तृप्तिदीपः - श्लोक ६१ ते ८०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


त्याप्रमाणें "सदेव" इत्यादिक श्रुतिवाक्यानें "ब्रह्मा आहे" असें परोक्षज्ञान झाल्यावर तत्त्वमस्यादि महावाक्याचा विचारपुर्वक अर्थ केला तें ब्रह्मा मी आहे. असा साक्षात्का होईल ॥६१॥

दृष्टांताप्रमाणें येथेंही महावाक्यापासुन झालेलें "मी ब्रह्मा असे जें ज्ञान त्याला आदि मध्ये अवसानी कोनताही व्याभिचार येत नाहीं म्हणुन महावाक्यापासुन अपरोक्ष ज्ञान होते हें सिद्ध ॥६२॥

याप्रमाणे प्रथमतः परोक्षज्ञान होऊन मग पुढें महावाक्याचा विचारपुर्वक अर्थ केल्यानें साक्षात्कार होतो. याचा अनुभव कोणाला आला असें कोनी विचारील तर त्याविषयीं श्रुतीतच सांगितलें आहे. कोणी एक भृगुनामक ऋशि होता. त्याणें 'यतो वा इमानि भुतानि जायंते " इत्यादिक बापानें सांगितलेलीं वाक्यें ऐकुन ब्रह्म सर्वजगाचें कारण आहे असें परोक्ष जाणून पुढें पंचकोशाविवेक केल्यानें ऐकुन ब्रह्मा सर्वजगाचे कारण आहे असें परोक्ष जानुन पुढे पंचकोशाविवेक केल्याने तें ब्रह्मा मी आहें " असा साक्षात्कार त्यास झाला ॥६३॥

जरी येथें "तुं ब्रह्मा आहेस" असा भृगुच्या बापानें त्याला उपदेश केला नाहीं तरी अन्नमयादि कोशाच्या विवेकेंकरुन विचार करण्यास योग्य असें स्थळ त्याणें दाखवुन दिलें ॥६४॥

अन्नमयादि कोशाचा पुनः पुनः विचार करुन शेवटच्या कोशीं आपण आनंदमय आहे असं समजुन तो आपल्याठायीं ब्रह्माच्या लक्षणाची योजना करिता झाला ॥६५॥

"सत्य ज्ञानमनंत" असें ब्रह्माचें लक्षण पुर्वी सांगुन कोशरुप गृहेंत असणारें ब्रह्मा त्याणें शिष्यांस दाखविलें ॥६६॥

त्याचप्रमाणें छांदोग्य श्रुतीत दुसरें एक उदारहण आहे. इंद्राला जेव्हा मोक्षाची इच्छा झाली तेव्हां,. "य आत्मा पहत" त्याश्रुतीनें ब्रह्मा परोक्षत्वेंकरुन जाणुन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरितां चारदां गुरुकडे तो गेला ॥६७॥

"आत्मा वा इदं" इत्यादि श्रुतीनें परीक्ष ब्रह्मा दाखवुन अध्यारोप आणि अपवाद या दोहोंचें योगानें "प्रज्ञान ब्रह्मा" या महावाक्याद्वारा प्रज्ञानरुप जो आत्मा तोच ब्रह्मा असें दाखविलें ॥६८॥

श्रुतीमध्ये जी महावाक्यें आहेत ती मात्र अपरोक्ष ज्ञानाला कारण आहेत. बाकी सर्व ब्रह्माचें लक्षण सांगणारी जी वाक्यें त्यांपासुन परोक्षज्ञान मात्र होतें ॥६९॥

महावाक्यापासुन ब्रह्माचें अपरोक्षज्ञान होतें हें सांगणें आमचें पदरचें नव्हें ही गोष्ट शंकराचार्यांनी वाक्यवृत्ति ग्रंथांत सांगितली आहे म्हणुन एतद्विषयीं संशय घेणे नको. ॥७०॥

