उठा उठा हो वेगेसी , चला जाऊ पढंरीसी । भेटो विठ्ठलरखुमाईसी , त्रिविधताप हरतील ॥१॥
चंद्रभागे , करु स्नान , घेऊ पुंडलिकाचे दर्शन । तेथे भेटती संतजन , तेणे मन निवेल ॥२॥
गंगा , यमुना , सरस्वती , कृष्णा , वेण्या , भागीरथी । तुंगभद्रा , भोगावती येती श्रीपतिदर्शना ॥३॥
तापी , नर्मदा , कावेरी , पंचगंगा , गोदावरी । स्नाने केलिया बोहरी , महादोष हरतील ॥४॥
रामानंदाचे माहेर , क्षेत्र नाम पंढरपूर । मातापिता विश्वंभर , पैल पार तरतील ॥५॥
भजन - गुरुवरा सदगुरुवरा ०।
प्रारंभीपासून भजन - गुरुराया मजवरी ०। पर्यंत म्हणावे . पान ११ व १२
दे प्रेमरसगोडी । सदगुरुमाते ॥धृ०॥
कृपाकटाक्षे पाहुनि मजकडे । अहंममता तोडी ॥१॥
माय -बाप -बंधु सर्वहि तूचि । तव चरण न सोडी ॥२॥
स्थिरचरांतरी रुप दाउनि । द्वैतभाव मोडी ॥३॥
विशालाक्षि तू अंतरसाक्षी । तव पदी मन ओढी ॥४॥
भजन - मजला उद्धरि ०।
प्रभु तेनो कैसो खेल रचायो । मै तो देख देख विसमायो ॥धृ०॥
देवरुप हो स्वर्गलोकमे अमृतपान करायो । सुंदर सुंदर अपसर गायन सुन सुन मन हरकायो ॥१॥
मनुज शरीर धार धरणीपर अन्न शाक फल खायो । पशु पक्षी मृगरुप बनकर बनजंगल विचरायो ॥२॥
जलचर होकर नदिया सागर सरोवर सैर करायो । दानव नाग पताल लोकमे रमण कियो मन भायो ॥३॥
आपहि नाना भोजन बनकर आपहि भोग लगायो । ब्रह्मानंद सकल जगमाही घट घट बीच समायो ॥४॥
भजन - जगदीशा ०।
तू माझी माउली , मी वो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा , पांडुरंगे ॥१॥
तू माझी गाउली , मी तुझे वासरु । नको पान्हा चोरु पांडुरंगे ॥२॥
तू माझी पक्षिणी , मी तुझे अंडज । चारा घाली मज , पांडुरंगे ॥३॥
तू माझी हरिणी , मी तुझे पाडस । तोडी भवपाश , पांडुरंगे ॥४॥
नामा म्हणे होसी , भक्तीचा वल्लभ । मागे पुढे उभा , सांभाळीसी ॥५॥
भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा ०।
तू माय मी लेकरु । सदगुरुमाते ॥धृ०॥
बहु जन्म घेउनि श्रमलो दमलो । अजुनि मी किती फिरु ॥१॥
या भवनदीतुनि पार कराया । तूचि माझा तारु ॥२॥
अनन्यभावे मी तुज शरण आलो । ने मज पैल पारु ॥३॥
माय -बाप -बंधु सर्व असति परि । कोणी न दुःखहरु ॥४॥
हीन दीन मी दयासिंधु तू तुजविण मी निराधारु ॥५॥
आहे मी सत्य अनंत अपराधी । एक वेळ दे पदी थारु ॥६॥
कनवाळु प्रेमळु परम कृपाळु तू । भक्तां कल्पतरु ॥७॥
सवारंभ सर्वाधार तू । सर्वांगसुंदर ॥८॥
अलक्ष अनाम अरुप अक्षय तू । दासांसी करुणाकरु ॥९॥
अज अमर अचल अनुपमेय तू । परब्रह्म परात्परु ॥१०॥
तू सिद्धारुढ मी कलावती । तू स्वामी मी चाकरु ॥११॥
भजन - तुमबिन गुरुजी ०।
दीनन दुःखहरन देव संतन हितकारी ॥धृ०॥
अजामील गीध व्याध इनको संग कौन साद । पंछीको पढापढात गणिकासी तारी ॥१॥
तंदुल देत रिच जात सागपात सो अघात गिनत नही झूटे पल काटे मिटे खारी ॥२॥
ध्रुवके शिर छत्र धरत प्रल्हादको उभारलेत । भक्तहेत बांध्यो सेत लंकापुर जारी ॥३॥
गजको जब ग्राह ग्रस्यो दुःशासन चीर खस्यो । सभाबीच कृष्ण कृष्ण द्रौपदी पुकारी ॥४॥
इतने हरि आय गयो बचनको आरुढ भयो । सूरदास द्वारे ठाडो आंधरो भिकारी ॥५॥
भजन - सच्चिदानंद कृष्ण ०।
आठवू किती उपकार गुरुराया ॥धृ०॥
रहाटगाडग्या परि भवभ्रमणी । चुकविली येरझार ॥१॥
इंद्रजालवत दृष्य दाउनि । भ्रमपट केला दूर ॥२॥
प्रेमरसाचा पान्हा पाजुनि । दूर केली हुरहुर ॥३॥
दहासहाते मारुनि बोधे । दिधला चरणी थार ॥४॥
कलिमलहरणा सुभक्तरमणा । निजि निजविले स्थिर ॥५॥
भजन - चला चला रे सर्व मिळोनि ०।
शेवट गोड करी ०। ते विज्ञापना