रोगोपचार - श्वासरोग उपचार

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


गुळ मिरे हळदी राष्णा द्राक्षा पिपळिचूर्ण करूण तेल कालऊन भक्षिजे श्वास दारुण जाय ॥

रिंगानि सैंधव जटामासि ॥ वैरागडे ॥ सविचळ त्रिकुट वेळा त्रिफळा येरंडमूळ चूर्ण करूण उष्णोदके घेइजे दारूण श्वास जाय ॥

सुंठि भारंगीचूर्ण करूण उष्णोदके दिजे श्वास जाय ॥ साकर द्राक्षे पिंपळीचूर्ण करूण उष्णोदके दिजे तेल कढउन भक्षिजे दारुण श्वास जाय ॥

सुंठि माक्षिक येकत्र करूण दिजे श्वास कास जाय ॥ काकडसिंगी ॥

त्रिकुटा त्रिफळा रिंगनिक्षार येरंडमूळ पाच हि लवणे चूर्ण किजे उष्णौदके घेइजे श्वास कास पिनस जाय ॥

बाब्बुळाचि सालिचि लाटिचि सालिच्या मुळ्या सेर १५ काढा किजे सेर ३ उतरिजे मग हिरडाचूर्ण करूण त्यात घालिजे गोळिया बांधिजे निद्राकाळि तोंडि धरिजे रेववेन जाये ॥

रूइचे फुल सावलिये सेविजे लसन वोवा वेखंड येकत्र करूण भुरका करूण गुळासि थोर प्रमाण वटिकाटि किजे भक्षिजे खोकजा जाय ॥१॥

जांबुळि आंबा आलेसि सेविय ॥

बोरि बाबुळिचि अत्र सालीचा भुरका किजे आडोळशाचा रस आलेरस पावशेर आत भुरका घालून दीजे पथ्य सोजि तूप दिजे महारेवेन रोग जाय ॥

हस्ती गाय येकवर्णि उष्ट्रर अजा हौस नर याहाचि मुत्रे येक येक घेइजे गेळ शेर १ हिरडा टाक ९ वळकंटि येक रांधिजे उत येतिल मग उतरिजे वाखद वाळवून मग भुरका किजे मिरे । - घालिजे गोळिया किजे खोकला खास जाय ॥

नसदिजे धुर जाय ॥ ताम्रभस्म टाक ६ क्वाथ काकडसिंगी आकलकाढा भारंगि हिंग कोळांजन बाफळि कोष्ट त्रिकुट सैंधव अतिवीख येकयेक टाक ३ भुरका करूण आडोळसा याचा भावना गोमुत्र उष्टमुत्र याचा भावना ३ देऊन टाक वडि बांधिजे सेविजे रेवेन खोकला जाय ॥१॥

पेटारिचि मुळी दाढि धरिजे हिंगनाच्या पाल्याचा रस हिंग मिरे सिदिजे खोकला जाय उभळि जाय बळस पडति ॥

आडुळसा रिंगनीमूळ हेटियाचि फुले बोरिचे हिरडे बाबुळिचि सालि आले नागवेलीचि पाने कारिचिपान सेउगे सालिये अवधि येकवाट करूण येरंडपत्रि बांधूनि पुट करित बाफळि कोरांजन कटुफळ काकडसिंगि आकलकाढा कचोरा लवंगा काथ कापुर कंकोल मिरे रेनुका त्रिफला त्रिकुटा हिरडा बेहाडा रिंगनि बीज डोरलीबीज येकत्र भुरकावऱ्हिलपुट पाक असे येकत्र वाटून गोलिया बांधिजे सहदासि घेत जाइजे क्षयो जाये खोकला जाये ताप जाये पिकले उंबर पिकल सेवन आडोळसीयाचि फुले रस आवळकंठि यास येकत्र करुण खांड मधासि दिजे तोंडा वाटा रक्त पडत असेल ते राहे ॥

आडोळसायाचा रस मध सेविजे खोकला शमे ॥

डोळबियाचि फोडि पाणिये वाटून दिजे पाटिस तेला लाऊन उन्हात बैसविजे खोकलि याचि पिसवि पडे ॥

