सांगि उगाळून कडिस लाविजे भितरि दडपिजे वरि वोढा दिजे व्हानिघेल तेव्हां ऐसेचि किजे स्वरळानि बसे ॥
कोष्ट मिरे हिंग विखजिरे काळा बोळ विखटें भुरनीबीज पारवी याचि विष्टा वृद्ध भागे मेळवीजे निंबरसे कडिस माखून माखु वरि निंबोटि देऊन वरि कासोटि दिजे दिन ७ किजे बहुत दिवसाचि कडि निघत असेल ते बैसे ॥
सुख साध्य चमकत्कार कडी निघालि अस तेथ बिब्याचे तेल लाविजे दडपून भीतकी घालिजे वरि भोटा दिजे स्वस्थानि बैसे ॥
बोरिची अंत्र साली बाभुळीचि अंत्रसालि आत्रो मडका घालिजे मद तांदुळ सालिवरि घालिजे उदक घालोन थापारि तांळा रांधिजे गाइचे ताकासि दिजे अतिसार संग्रहणी शमे ॥
भद्रमुस्ता उष्ण उदके चूर्ण करून दिजे आमशूळ ज्वर बहुतादिवसाचा अतिसार नासे ॥
कुडियाचि सालि गाइचे दुधासि दिजे अतिसार शमे ॥
कोथंबरि बालबेल सुंठि वाळा भद्रमुस्ता हा कढविजे अतिसार ज्वर नासे ॥
ये र्हउदके पथ्य दिजे रांधुन ॥ वय मुरडा आवरक्त राहे ॥
सुंठि मोचरस अजमोदा धायफल ताके वाटून दिजे विसुचिका हागवन राहे ॥
सुंठि मुस्ता कुडे सालि अतिविख सम भाग चूर्ण करूण गुळवेलीचा काढा करूण त्यांत अनुपान हे चूर्ण घालोन टाक दिजे अतिसार ज्वर भलता शमे ॥
मीठ वैरागडे सैंधव चवीचळ जवखार वोवा अजमोदा हिंग वावडिंग चित्रक हिरडा मिरे पिंपळी येकत्र करूण चूर्ण कीजे जेविता पहिले घास पांच चूर्ण घालून तुपे कालउन भक्षिजे जेविजे अतिसार शमे ॥