ताक गाइचे दुध घेइजे खडा फुटे ॥
पाठरफळीबीज काकडीच बीज येकत्र करूण दिजे खडा फुटोन मुत्र निरोध फिटे ॥
सायाचे फळ काकडी बीज कांजिये वाटुन दिजे मुत्र निरोध फिटे । कुकु नरमुत्रे कालऊन दिजे कुडि पाहून मुत्र निरोध फिटे ॥
आस्वंदबीज नरमूत्र वाटून दिजे खडा फुटे मुत्रासरिसा बाहिर पडे ॥ कोळहीयाचा रस खारे मदासि दिजे मुत्रकृछ नासे ॥१॥
मोहोलिंगाचा रस जवखारे दिजे मूत्रकृछ नासे ॥१॥ जाईची फुल हिंग जवखार येकत्र करूण दिजे मूत्रकृछ नाशे ॥
शैंधव वाळुवाकबीलज उन्हवनियेसि दिजे मुत्रानिरोध फिटे ॥ गव्हाचे चूर्ण कीजे मेंढिदूध वाटुन लेप किजे व्रसनव्रुधि नाशे ॥
येरंडेलतेल कसीस सैंधव उन करूण लेप किजे वृषणवृद्धि नाशे ॥ आतां भइंद्रिय सांगेन ॥
वावडिंग त्रिफळा पिंपळी मदासी दिजे भितरी सुरणीयाचा खांद उगाळून लेप करणे त्याने पानपे भगइंद्रिये ॥
साइच्या डिरिया पिंपळीच्या डिरिया पिंपळाच्या डिरिया सुटि सैंधव रायभोग वाटुन लेप किजे भगइंद्रिय नासे ॥
दाति चित्रक हळदी पाणिये वाटून लेप किजे भगइद्रिय नाशे ॥
त्रिफळा गुळपाणिये उगाळून अथवा वाटून लेप किजे भगेंद्रिय नाशे ॥
डाळुसर लेप किजे वाति घालिजे भगइंद्रिय नासे ॥
त्रिफला माजरविष्टा येकत्र करूण लेप किजे भगइंद्रिय नासे ॥