ज्याप्रमाणें हा घट असे म्हनुन घटाची प्रत्यक्षता दर्शविली जते त्याप्रमाणें " अयं अस्मि" यात ही " अयं " शब्दांचा अर्थ प्रत्यक्षतादर्शक आहे अशी जर कोणाला शंका असेल तरतोही अर्थ आम्हांस मान्यच आहे कारण आत्मचैतन्य स्वयंप्रकाश असल्यामुळें तें भासण्यास इतर साधनाची गरजच नाहीं ॥२१॥
"अय" या दर्शक सर्वनामाच्या प्रयोगावरुन आत्म्यास परीक्षत्व व प्रत्यक्षत्व तसेंच ज्ञान आणि अज्ञान ही युम्नें संभवतात असें दिसतें तर तुमचा आत्म नित्य अपरोक्ष अस्ज्न हें कसें ? या प्रश्नाचें उत्तर पुढील द्शमाच्या दृष्टांतावरुन ध्यानांत येईल ॥२२॥
कल्पना करा कीं, दहा असामीं मिळुन नदी उतरुन जात आहेत नदी उतरल्यानंतर आपण सर्व सुरक्षितपणे आलों कीं नाहीं, हे पाहण्याकरितां त्यांतील एक मनुष्य सर्वांस मोजुन पाहतो तो आपली गनना न करितां बाकीच्यास मात्र मोजल्यामुळे प्रत्यक्ष आपल्यापुढें नऊ असामीस पहात असुनही मी दहावा हेंजाणत नाही हे त्यांचे दशमाविषयींचें अज्ञान झालें ॥२३॥
दहावा आपण असुन दहावा नाहीं आणि दिसतही नाहीं असें मानतो हें अज्ञानकृत आवरण झालें ॥२४॥
मग भ्रमानें दहावा नदींत वाहुन गेलारें गेला असा शोक करुन मोठ्यानें रडुं लागतो यास्थितीस अज्ञानकृत विक्षेप म्हणतात ॥२५॥
इतक्यांत तेथें एक आप्त आला त्याणें रडण्याचें कारण पुसुन त्याला असें सांगितलें कीं, रडतोस कां दहावा जीवंत आहे हें त्याचें "स्वर्ग आहे" या श्रुतीवाक्या प्रमाणें, विश्वासनिय वाक्य ऐकुन जें त्याला दशमाविषयींचे ज्ञान झालें तें परीक्षज्ञान. ॥२६॥
मग त्याच आप्तानें त्याच्या देखत सर्वांत मोजुन "हे नऊ आणि तुं दहावा" असें म्हणुन डोक्यावर काठी मारून दाखविलें, तेव्हा मीच दशम असें जाणुन रडणें बंद करुन हर्षानें हंसतो हें अपरोक्षज्ञान ॥२७॥
या दशमाचे दृषाताप्रमाणें अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्षज्ञान, अपरोक्षज्ञान, शोकनिवृत्ति आणि तृप्ति या सात अवस्था चिदात्म्याच्याठायीं ताडुन पहाव्या ॥२८॥
त्या अशा कीं दृषाटांतांतील दशमाप्रमाणें हा चिदाभास संसारांत आसक्त होऊन गुरुची गांठ पडण्यापुर्वी आपलें स्वस्वरुपजो कुटस्थ त्याला मुळींच जणत नाहीं,. हें येथें अज्ञान ही पहिली अवस्था समजावी ॥२९॥
पुढें प्रसंगवशात कूटस्थाविषयीं प्रश्न निघाला असतां कूटस्थ मला दिसत नाहीं व मुळींच नाहीं असें तो म्हणतो, हें त्याचें अज्ञानकृत आवरण. आणि मी कृर्ता आहे मी भोक्ता आहे असा तो पुढें बहकत सुटतो हा विक्षेप ॥३०॥
पुढें "कृटस्थ आहे " असें आप्तवचन ऐकुन जें त्याला ज्ञान होतें तें परोक्षज्ञान आणि नंतर श्रवणमननादिकेंकरुन गुरुकृपा झाल्यावर "तो कूटस्थ मीं आहे" असें जें निश्चयात्मक ज्ञान होतें तें अपरोक्षज्ञान. ॥३१॥
