पुर्वी अभ्यासकाळीं आपल्यापासुन उप्तन्न झालेल्या नानाप्रकारच्या कार्याहीकरुन विस्तार पावलेल्या अविद्येबरोबर लढाई करुन बोधाला जय मिळून तो सुदृढ झाल्यावर त्याला तिचपासुन कसची बाधा होनार आहे ? ॥८१॥
आतां अज्ञान व त्यांची कार्ये ही केवळ प्रेतें होऊन पडली राहोत । त्यापांसुन आतां मुळींच भिती नाही. इतकेंच नव्हें तर बोधराजाच्या कीर्तीच्या तीस्मारक काऋतेच म्हटली पाहिजेत ॥८२॥
अशा प्रकारचा शुर बोधराज ज्याच्या हृदयामंदिरी नेहमीं वास करितो त्याला शारीर अथवा मानसिक कर्माच्या प्रवृत्तीनें किंवा निवृत्तीनें काय होणार आहे ? ॥८३॥
कर्माविषयीं प्रवृत्ति असावी असा आग्रह ज्ञानहीन पुरुषालाच योग्य आहे कारण तशा लोकांनी सर्गमोक्षाकरितां यत्न केलाच पहिजे ॥८४॥
अशा ज्ञानहीनपुरुषामध्यें जेव्हा एकद्या तत्त्ववेत्या पुरुषाला रहावें लागतें तेव्हा तो आपल्या कायिक वाचिक व मानसिक सर्व क्रिया त्यांना अनुसरुन करितो ॥८५॥
आणि जेव्हा मुमुक्षुमध्यें त्याला रहावें लागतें तेव्हा त्यास ज्ञान व्हावें म्हणुन त्याच्या क्रियेस दुषण देऊन आपणही क्रिया टाकितो ॥८६॥
ज्ञानाचेंआचरण अज्ञान्याच्या आचरणास अनुसरुन असणें हेंच योग्य कारण बाप हा तान्या मुलाला अनुसरुन वागतो तसा हा अज्ञाननास बापासारखा आहे ॥८७॥
लहान मुलांने बपाला शिव्या दिल्या किंवा मारलें तरी त्याला त्यापासुन दुःख होत नाही व रागही येत नाही ; उलटे त्याला त्यांचे कौतुकच वाटते ॥८८॥
त्याप्रमाणें तत्ववेत्याची मढानीं स्तति केली किंवा निंदा केली तरी तो त्यांची उलट निंदा किंवा स्तुति न करितां जेणेकरुन त्यांस ज्ञान होईल असेंच वतन ठेवितो. ॥८९॥
जेणेकरुन अज्ञन्याला बोध होईल तसेंच आचरण ज्ञान्यानें ठेवावें कारण ज्ञान झाल्यावर ह्मा लोकीं अज्ञाजनांस उपदेश करण्यावाचुन दुसरें कर्तव्यच नाहीं ॥२९०॥
याप्रमाणें आपली कृतकृत्यता व प्राप्तप्राप्यता स्मरुन निरंतर मनांत तृप्त असतो. तो असें म्हणतो ॥९१॥
आर्या मी धन्य धन्य झालों आत्म प्रत्यक्ष जाणिला म्यां कां ॥ ब्रह्मानंद कसा हा भासे मजसम दुजा न या लोकीं ॥१॥ ॥९२॥
आ०- मी धन्य धन्य मोठा संसारिक दुःख मज दिसत नाही । अज्ञान पळूनि गेलें त्याचा गंधहि न राहिला कांही ॥२॥ ॥९३॥
आ०- मी धन्य धन्य मोठा कांहीं कर्तव्य नाहीं मज उरलें ॥ प्राप्तव्य पदरीं आलें सद्रुरुचें चरण घट्ट मी धरिलें ॥३॥ ॥९४॥
आ०- मी धन्य धन्य मोठा माझ्या तृप्तीस नाहींहो उपमा ॥ कोठवरी वर्णावी, आतां मी पावलों स्वमुखधामा ॥४॥ ॥९५॥
आ०- बहु जन्मिं पुण्य केलें त्यांचें फळ पक्क आजिं मज मिळलें ॥ सदरुराजकृपेनें माझें आनंदरुप मज कळलें ॥५॥ ॥९६॥
आ०- सच्छास्त्र सद्गुरुचा वर्णु मी या मुखें किती महिमा ॥ ज्ञान अमोलिक किति हें आनंदाख्धीस या नसें सीमा ॥६॥ ॥९७॥
आ०- हा तृप्तिदीप हातीं, घेउनि जो नर अहर्निशीं पाही ॥ ब्रह्मानंद समुद्रीं नित्यचि तो मग्न होउनी राही ॥७॥ ॥९८॥
तृप्तिदीप समाप्त ।