स्वतः जो अपरोक्ष जीव आहे आणि तो ब्रह्मा होऊ इच्छिल्यानें त्याचें जें मुळचें अपरोक्षत्व तेंही नाहींसे होतें ही कल्पना मोठीच म्हणवयाची ॥८१॥
एकुन वृद्धिमिष्टवतो मुलमपि नष्टं ही जी लोकांत म्हण आहे तिचें सार्थक्य तुं आज केलेंस ही मोठी कूपाच समजावयाची ( व्याज इच्छिणाराचें मुद्दलही गमावलें ) ॥८२॥
याजवर असा एक पूर्वपक्ष आहे कीं, हा बोध अंतःकरणविशिष्ट साक्षी जो जीव त्याच्या स्वरुपांचें अपरोक्षज्ञान होणें योग्य आहे. कारण तेथें उपाधि आहे. परंतु ब्रह्मांस तशी मुळीच उपाधी नाहीं तेव्हा त्याचें अपरोक्षज्ञान कसें व्हावें ॥८३॥
तर तशी कांहीं शंका ध्यावयास नको ब्रह्माला ही उपाधि आहेच कारण उपाधि विदेहकैवल्यापर्यंत ( म्हणजे जीवन्मुक्ताच्या देहपातापर्यंत ) जात नाहीं ॥८४॥
अंतःकरणासहवर्तमान असणें ही जशी जीवाची उपाधि तशीच अंतःकरणविरहित असणें ही ब्रह्माची उपाधि आहे ॥८५॥
पहिली आहेपणाची उपाधी आहे आणि दुसरी नाहीपणाची आहे; एवढाच काय तो भेद. विधि उपाधी झाल्यानंतर मग निषेध उपाधि का नव्हें ? एक सोन्याची शृखाला झाली आणी दुसरी लोखंडाची म्हणुन शृखला कोठे जाईल उपाधीचें लक्षण हेंच कीं कार्य असेपर्यंत असणार्या भेदाचें जें कारण तीच उपाधी ॥८६॥
आचार्यांनी असें सागितलें आहे कीं वेदातांत ब्रह्मांचे जें वर्णन केलें आहे तें कांहीं ठिकाणीं विधिमुखाने व कांही ठिकाणीं निषेधमुखानें केलें आहे म्हणजे सत्यंज्ञानामनत ब्रह्मा इत्यादिक श्रुतीने ब्रह्मा अशा अशा प्रकारचें आहे म्हणुन सांगितलें आहे. आणि कोठे कोठें नेति नीति इत्यादिक श्रुतीनें द्वैतातील मिथ्या पदार्थाचें निरसन करुन म्हणजे हे ब्रह्मा हें ब्रह्मा नव्हें अशा रीतीनें त्यांचें स्वरुप वर्णन केलें आहे. ॥८७॥
वर निषेधमुखान ब्रह्मास्वरुप वर्णिलें आहे असें म्हटलें त्यावरुन असा एक प्रश्न निघण्याजोगा आहे कीं अहं ब्रह्मास्मि" या वाक्यांत "अहं" शब्दांचाही "नेति नेति" या श्रुतीवरुन त्याग करावा लागेल मग मी ब्रह्मा आहे असें सामानाधिकरण्यानें ऐक्यज्ञान कसें होईल ? तर त्याजवर आमचें उत्तर असें आहे कीं तेथें आहं शब्दाचा सर्वाशीं त्याग होत नाहीं. जहदजहल्लक्षणेच्या योगानें केवळ त्यांतील जडाशांचा मात्र त्याग सांगितला आहे कुटस्थाचा त्याग होत नाही म्हणुन मी ब्रह्मा आहे असे ऐक्यज्ञान होण्यास प्रत्यवाय नाही ॥८८॥
येथें अंतःकरणरुप उपाधीचा त्याग करुन बाकी राहिलेल्या साक्षीचेठायीं अहंब्रह्मा या वाक्यांनें ब्रह्मत्व सिद्ध होतें ॥८९॥
येथें दुसरी अशी एक शंका आहे कीं आत्मा स्वप्नकाश असुन तो बुद्धिस कसा विषय होईल? तर यांचे समाधान असें कीं, आत्मा जरी स्वप्रकाश असला तरी बाकीच्या घटादिक पदार्थाप्रमाणें तो बुद्धिनें व्याप्त होतो आतां शास्त्राकारांनीं जें आत्म्यानें बुद्धिव्याप्यत्व निराकृत केलें ( मनोवृत्तीस विषय नाहीं असें जें म्हटलें ) त्याला अभिप्राय असा कीं चिदाभासाचा परिणाम त्याजवर विशेष घडत नाहीं. ॥९०॥