हें ज्ञान झाल्यावर "मी कर्ता, मी भोक्ता" अशा भ्रांतीपासुन होणारा त्याचा शोक नाहींसा होतो ही शोकनिवृत्ति . आणि शोकनिवृत्तीनंतर " करावयाचें तें मीं केलें" व " मिळवावयाचें तें मीं मिळावेल" आशी धन्यता वाटुन तो तृप्त होतो. ही सातवी अवस्था ॥३२॥
येणेंप्रमाणें अज्ञान आवरण, विक्षेप परोक्षज्ञान अपरोक्षज्ञान, शोकनिवृत्ति आणि निरंकुशातृप्ति ॥३३॥
या सात अवस्था आत्म्याला आहेत असें समज नये. त्या केवळ चिदाभासालाच आहेस या सातांत बंधमोक्ष दोन्हींही येतात. त्यांपैकी पहिल्या तीन बंध करणार्या आणिबाकींच्या चार मोक्ष देणार्या आहेत ॥३४॥
पहिल्या तीन बंधकारक म्हणुन सांगितलें त्यांतील पहिली अवस्था जें अज्ञान त्याचें स्वरुप आतां स्पष्ट करुन दोखवुं आत्मात्वाचा विचार मनांत येण्यापुर्वी मनुष्याचा जो सहज व्यवहार असतो त्यालां कारणीं भुत मी जाणत नाही: अशी जी बुद्धि तेंच अज्ञान हें अज्ञान मनुष्याच्या आंगांत इतकें भिनुन गेलें आहे कीं आपल्यास कांहीं समजत नाहीं हे सुद्धां त्यांचे गावी नाहीं ॥३५॥
आतां आवरणाचें स्वरुप आणि कार्य सांगतों शास्त्रांत सांगिल्याप्रमाणे विचार न करितां केवळ स्वतःचेच तर्क लढवुन कूटस्थ नाहीं व तो दिसतही नाहीं असें विपरीत समजतो हाच आवरणाचा परिणाम ॥३६॥
आतां विक्षेपांचे स्वरुप आणि कार्य याचा विचार करुं स्थुल सुक्ष्म या देहद्वायानें युक्त जो चिदाभास तोच विक्षेपतोच सर्व बंधास हेतु आणि त्यापासुनच कर्तृत्वादिक संसारदुःख होतें ॥३७॥
आतां अज्ञान आणि आवरण या दोन अवस्था विक्षेपांच्या पूर्वीच्या आहेत आणि विक्षेप तर चिदाभासाचेंच स्वरुप असें तुम्हीं म्हणता तर पुर्वोक्त अवस्था चिदाभासाम आहेत ही गोष्ट कशी संभवेल अशी कोणी शंका घेईल ? तर त्यास तूर्त आम्ही इतकेंच सांगतो कीं असंग आत्म्यास त्या अवस्था लावण्यापेक्षा चिदाभासासच लावणें बरें ॥३८॥
कारण त्या दोन अवस्था असण्याचे वेळीं चिदाभासाच जरी अभास असला तथापि त्याचा संस्कार महणुन त्या वेळी असतोच म्हणुन त्या अवस्था त्याच्याच आहेत असें मानण्यानें कोणताच विरोध येत नाही. बीजाच्या वेळीं वृक्ष जरी नसला तरी बीज ही वृक्षाचीच अवस्था म्हणण्यास कोणची हरकत आहे? ॥३९॥
आतां असा एक प्रश्न निघण्या जोगा आहे कीं, केवळ अनुमानगम्य संस्कार कल्पुन या दोन अवस्था विक्षेपाला लावण्यापेक्षां त्या दोन्होंचे अधिष्ठान जें ब्रह्मा त्यालाच लावणें बरें नव्हें काय ? तर याजवर उत्तर असं कीं ब्रह्मा हें अधिष्ठान म्हनुन जर त्या दोन अवस्था लावाव्या तर त्या दृष्टीनें सातही अवस्था ब्रह्मालाच लागु होतील असा अति प्रसंग करण्यापेक्षां त्या चिदाभासालाच लावणें योग्य आहे ॥४०॥