उतरनीचिफुले २४ मिर २४ दिजे खोकला शमे ॥ वाळ्याचा रस टाक ९ आतबोळ वाल १ घालून दिजे श्वास जाये ॥

कडु दुधिगा कोरूण आत वैरागडे मीठ घालून टाक ९ अधर बांधिजे हाक्त वीत जाईजे दिन ७ असोदि जे मग तो रस घेत जाइजे अंतर श्वास जाय ॥१॥

बहळा चूर्ण करून मदसी दिजे ३ श्वास जाय ॥ काकडबोळ गाईचे दुधसि दिजे श्वास जय पुष्ट होय ॥

तिळाच्यामुळ्याचा काढा गाईचे दुधा रांधिजे घत्य हि दिजे खैन जाय ॥१॥

बिबवे २ चनियाचे दालि सुठि येकत्र प्रतिदिन दिजे खैन जाये ॥ खोकळ्याचि पिसवी पडे ॥

रिंगनीचि कोवळी फुले आणोन कांडुन कुट करून त्यात वोखद घालून त्रिकुटा काष्टाकोळांजन बाळळी आले इतके घालून शेळिच्या मुत्राच्या भावना ७ देऊन गोळिया बांधने दोहि सांजि सेवन खोकला श्वास जाय ॥

उत्तरनीचि फुले निगुडिचि पान येकत्र करूण भुरका ह्मैसि मुत्रे प्रातःकाळि घेइजे उखाळु पाखाळु होये ॥

पथ्य मुगाचे वरुण दिजे असे दिवस घेइजे खोकला श्वास जाये ॥१॥

गंगावतीचा रस मिरे प्रति पाके दिजे खोकला जाये ॥१॥

काकड सिंगी त्रिकुट बाळळि कटु फळ कोष्ट धामास हे चूर्ण आले रसासि दिजे बळ सुपडे उर मोकळा होये ॥

सुंठि तरवडि झामुळ्याचि सालिचा रस ६ टकन वाल २ दिजे अरित जाये ॥

येरंडडिरिया रुयिच्याडिरिया वाटून सितळ उदके दिजे अरित श्वास जाये ॥

येरंडडिरिया रुयिच्याडिरिया वाटुन सितळ उदके दिजे अरित श्वास जाये ॥

चण्याचि दाळ रुचिके भिजविजे मग डाळ निंबरसे भिजविजे मग वाटून टाक दिजे श्वास जाय ॥

रिंगनीरस २ गुळवेली रस २ सुंठिरस २ येरंडमूळ रस २ तूप ४ घालून कढविजे तूप उरले मग उतरिजे ते शेविजे श्वास जाय ॥

वाळा नरमुळि याचा काढा किजे मिरे प्रतिपाके दिजे खोकला जाय ॥१॥ डोरलीच बीज रिंगनीच बीज गुगुळ पिंपळी चूर्ण दिजे अतरित जाये ॥१॥

त्रिफला टाक ९ काथ । - आघाडेबीज कोळांजन भारंगी बाफळी टाक ९ येकत्र चूर्ण किजे निर्गुडी रसाचि भावना ३ देउन प्रमाण टाक १ वटिका किजे सेविजे अंबील राईतेल वर्जिजे खोकला उभळ शमे ॥

पिंपळी डोरलीयाचा रस आडुळसा याचा रस कांडवेलिचा रस । - अनुपान हिरडा भद्रमुस्ता कोकन काथ भुरका घालुन दिजे खोकला जाये ॥

पिंपळमूळ अतिविख भारंगी काकडसिंगी येकत्र करूण शेविजे मुळी दाढे धरिजे कोरडी उभळी शमे ॥ मिरे । - निगुडी रस १ येकत्र रस आटे नव रांधिजे मग मिरे काढोन भुरका किजे मदेसि घेत जाइजे दारुण खोंकला उभळी शमे ॥

इति खोंकला श्वास प्रकर्ण समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP