निलोत्पल कमलनीकंद मद सैधव येकत्र करूण दिजे पगर शमे ॥ कुंकुम केशर कुसुंबा साकर मुस्ता दुधे पिजे पगर शमे ॥
पारवी विष्टा तांदुळाचे धोवने दिजे रक्तश्राव राहे गर्भ न पडे ॥
सुपारि भिजऊन चुर करूण पाणि काढीजे आत काथ घालून घेइजे पगर शमे ॥
तांदुळज्याचे मुळाचा रस साकरेसि दिजे पगर शमे ॥
तांदुळाचे धावन चिकलीयाचा रस दिजे पगर शमे ॥
पेटारिचा रस साकरेसी दिजे रक्त राहे ॥ कासळीचा रस साकरेसी दिजे रक्त राहे ॥
साकर गाइचे दुधासि दिजे योनि शूळ शमे गर्भ धरि ॥
उंबराच्या मुळाचा काढा तुप साकरेसी दिजे रक्त राहे ॥ कांडवेलि तुपेसि दिजे सुखे प्रसुत होय ॥
हिंग कांजिये वाटून दिजे प्रसुत होय ॥ तिळाचे तेल चुला सइबराच बीज येकत्र करूण देने गर्भ पडे ॥
इंद्रगोवयाचे चूर्ण करूण तुपासी लेपु किजे योनि स्वस्थानि बसे ॥