कोणच्याही पदार्थांचे ज्ञान होतांना बुद्धि आणी तिजमधील प्रतिबिंबत चिदाभास हे दोन्हींही त्या पदार्थास व्यापातात. तेव्हा दोन्हीचीं निरनिराळीं कार्ये त्या पदार्थावर घडतात बुद्धिव्याप्तीनें अज्ञानाचा नाश होतो. आभासाने पदार्थानें स्फुरण होतें म्हणजे तो अमुक असें भासतें ॥९१॥
ब्रह्माज्ञान होतांनाहीं असाच प्रकार घडतो परंतु येथें अज्ञानाचा नाश होण्याची मात गरज आहे . स्फुरणाची गरज नाहीं. कां रण तें स्वतः स्फुरणरुप आहे. याकरितां बुद्धिव्याप्तीचा मात्र येथें उपयोग होतो परंतु चिदाभासाचा जो विशेष उपयोग तो येथें होत नाहीं हें पुढील दृष्टातांवरुन चांगलें ध्यानांत येईल ॥९२॥
घटादिक पदार्थ पहाण्यास डोळा आणी दिवा ही दोन साधने अवस्थ आहेत परंतु केवळ दिवाच पहावयाचा असेल तर एक डोळ्याचे साधनच बस्स आहे आणखी दुसर्याची गरज नाहीं ॥९३॥
त्याप्रमाणें ब्रह्मा ज्ञान होतांना चिदाभास जरी असला तरी त्याचा विशेष परिणाम ब्रह्मावर घडत नाही. सुर्यप्रकाशांत दिव्यांचा प्रकाश जसा लीन होतो त्याप्रमाणें तो चिदाभास ब्रह्माविठायीं लीन होतो ॥९४॥
"अप्रमेयमनादि च" इत्यादी श्रुतिवाक्यांचा अभिप्राय हाच की चिदाभासाचा परिणाम ब्रह्मावर मुळींच घडत नाहीं. आणी मनसैवेदमात्पव्य इत्यादिक श्रुअतिवाक्यांवरुन बुद्धिव्याप्तीची अपेक्षा आहे असा अभिप्रय निघतो ॥९५॥
"आत्मानंचेत विजानीयात अयमस्मीति पुरुष" या वाक्यावरुअ सत्यादि लक्षण जें ब्रह्मा तेंविशय करुन मी ब्रह्माआहे " असे जो बोध तो येथे सांगितला ॥९६॥
महावाक्यापसुन जरी एकदां अपरोक्षज्ञन झालें तरी तें व्हावें तसें बळकट होते नाहीं, म्हणुन श्रवणमननादिकांचा अभ्यास तें ज्ञान घट्ट होईपर्यंत केला पाहजे असं आचार्यानीं म्हटलें आहे ॥९७॥
त्यांनीं असें म्हटलें आहे कीं अहंब्रहमस्मि या महावाक्यापासुन होणारें ज्ञान अगदीं दृढ होईपर्यंत शमदमादि साधनसंपन्न होऊन मुमुक्षुनें श्रवणादिकांचा अभ्यास करावा ॥९८॥
याजवर कोनी अशी शंका घेईल कीं महावाक्यापासुन अपरोक्षज्ञान होतें असें तुम्हीं म्हणतां मग तें दॄढ नाहीं असें कसें होईल ? तर त्याजवर आमचें उत्तर असें आहे कीं जरी वाक्यापासुन ज्ञान झालें तरी तेंडळमळीत असण्यास पुष्कळ कारणें आहेत एक तर श्रुति निरनिराळ्या असतात. दुसरें जाणण्याचा विषय नेहमीच्या रुढींतील नसल्यामुळे तो एकदां समजला तरी पुनःपुनः संशय येतो. तसेंच मी कर्ता भोक्ता अशा विपरीत भावना वारंवार मनांत उठतात या प्रकारचीच आणखीं दुसरी कारणें आहेत. म्हणुन श्रवणादिकांचा अभ्यास केलाच पाहिजे ॥९९॥
ज्याप्रमाणे वेदशास्त्रा व कर्मकर्त्याची कामना भिन्न भिन्न असल्यामुळे दिसण्यांत विरुद्ध वाक्यें पाहुन मुमुक्षुस भेदशंका येईल तिचें निवारण व्हावें म्हणुन श्रवणाची जरुर आहे ॥१००॥