रोगोपचार - प्रमेंद्रिय उपचार

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


सिळा दैत्य साकर समभाग दिजे रक्तप्रमेह पुटति उन्हाळा शमति ॥

पेटारिचा रस साकरेसि दिजे प्रमेह जाये ॥

सहस्रमुळि सत्व गुळवेलि गव्हाचेसत्व मोहककाट्याचेसत्व समभागे साकरेसी दिजे गाइचेहिरवे दूध सोजि घेइजे तिडिक गळत असे उनहाळे प्रमेह जाये ॥

धोतर्‍याचा फुलाति गाभ घेऊन वाळविजे । - जायफळ जायत्रि । - वेळा येकत्र करूण साकरेसि दिजे गळत प्रमेह जाय ॥

नागार्जुनी समुळीसपत्री सावळीत वाळविजे साकरेसि दिजे प्रमेह जाये ॥

त्रिफला देवदार हळदी इंद्रावनाचेमुळ वोखद मात्रा टाक १६ पाणिशेर घालून काढा करूण प्रतिपाक हळदि टाक १ सहादासि दिजे प्रमेह जाये ॥

भेंडाचि मुळि मद साकरेसी दिजे प्रमेह जाये ॥ येळा लवंगा तज साकरेसि दिजे प्रमेह जाये ॥

त्रिफळा येळा लवंगा नागकेशर तज साकर येकत्र करूण दिजे प्रमेह जाय ॥

तीळ जिरे लवंगा समभागे दिजे प्रमेह जायें ॥ गुळवेलिचे सत्व साकरेसी दिजे प्रमेह जाये ॥

आवळ्याचा रस साकरेसि दिजे प्रेमह जाये ॥ तिळाचाखार दुधासि दिजे प्रमेह जाये ॥

त्रिफळा लोहभस्म शिळा दैयित्य येकत्र करूण दिजे प्रमेह जाय ॥

सराटे बीज भाग १ तीळवनीच बीज भाग १ गाईचे दूध । - जळप्रमेह जाये ॥

महारुख समुळि सपत्रि आनून सावलीत वाळविजे वस्त्रगाळीत कीजे दूधसाकरेसी दिजे मूत्र कृछ प्रमेह शमे ॥ इतिप्रमेह रोग प्रकर्ण समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP