याजवर असा एक पुर्वपक्ष आअहे कीं यत्रत्वस्य जगत स्वात्मा या श्रुतीचा अर्थासा आहे की ज्या मोक्षावस्थेच्या ठायीं सर्व जग आपण होतो तेथें कोनी कोणतें रुप पहावें ? कोनी कोणता ग घ हुंगावा ? कोनी कोनाचा शब्द बोलावा ? इत्यादीवरुन ॥८१॥
ज्ञान उप्तन्न झालें म्हणजे द्वैताचा नाश होतो असें ठरतें मग विद्वानाला भोग आहेत असां तुम्हीं कसें म्हणतां ? तर याजवर उत्तर असें कीं ॥८२॥
जी श्रुति सुषुत्तीला लागु आहे आणि मुक्तीलाही लागु आहे असा सुत्राचा स्पष्ट अभिप्राय आहे म्हणुन येथे सुषुप्तिपरच समजावी ॥८३॥
या श्रुतीचा अर्थसुषुप्तीकढे जर न लावला तर आज पर्यंत जे याज्ञवल्क्यादिक मोठमोठे तत्त्वज्ञ होऊन गेले, त्यांना आचार्यत्व देतां आले नसतें कारण त्यांना द्वैत द्सत होतें असें जर मानलें तर ते अज्ञानी ठरतात आणि तें त्यांना दिसतच नव्हतें असं जर मानले तर त्यांच्या तोडांतुन शिष्यदिकांस पढविण्याकरितां शब्दच निघाले नसते ॥८४॥
याजवर कोणी म्हणेल कीं निर्विकल्प समाधीमध्यें द्वैताचें दर्शन मुळींच नाही म्हणुन तिलाच अपरोक्ष विद्या म्हणणें योग्य आहे तर त्याजवर आमचें उत्तर असें की समाधि जर अपरोक्ष विद्या झाली तर निद्रा ही अपरोक्ष विद्या असें कांन ह्माणावें ? ॥८५॥
आतां तुम्हीं ह्माणाल कीम निद्रेंत आत्मज्ञान नसतें ह्माणुन ती अपरीक्ष विद्या नव्हे तर मग आत्मज्ञानालाच विद्या ह्माणा द्वैतविस्मृति कशाला पाहिजे ? ॥८६॥
द्वैतविस्मृति आणि आत्मज्ञान हीं दोन्हीं मिळुन अपरोक्ष विद्या होते असें जर ह्माणाल तर घटादिक जड पदार्थास आर्धी विद्या आहे असें ह्माटलें पाहिजें इतकेंच नव्हे तर घटादिकांस ती अर्धी विद्या जितकीं दृढ आहे जितकी योग्यांना देखील नाहीं ॥८७॥
कारण त्यांचा समाधि मशकध्वनि सारखीं थोडींशी विघ्नें आलीं कीं बिघडतो. तसा घटादिकांचा नाहीं ॥८८॥
तेव्हा आत्मज्ञान हीच अपरोक्ष विद्या आहे तीला द्वैताविस्मृतीची गरज नाहीं असें कबुल करणें भागच आहे दुसरा मार्ग नाही. आतां चित्तनिरोध केल्यावांचुन ज्ञान होतच नाही. असें असेल तर तो खुशाल करावा ॥८९॥
अतो अह्मास इष्टच आहे कारण ज्यापासुन जगाचें मिथ्यात्वज्ञान चांगलें होतें ते आम्हास आवश्य आहे. याकरितां किमिच्छंन या श्रुतीचा अर्थ इतकाच कीं ज्ञान्याची इच्छा अज्ञान्याच्या इच्छेप्रमाणे प्रबल नसते ॥१९०॥
शास्त्रांत के ठिकाणीं असें म्हटलेंआहे कीं विषयेच्छा असणें हे अज्ञानाचें लक्षण आणि दुसरीकडे अस म्हटलें आहे कीं ज्ञान्याच्याठायींत्या असल्या तरी चिंता नाहीं ह्मा दोन विरुद्ध वाक्याची व्यवस्था कशीकरावी असा कोनी प्रश्न करील तर पहिल्या पक्षीं दृढ इच्छा आणि दुसर्या वाक्यांत इच्छाभास असार्थ केला असतां दोहोंची एकवाक्याता होते ॥९१॥
जसे जगन्मिथ्यात्वज्ञानानें इच्छिण्याचें विषयच नाहीसे झाले असा कमिच्छन पदाचा भाव काढला त्याप्रमाणें आत्मा असंग आहे म्हनुन भोक्ता कोनीच नाही हाच अभिप्राय कस्य कामाय या पदाचा आहे ॥९२॥
पतिजोयादि सर्व विषय आपल्या भोगाकरितां मनुष्य इच्छितों त्या विषयाकरितां इच्छित नाहीं. असें श्रुतांत पुष्कळ सांगितले आहे ॥९३॥
आतां हा भोक्ता कोण आहे त्याचा विचार करुं हा भोक्ता कुटस्थ चिदाभास किंवा दोनीं मिळुन ? ह्मापैकीं एक असला पाहिजे आतां कुटस्थ जर भोक्ता ह्माणावा तर तो असंग असल्यामुळे त्यास भोक्तृत्व संभवत नाही. ॥९४॥
कारण सुखदुःखाचा अभिमानुरुप जो विकार होतो तोच भोग, आणि कुटस्थतर अविकारी आहे मग त्यास भोक्तृत्व असें येइल ॥९५॥
चिदाभास हा विकार पावणार्या बुद्धिमध्यें प्रतिबिंबित होतो. ह्माणुन तोही भ्रांतिरुप विकारी आहे. आता त्यास जर भोक्तृत्व लावावें तर अधिष्ठानावांचुन केवळ भ्रांति मुळींच संभवत नाहीं. म्हनुन केवळ चिदाभासही भोक्तां म्हणतां येत नाही. ॥९६॥
याकरितां या दोन्हीलांही भोक्तृत्व नलावितां त्य उभयांताच्यासांगडीस लावावें हेंबरें, आणि लोकंत भोक्ता भोक्ता जो म्हणतात तो हाच तशा भोक्त्या आत्म्याचा उपक्रम करुन श्रुतींत कुतस्थान शेवटें सत्यत्व दिले आहे ॥९७॥
अश्रुतीमध्ये याज्ञवक्लयास आत्मा कोन असा जनक राजानें प्रश्न केला असतां त्याणें विज्ञानमय कोशापासुन उपक्रम करुन शेवटीं असंग कूटस्थच आत्मा आहे असें सांगितलें ॥९८॥
"कोऽयमात्मा " इत्यादिक श्रुतीमध्ये आत्म्याचा विचार केला आहे तेथे उभयात्मक भोक्ता धरुनच शेवटी कुटस्थाची सिद्धि केली आहे ॥९९॥
याप्रमाणें भोक्तेपणा मिथ्या असुन तें सत्य असें कां वाटतें याचें कारण हेंच कीं हा उभयात्मक भोक्ता कुटस्थाचे सत्यत्व आपणावर घेऊन आपला भोक्तेपण खराआहे असें मानुना त्याला तो सोडुं इच्छित नाहीं ॥२००॥