बिबवे सैंधव पिंपळी शर्करायुक्त घेईजे स्वय सुगंधि जाय ॥
चवि आम्लवेतस त्रिकुट तालिस जिरे निवडिंग करावा रोचन बिजानक चित्रक सर्वा सम गुळ वटिका करून जे विजे स्वर भंग पिनस फेडि ॥१॥
विहसा कोष्ट हळदि देवदार दारू हळदी सैंधव जवखार ये व्हीपजे तेल नसुदिजे येव्हे नासती रीसे ॥१॥
नाकामध्यें फोड अथावा अंकुर खपलिया ते नासिवरिस ह्मणती ॥
झारिचे नाचके पानि नाकामध्यें उदक घालिजे पिनस जाय ॥१॥
कुतरे मुतलेला इभुद व्यालि असेल तेथिल छत्र निघालि असे ते घेइजे सुत्रि तेल घालु कढविजे नसुदिजे पिनस जाय ॥१॥
सुंटि सहद तुप साकर येकत्र करुण देमधि वरि तळि अदि घालिजे पुरिजे दिवस २१ असो दिजे ते शेविजे पिनस श्र्लेष्मा जाय ॥१॥
रुचिक हिंग भिजविजे काळे २ दिजे त्याचे नाकिधूर दिजे रक्त राहे ॥
पिकले उंबर पिकले सिवन आडोळ्याचि फुले आवळकंठि येकत्र करून खांड मदसि दिजे नाकिच रक्त राहे ॥१॥
गव्हाचि कान्हि पाटावाचि मसि येकत्र करूण कांजिये वाटून नस दिजे ॥ तवखीर गोपीचंदन कोष्ट साकर दूध मर्दून नसु दिजे रक्त राहे ॥१॥
कांबें सेंदूर रुचिक देवपल्लेचि फुले येकत्र टाळु पासून जिरवने लेप किजे गव्हाचि सोजि रांधिजे उनउन त्यावरी लेप दिजे रक्त राहे सोन पडवळि गुळवेल निंबु मुस्ता हिरडा निलोत्पल सम भाग मद साकरेसि दिजे रक्त राहे ॥ इतिनास रोग प्रकर्ण समाप्तः ॥