मंगळवार सायंस्मरण - श्रीगणपते विघ्ननाशना । ...

हरिगुणगानाच्या अभ्यासाने दिवसेंदिवस श्रद्धा बळकट होत जाते आणि हरिस्मरणात मन रमू लागते .


श्रीगणपते विघ्ननाशना । मंगलमूरुते , मूषकवाहना ॥१॥

तिमिर नाशिसी , निजज्ञाना देउनि । रक्षिसी सदा , सुभक्तां लागोनी ॥२॥

खड्ग दे मला , प्रेमरुपी हे । मारिन षड्रिपु , दुष्ट दैत्य हे ॥३॥

बालकापरि , जवळी घे मज । ईश जगाचा तू , मी तव पदरज ॥४॥

मनोहर तुझी , मूर्ति पहावया । लागी दिव्य दृष्टि , देई मोरया ॥५॥

पुरवि हेतुला , करुनि करुणा । रमवि भजनी , कलिमलदहना ॥६॥

भजन - पार्वतीच्या नंदना ०।

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासुरमर्दना लागोनी ।

त्रिविधतापांची करावया झाडणी । भक्तांलागोनी पावसि निर्वाणी ॥१॥

आईचा जोगवा , जोगवा मागेन । द्वैत सांडुनि माळ मी घालीन ।

हाती बोधाचा झेंडा मी झेलीन । देहरहित वारीसी जाईन ॥धृ०॥

नवविध भक्तीचे करुनि नवरात्र । करुनि पोटी मागेन ज्ञानपुत्र ।

जाणुनि सदभाव अंतरीचा मित्र । दुर्धर संसार सोडीन कुपात्र ॥२॥

पूर्ण बोधाची घेईन परडी । आशातृष्णेची फोडीन नरडी ।

मनविकार करीन कुरवंडी । अमृतरसाची भरीन मी दुरडी ॥३॥

आता साजणी झाले मी निःसंग । विकल्पनवर्‍याचा तोडियेला संग ।

काम क्रोध हे धाडियेले मांग । झाला मोकळा मारग सुरंग ॥४॥

आईचा जोगवा मागुनि ठेविला । जाउनि महाद्वारी नवस म्या फेडिला ।

एकाजनार्दनी एकपणे देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥५॥

भजन - आनंदे गुरुमाय ०।

सदगुरुपदी शरण जाई । नीरलिखित संसारचित्र हे ।

पाहता पाहता जाईल सर्वहि ॥धृ०॥

नाग घालि मिठी चंदनासी । भ्रमर धावे कमलापाशी ।

तेवी गुरुभजनी रत होई ॥१॥

मुंगीचा असे सहज स्वभाव । गुळासाठी घेते धाव ।

आणिक तुज म्या सांगू काई ॥२॥

आवडीने सेवी मक्षिका मध । भ्रमर सुवासा होई लुब्ध ।

तेवी अनन्य गुरुचे पायी ॥३॥

कीटक धरिता भ्रमराध्यास । सत्वर पावे भ्रमरपणास ।

पात्र होसी गुरुकृपेस । नरजन्माचे सार्थक होई ॥५॥

गुरुपद मनुजा तीर्थचि काशी । गुरुपदविमुखा गति नसेची ।

गुरुवाचुनि जगी दैवत नाही ॥६॥

कलिमलदहनकृपामृत सेवुनि । घोर भवांबुधि पार तरोनी ।

ब्रह्मानंद डुलत राही ॥७॥

भजन - शांत किती ही ०।

नजरोंसे देख प्यारे । यह क्या दिखा रहा है ।

सब चीज सब जगामो । ईश्वर समा रहा है ॥धृ०॥

प्रभुने जबी बिचारा । जगका हुवा पसारा ।

चौदेभुवन नियारा । मनसे बना रहा है ॥१॥

कही नर बना है नारी । कही देव दैत्य भारी ।

