खैर हिचर कोराटा आसवंद याहाचि साली पाणियामध्यें कुट किजे गुराळिया टाकिजे ता (दा )त बळकट होति ॥
आस्वंद मूळ सालि रुइचि मुळिचि सालि हिंग येकत्र करूण उनळिने दाढें धरिजे निवारे दात वेथा ॥१॥
नागवेलिचि गुदि करून दाढेसि घालने दाढेचि कळ जाय ॥
जायपत्रि वसो वेखंड पिंपळी कोराटा कोष्ट चवी हिरडा सुंठि सम भागे चूर्ण करूण पोटोळि करूण ॥
विडियात धरिजे दात बळकट होती ॥ कफू जाये दातिची कळ जाय किडि मरे दुर्गंधि नासे ॥
कोराटा दारू हळदी आंबिहळदि लाजाळुचि मुळि पाहाडके दारमाळ कगोनि मूळ सम भागे वटि करून दाढे धरिजे किडि मरे ॥१॥
चुना पिंपळी रुचिकपान वेखंड कोष्ट हळदि तेल वाटून तोंडि लेपु किजे वंगवन मुरूम जाय ॥१॥
पिकलिया निंबुवचा रस लावित जाइजे वन जातो ॥ जायफळ जायिचसालि पाणिये वाटोन लेप किजे वन जाति ॥१॥
जायपत्रि गुळवेल द्राक्षे देवदार धात्रिफला क्वाथ मद साकरेसि दिजे मुखरोग जाय ॥
वाळकाळा पिंपळी बाबरिसेवांतिफूल वाळा हा लेप किजे जिव्हेसि फाड मुखरोग जाय ॥१॥
हाळदिचा काढा करून गुरळ्या टाकिजे मुखरोग जाय ॥१॥
बोरांच बीज मध गुळ नवनीत येकत्र करून लेप किजें वंग जाय ॥ मुखरोग तंत व्यथा समाप्तः ॥१॥
आंबियाची सालि दाळिंबिचि सालि त्याचिच मुळि शंख चूर्ण येकत्र करूण वटि करूण मुखि धरिजे गंधि नासे ॥
जायफळ जायपत्रि मातुलिंग कुंकुम केशर कोष्ट कीजे मुखि धरिजे गंधि नासे ॥१॥
अथगळसुंटिस औषध ॥ हिरडे वेखंड कोष्ट मधु हळदि वोवा यानिचे दुधे वाटून पाजिजे गळसुंटि जाती ॥१॥
भिजरि घायेळिया गाठी उदेजति कंठि तो रोहिणी रोग जे मिठि जिवित्व मसि ते पासोन खुडिजे निस विरवे सोखिक वोखद घालिजे येऱ्हे प्रयत्ने वाचिडो येरवि नावरे हा रोग ॥१॥
गुणळ निंबरस उन करूण गळा लेप किजे गळसुंटि जाति ॥