गुदीस अंकूर वाढती ते अरीस ह्मणौजति येक रक्त श्रवति येक विष्टंभिये तेसर कोवळे सावळे वात लक्षणि श्रवतीस चोपड दाट स्थेमी चिर्कट सर्व लक्षणी पातुळे बहु श्रवति रक्त ते कष्ट साध्य ॥ विष्टंभीयासी घेण रेचक वात साभक स्रवि पीनक रुचि प्रदावो वा ताक सेविजे विष्टंभ समे ॥
चाकवत सुरण शाक कीजे कोकमाची पान वाटून गुदि लेप किजे डवडांगरीच्यापानाची गुदवरि बैसवीजे डवडांगरि उदके श्रोतांजन किजे अंकूर शमति मळशुद्ध होईल गोळी सुइजे सराटे मुळाची खरि सेळिचे दुधामधे रांधिजे मग खलून गध्याने चारि प्रतिदिनि सेविजे साकरेसीस्तु अतिसार शमे ॥
रिशे श्रवति रक्त धाराते बनव्हे सर्वथा येर रोग करिती सर्वथा ॥
मिरे सुंठि चित्रक सुरणा याचा दशगुणा माका सैधव भाग विसण किजे गद्याने सेविजेता कसि विष्टंभियासि नासि ॥
अग्निमांद्याचि सोये राहे नेदि ॥१॥ हृदई वाता गुदी दुखेति सुजि ज्वरु बाधितो असाध्य ॥
इंद्रावनिमूळ जाळून भस्म कीजे गाइचे तुपे मध्ये कढउन गुदि लाविजे रिशे कोंब शमति ॥
तिकनीचा कटु वाटुन गोळि तुपासि गिळिजे रिसे गळून पडतील ॥
दातिच मूळ लोणरखार येरंड पाणि लाविजे रिसे गळून पडतील ॥
कोकुंब कोराटा पंचाग घेइजे साउलीत वाळविजे गोमुत्र भावना दिजे सावलीत वाळविजे चूर्ण किजे त्यांत वोखद मेळविजे त्रिकटु त्रिफल चूर्ण करूण वरील भुरका व हे येकत्र करूण सम भागे साकर घालिजे प्रत्यहि टाक ३ घेत जाइजे मूळव्याधि जाय ॥
पांजरपाचापला वैरागडे मीठ वाटिजे गुदी लेप किजे वाटा सुबद्धदीजे ॥
इट ताइजे वदि रगट घालिजे वरि बैसवीजे रिशे जाति ॥
करकेसि हेचि वोखद गुदीस कडु असे वोढा सुबुद्ध दिजे ॥१॥
डिक भाजिला ३ जिरे ३ चूर्ण करूण गुळ १ पाकदिजे २१ सेविजे श्रावक रिशे जाति ॥ बाळबेल जिरे शेपा पाहाड लहान चवि कटकि पाच लोण पिपळामूळ जवखार इंद्रजव त्रिकुट त्रिफळा पत्रजे वेळा नागकेशर सम भाग टाक घेऊन चूर्ण कीजे टा ३ उष्णोदके वाष्ट भीये येरंडतेल शेविजे रिशे जाति ॥
काळज्ञ कुडा इंद्रजव काळे जिरे चिराइत नेपाळे इतुके समभागे येकत्र किजे पाणि शेर २ घालोन कढविजे मग मोचरस घालोन शेविजे अशा मात्रा श्रावक रिशे जाति ॥१॥
लोखंडीच तेल नागवेलीच पानी माखून पान भक्षिजे रिशे जाति ॥
लवंगा डवडांगरीबीज इद्रावनिचिमुळि गुळ येकत्र करूण काकडा माखण गुदी घालिजे रात्रि प्रहर असो दिजे ७।१४।२१ किजे तरि समुळि रिशे जाति ॥१॥
सुरनमुळीकंद कुड्याचि सालि कडसरयाच बीज समभाग ताक वाटून दिजे कुशक श्रावक रिश जाति ॥
पारा भादाति पंचाभाग ३ ताम्रटंकणभाग ५ सैंधव ५ जवखार ५ कळदाबीकंद २ चित्रक लोहभस्म गंधक भाग २ कलिंग भाग २ त्रिकुट ६ निवडिंगाचि फळे २ गोमुत्र पळे २६ येकत्र भावना देऊन मर्दून सूर्यपुट दिजे वाळउन मात्रा मास १ उष्णोदके देन रिसे कुभकवि विष्टभीये जाति ॥
इति अरिसप्रकर्ण समाप्तं ॥