पशुपक्षीरुपधारी । बन बनके आ रहा है ॥२॥

भूमि वही अगन है । सूरज वही गगन है ।

पानी वही पवन है । निर्गुण दुणा रहा है ॥३॥

तज भेदभाव मनमे । बनमे वही है तनमे ।

ब्रह्मानंद जो स्वपनमे । रचना रचा रहा है ॥४॥

भजन - सीताराम जय जय राम ०।

धरी गुरुचरण अभंग , मना तू ॥धृ०॥

अखिल पसारा विफल असे हा । नकळत पावेल भंग ॥१॥

आसनी शयनी भोजनी गमनी । गुरुभजनी रहा दंग ॥२॥

भाव भक्ति दृढतर होता । गुरु सांगे अंतरंग ॥३॥

गुरुबोधाच्या श्रवणमनने । त्यागी अभिमानसंग ॥४॥

कलिमलदहनकृपामृत सेवुनि । आत्मस्वरुपी रंगिरंग ॥५॥

भजन - उपेंद्रा ०।

होईन मी सुखी होईन मी सुखी । म्हणता ग बाई झाले मी सुखी ॥धृ०॥

काया वाचा मन अर्पिता गुरुपदी । गुरुने ग बाई बोध केला की ॥१॥

कोण मी कैचा आलो कशाला । जाणार कोठे विचार कर की ॥२॥

देह मी नव्हे ऐसे कळता ग बाई । देहसंबंधियांचा विचार विरला की ॥३॥

बाल तरुण वृद्ध नरनारी नव्हे मी । नित्य सत्य मुक्त आत्मा असे की ॥४॥

गुरुसिद्धकृपे कलिमल हरता । निजभजनानंदी रमली की ॥५॥

भजन - ॐ नमःशिवाय , तरणोपाय ०।

वोही राम पछानो जी । मेरा कहेना मानो जी ॥धृ०॥

परनारीकू षंढ बना है । परनिंदाकू बहिरा ।

परधन देखत अंधा हुवा । जब आपका जग सारा ॥१॥

सदा रहत उदासी निंदा । स्तुति न जाने कोई ।

ए धेनु ए बाघ न जाने । सब आत्मा है भाई ॥२॥

भेद नही अभेद हुवा मन । राम भया जग सारा ।

कहत कबीर सुन भाई साधु । जगमो रहकर न्यारा ॥३॥

भजन - बेळगांव शहरी अनगोळमाळी ०।

गुरुवरा तुज नमस्कारा । धीरा , उदारा , सुंदरा , श्रीधरा ॥धृ०॥

जननमरणभय हरण करोनि । प्रेमामृते तृप्त केले स्वामी

ईशा , जगदीशा , परमेशा , रमेशा ॥१॥

अनंत रुपी अनंत नामी । नटलासी तू सदगुरुस्वामी ।

कलावंता , भगवंता , श्रीकांता , अनंता ॥२॥

भजन - सदगुरुमाय दाखवि पाय ०।

आरती - १ )

जय जय जय ॐ कारे , माते । आरती ओवाळीतो करुणासागरे , माते ॥धृ०॥

नवरत्नांकित सिंहासनी बैसुनि सदगुरु सुंदरे , माते ।

षडविकार शमवुनि पाप ताप हरे , माते ॥१॥

सुकुमार पदावरी पुष्प सुवासिक पहाता चित्त विरे , माते ।

सुहास्यवदन पहाता , भवदुःख विसरे , माते ॥२॥

तव बोधामृतपाने भेदाभेद काही नुरे , माते ।

अगम्य महिमा तुझा , सुरवरां अगोचरे , माते ॥३॥

तव नामामृत सेवन करिता अतृप्ति सरे , माते ।

तव प्रेमामृत मिळता , देहभान विसरे , माते ॥४॥

भक्तिविण तव लाघव कोणा न कळे सदगुणमंदिरे , माते ।

कलिमलदहन करोनि , सुखविसि अभयकरे , माते ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP