प्रारंभीपासून भजन - गुरुराया मजवरी ०।
उठि रे गोपाळा , उघडी स्वरुपलोचना ।
सरली अविद्याराती उदयो झाला रविकिरणा ।
इंद्रियगोधने नेई निर्गुणकानना ।
सुटली मानसवत्से तुजविण नाकळती कोणा ॥धृ०॥
प्रबोध पहाट झाली सरले तिमिरतमरज ।
गुरुकृपेचा अरुण दावी सुरंगसम तेज ।
आत्मा दिनकर पाठी प्रगटे तात्काळिक सहज ।
जिवचंद्राचे मंडळ तेणे झाले निस्तेज ॥१॥
दृष्याभास चांदणिया असते ठाईच लोपलिया ।
लिंगदेहकमळीचे मधुकर सुटले आपसया ।
बुद्धिबोध चक्रवाके मिनली आपणिया ।
देहबुद्धिकुमुदिनी सुकोनि गेलीसे विलया ॥२॥
योगविद्येच्या पंथे साधकवृंदे चालियली ।
उपनिषदभागार्थ शब्द केला कोकिळी
वाग्वादाचे उलूक निघती मौनाचे ढोली ।
विकल्प अटवी साही चोरी सांडियली ॥३॥
विरागरश्मी जवळी धरिता चित्तरविकांत ।
आत्मावन्ही प्रगटे विषयवन जाळीत ।
तृष्णेच्या श्वापदावरी प्रळय अदभुत ।
विश्व हे लटिके मूढा मृगजळवत ॥४॥
जारव्यसनी जीव हा झाला उदमी सुविचार ।
वासानाकुंटिणीचा सहजे खुंटला व्यापार ।
लीलाविश्वंभरस्वामी उठिला सत्वर । चाले मुक्तेश्वर संगे धरुनिया कर ॥५॥
भजन - गुरुवरा सदगुरुवरा ०।
भक्तीची आवड भारी । प्रभुला ।
काष्ट तंतु चर्मे धातु । वाद्ये नकोत करी ॥धृ०॥
भक्तां अखंडानंदी रमवुनि । शेवट गोड करी ।
बळीराजाच्या भक्तिकरिता । द्वारी उभा निरंतरी ॥१॥
प्रल्हादाच्या भावार्थासी । स्तंभी प्रगटला हरि ।
गजेंद्राच्या भक्तिसाठी । कंजफुलाते वरी ॥२॥
भिल्लिणीच्या प्रेमासाठी । बोरे सेवित हरि ।
वृजयुवतीस्तव मथुरापुरी । खेळे दुडियामाजारी ॥३॥
गोपाळांचा भाव जाणुनि । खाई शिळी भाकरी ।
विदुरघराशी स्वये जाउनि । कण्या भक्षि श्रीहरि ॥४॥
द्रौपदीच्या भक्तिसाठी । भाजीपान सेवि हरि ।
सुदाम्याचे मूठभर पोहे । मटमट भक्षि स्वकरी ॥५॥
अर्जुनाच्या भक्तिसाठी । रथी सारथ्य करी ।
रुक्मिणीच्या एका तुलसीदलाने । तुळीला गिरिधारी ॥६॥
भजन - मजला उद्धरि ०।
मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोयी ॥धृ०॥
जाके शिर मोरमुगुट मेरो पति सोयी ।
शंख चक्र गदा पद्म कंठमाल सोयी ॥१॥
तात मात सुत न भ्रात आपनू न कोयी ।
छांडदुयी कुलकी कान क्या करेगा कोयी ॥२॥
संतनसंग बैठ बैठ लोकलाज खोयी ।
अब तो बात फैल गयी जाने सब कोयी ॥३॥
आंसूअन जल सिंच सिंच प्रेमबेल बोई ।
मीरा प्रभु लगन लगी होने होसो होयी ॥४॥
भजन - जगदीशा ०।
यशोदानंद बालमुकुंद श्रीहरि करितो सदा खोड्या ॥धृ०॥
पेंद्या माध्या सौंगड्यासवे दुडु दुडु चढतो माड्या ।
कदंबाच्या झाडावरती ठेवी गोपींच्या साड्या ॥१॥
यमुनेतीरी धेनु चारिता गोपमेळी खेळे गोट्या ।
दही दूध लोणी लपुनि खाई पेंद्याचा लाडका किट्या ॥२॥
कालियाचा गर्व हराया यमुनेत मारी उड्या ।
कंसमामासी नकळत तोडिल्या वसुदेवदेवकीच्या बेड्या ॥३॥
हळुचि जाउनि पांडवाघरी स्वहस्ते धुतल्या घोड्या ।
दुर्वासमुनिस्तव गोपी धाडिल्या देउनि अन्नाच्या पाट्या ॥४॥
सखुबाईस्तव पंढरपुरचा झाला वाटाड्या
गोरोबागृही माती तुडवुनि दावि जणु माटाड्या ॥५॥
बोधल्या घरी सुगीसमयी धान्याच्या बांधी मुड्या ।
तुक्यासंगे दुकानी बैसुनि बांधुनि देई पुड्या ॥६॥
दामाजीस्तव बेदरी जाउनि नाम सांगे विठ्या ।
नामदेवाच्या कीर्तनसमयी झाला टाळकुट्या ॥७॥
आवडाबाईचा धांवा ऐकुनि लाटेसरशी दे कुड्या ।
रुक्मिणीसी बहु युक्तीने निजभक्तांच्या सांगतो गोठ्या ॥८॥
भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा ०।
प्रभुरा या तारी या भवापासुनि ॥धृ०॥
कीर्ति तुझी ऐकुनि दयाळा । शरण मी आलो तव पदकमला ॥१॥
माय बाप मित्र बंधु भगिनी । तुजविण मजला नाहीत कोणी ॥२॥
अनुतापे ध्रुव स्मरता तुजसी । शांतविले त्या त्वा ह्र्षीकेशी ॥३॥
प्रल्हादबाळा पितये छळिता । स्तंभि प्रगटलासी तू अनंता ॥४॥
कृष्णा धाव ऐसे म्हणता । कृष्णा रक्षिली त्वा भगवंता ॥५॥
पापी अजामिळ अंती स्मरता । त्या उद्धरिले कमलाकांता ॥६॥
रुक्मिणीरमणा पुंडलीकवरदा । रक्षी रक्षी आपुल्या बिरिदा ॥७॥
भजन - तुमबिन गुरुजी ०।
मोहन आवनकी कोई कीजो रे । आवनकी मन भावनकी ॥ध्रु०॥
आप न आवे पतिया न भेजे । ये बात ललचावनकी ॥१॥
बिन दरशन व्याकुल भयी सजनी । जैसी बिजलियां श्रावणकी ॥२॥
क्या करुं शक्ति नही मुझे सजनी । पांख होवे तो उड जावनकी ॥३॥
मीरा कहे प्रभु गिरिधर नागर । इच्छा लगी हरि बतलावनकी ॥४॥
भजन - सच्चिदानंद कृष्ण ०।
सदगुरुचे पायी , देहासी अर्पिता । तात्काळ मुक्तता , येते हातां ॥१॥
नाशिवंत देता , ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा , पुराणात ॥२॥
माया देउनिया , ब्रह्म घ्यावे हाती । ऐशा गुरुप्रती , का न भजा ॥३॥
तुका म्हणे गुरु , पायी लाभ आहे । मोक्ष तोचि पाहे , दास होय ॥४॥
भजन - चला चला रे सर्व मिळोनि ०।
शेवट गोड करी ०। ते विज्ञापना -