तेथें आचार्यानीम त्वपदाचा असा अर्थ केला आहे कीं जो मी या ज्ञानाला आणि मी या शब्दाला विषय होऊण प्रकाशणारा असा अंतःकरणाचा जो साक्षी बोधरुप आत्मा त्यालाच त्वं असें म्हणतात ॥७१॥

माया आहे उपाधि ज्याला जो जगाची योनि म्हणजे कारण सर्वज्ञानादि कारणेकरुनान जो युक्त आणि जो परीक्षत्व धर्मयुक्त आणि सत्यज्ञानानंतरुप जो कोणी आहे त्यास तत असें म्हणतात ॥७२॥

एकाच वस्तुत परोक्षता आणी अपरोक्षता तसेंच सद्दितीयता आणि पुर्णता हीं असणें हें विरुद्ध आहे, याकरितां त्या विरोधांचे परिहारार्थ लक्षणावृत्ति म्हणोन जी वाक्यार्थ करण्याची रीत आहे ती येथे घेतली पाहिजे ॥७३॥

तत्त्वमस्यादि वाक्याचेंठायी जी लक्षणावृत्ति ध्यावयाची ती भागत्यागलक्षणा घेतली पाहिजे. दुसरी नाहीं. भागत्यालक्षणी म्हणजे काय, ते येथें सांगितलें पाहिजे लक्षणेचे प्रकाश तीन आहेत जहत अजहत आणी जहत जहत त्यापैकी तिसरी येथें घेतली पाहिजे. त्यास उदाहरण सोऽयं देवदत्त याचा अर्थ काल पुण्यांत धोतर पांघरुन आलेला जो देवदत्त भट तोच हा शालजोडी पांघरलेला आज येथें आला आहे ॥७४॥

"गाय आण" या वाक्यांत लक्षणावृत्तीवांचुन संबंधानें स्पष्टार्थ होतो. यांस संसर्गार्थ म्हणतात आणि निलोप्तलं या वाक्यांतही निळें कामळ असा अर्थ स्पष्ट होतो यास विशिष्टार्थ म्हणतात तशी महावाक्यांची गोष्ट नाहीं. त्याचा अर्थ करितांना ब्रह्मांचें अखंडैकरसत्व सिद्ध झालें पाहिजे. असाच अर्थ सर्व विद्वानांस मान्य आहे. ॥७५॥

बुद्धयादिकांचा साक्षीं जो प्रत्यग्बोध अहंबुद्धिस विपय भासतो तो अद्वयानंदरुप आहे. आणि जो अद्वयानंदरुप परमात्मा तो प्रत्यग्वोधरुप साक्षी आहे. ॥७६॥

असें एकमेकांचें ऐक्य जेव्हा सिद्ध होईल तेव्हा स्वपंदवाच्य जीव ब्रह्मा नव्हेंसे जें वाटतें तेंवाटणें नाहीसें होतें ॥७७॥

आनी ततपदाची परोक्षता ही तत्काळ नाहींशी होते. असें झालें असतां पुर्णानंद स्वरुपी प्रत्यग्बोध साक्षीचें केवळ राहतो ॥७८॥

असें असुन महावाक्यापासुन अपरोक्ष ज्ञानच होत नाहीं असें जे म्हणतात त्यांचे शास्त्रसिद्धांतज्ञान कोठवर वर्णावें ॥७९॥

तूर्त शास्त्र सिद्धांत असोंदें परंतु युक्तीनें जर पाहिलें तर कोणत्याही वाक्यापासुन परीक्षच ज्ञान होतें असें ठरतें कारण स्वर्गप्रतिपादक सर्व वाक्यें परोक्षनाच देणारी आहेत. असें कोणी म्हणेल तर "तुं दशम आहेस ' या वाक्यांत या नियामास व्याभिचार येतो. कारणया वाक्यानें अपरोक्षज्ञानही होतें ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP