुज म्हणति कनवाळु परमकृपाळु । का ?
तर करिसी तू भक्तांचा सांभाळु ॥४॥
कलिमलदहना पदरी घे दीना ।
कृपा करोनि पुरवी कामना ॥५॥
भजन - उपेंद्रा ०।
होशिल फारचि मोठा रे । तरी होईल फारचि तोटा रे ।
होशिल गुरुचा बेटा रे । तरी होशिल फारचि छोटा रे ॥१॥
राहशिल नर्मदेचा गोटा रे ।
तरी यमचि मारील सोटा रे कळेल मोहचि खोटा रे ।
तरी कळेल सदगुरु मोठा रे ॥२॥
देशिल विषयां फाटा रे । तरी जाईल जन्माचा काटा रे ।
सदगुरु जरी पाठिराखा रे । तरी होशिल पुण्याचा साठा रे ॥३॥
स्मरशिल रुक्मिणीवरु रे । तरी तरशिल भवसागरु रे ।
होशिल जगती थोरु रे । हे सांगे एक सदगुरु रे ॥४॥
भजन - ॐ नमःशिवाय , तरणोपाय ०।
श्रीकृष्ण कहे निरधारा । सुन अरजुन बचन हमारा ॥धृ॥
यह जीव सदा अविनाशी । सुखरुप स्वयंपरकाशी ।
जड देहको चेतनहारा ॥सु०॥१॥
जिम वस्त्र पुरान उतारी । पहने नवीन नरनारी ।
तिम जीव शरीर दुबारा ॥सु०॥२॥
मणिका जिम दोर अधारे । तिम सब जग मोर सहारे ।
मम अंश जीव ये सारा ॥सु०॥३॥
यह नश्वर तन स्थिर नही । क्या सोच करे मनवाही ।
ब्रह्मानंद है रुप तुम्हारा ॥सु०॥४॥
भजन - बेळगांव शहरी अनगोळमाळी ०।
सदगुरुसारिखा , सोयरा जिवलग । तोडिला उद्वेग , संसाराचा ॥१॥
काय उतराई , होऊ कवण्या गुणे । जन्मा नाही येणे , ऐसे केले ॥२॥
माझे सुख मज , दाखविले डोळां । दिधली प्रेमकळा , नाममुद्रा ॥३॥
डोळियांचा डोळा , उघडिला जेणे । स्वानंदाचे लेणे , लेवविले ॥४॥
बहुत जन्मीचे , फेडिले साकडे । कैवल्य रोकडे , दाखविले ॥५॥
नामा म्हणे निक्की , सापडली सोय । न विसंबे पाय , खेचराचे ॥६॥
भजन - सदगुरुमाय दाखवि पाय ०।
अर्जी ते गुरुपादुकाष्टक