तृप्तिदीप - श्लोक १ ते २०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति पुरुषः ॥

किंमिच्छन‌कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत ॥१॥

या श्रुतीचा अर्थ- हा आत्मा मी आहें असे आत्मज्ञान जीवास होईल तर इच्छेला विषय आणि इच्छेचें प्रयोजन हीं दोन्हींही न राहिल्यामुले तो शरीरास झालेलीं दुःखें आत्म्यास कधींहीं लावणार नाहीं. ॥१॥

या प्रकारनात वरील श्रुतीच्या अभिप्रयाविषयी आम्हीं चांगल्या रीतीनें विचार करणार. त्यावरुन जीवन्मुक्ताची जी तृप्ति श्रुतिमध्यें सांगितली आहे, तिचे स्वरुप स्पष्टपणें ध्यानांत येईल ॥२॥

आतां वरील श्रुतितील पुरुष या शब्दाचा अर्थ करुं परंतु त्यास उपोद्वातादाखल ही सृष्टी कशी झाली हें पुर्वी थोडक्यांत सांगितलें पाहिजे. मायेंनें प्रतिबिंबकरुन जीव आणि ईश या दोघांस प्रथम उप्तन्नकेलें आणी त्या दोघांनी बाकी सर्व सृष्टी कल्पिली आहे यांत माया शब्दाचा अर्थ चिदांनदमयब्रह्माप्रतिबिबेंकरुन युक्त जी त्रिगुणात्मक जगास उपादानभुत मुल प्रकृति ती असेंअ समजावें ॥३॥

जिच्या प्रारंभी ईक्षण आणी अंतीं प्रवेश अशी जी सृष्टी ती ईश्वरानें कल्पिली आणि ज्याच्या आरंभीं जागृति आणि अंति मोक्ष असा जो संसार तो जीवानें कल्पिलेला आहे ॥४॥

भ्रमाला अधिष्ठानभुत असंगचैतन्यरुपी जो कुटस्थ आत्मा तो अन्योन्याध्यासामुळे बुद्धिच्याठायीं प्रतिबिंबित झाला तोंच जीव असें मागील प्रकरणी सांगितलें आहे. तोच या श्रुतींतील पुरुष समजावा ॥५॥

मोक्ष स्वर्गादिकांच्या साधनाला नुसता प्रतिबिंबरुप जीवच अधिकारी होत नाहीं. म्हणुन अधिष्ठान जो कूटस्थ त्यासहिंतच तो घेतला पाहिजे कारण जीव हा कुटस्थावर केवळ भ्रांतिकल्पित आहे आणि भ्रांतीची अधिष्ठानावांचुन सिद्धाताच होत नाहीं ॥६॥

जेव्हा भ्रम होतो तेव्हा एक अधिष्ठानाचा अंश आणि एक भ्रमाचा अंश असा दोहींचा संयोग तेथें असतो जसें शिंपीवर रुपे भासतें यांत शिंपीचा अंश आणि आरोपित रुप्याचा अंश हे दोन्हीं असतात त्याप्रमाणेंच जीवाची स्थिति आहे जेव्हा अधिष्ठानकूटस्थासहित भ्रमांश जो चिदाभास यांचें अवलंबन जीव करितो; म्हणजे तेंच मी असें म्हणतो, तेव्हा मी संसारी असा अभिमान जीवास होतो ॥७॥

आणी जेव्हा भ्रमांश जो चिदाभास त्याचा तिरस्कार करुन म्हणजे मिथ्यात्वबुद्धिनें अनादर करुन केवळ अधिष्ठानालाच अवलंबुन असतो तेव्हा मी चैतन्यरुपी असंगात्मा आहे असेंत्यास समजतें ॥८॥

असंगाचेठायीं अहंकार संभवत नाहीं, असें असुन "मी असंग आहें" असें तो कसें समजतो ? असें जर कोणी म्हणेल तर अहंकाराचे तीन प्रकार आहेत. त्यापैकीं एक मुख्य आहे आणि दोन अमुख्य म्हणजे लाक्षणिक आहेत ॥९॥

कुटस्थ आणि चिदामास या दोहोंचें ऐक्य करुन, म्हणजे भेद न समजत, अन्योन्याघ्यासरुपानें अज्ञानी लोक ज्या अहं शब्दांचा प्रयोग करितात तो अहं शब्द मुख्य असे समजावें ॥१०॥

आणि कुटस्थ व चिदाभास या दोहोंचा भेद ओळखुन तत्ववेत्ता लौकीक व वैदीक व्यवहारात अनुक्रमानें मी मी असें म्हणतो तेव्हा त्या प्रत्येक मी शब्दांचा अर्थ अमुख्य म्हणजे लाक्षणिक समजावा ॥११॥

लौकीक व्यवहारांत "मी जातां, "मी करितों " असें जेव्हा हा तत्ववेत्ता म्हणतो तेव्हा कुटस्थापासुन जो चिदामास त्याला उद्देशुन म्हणतो ॥१२॥

तसेच शास्त्रीयदृष्टींनें " मी असंग आहे " मी चिद्रप आहें" असें जेव्हा तो बोलतो तेव्हा फक्त कुटस्थालाच उद्देशुन तो बोलतो ॥१३॥

येथें असा एक आक्षेप निवण्याजोगा आहे की, " मी असंग आहे " असें जें ज्ञान झालेजं तें कुटस्थास कीं चिंदाभासास ? कुटस्थास म्हणावेंतर तो असंग चिद्रुप असल्यामुळे जाणते नेणतेपणा त्यास संभवत नाही; म्हणुन तें विदाभासालाच झाले पाहिजे, बरे तसें जर म्हणावें तर "मी कुटस्थ असें चिदाभासास तरी कसें होईल ? ॥१४॥

तर यावर आमचें उत्तर असेंआहे कीं चिदाभास हा कुटस्थाह्हुन निराळी एक वस्तु आहे. असें मुळींच नाहीं तो कुटस्थाचें प्रतिबिंब असल्यामुळें कुटस्थाचाच स्वभाव त्याला आला आहे आतां आभास हा मिथ्याचा आहे. तेव्हा बाकी राहिलेला कुटस्थ हा मात्र खरा म्हणुन वरील शंका संभवत नाहीं. ॥१५॥

तुमचा चिदाभास खोटा झाल्यानंतर "कुटस्थमी आहें" असें जें त्याचें ज्ञान तेंही खोटेंच असें जर कोणी म्हणेल तर आम्हीं नाहीं कुठें म्हणतों ? रज्जुमर्प जर खोटा आहे तर त्यांचे सर्पटणेंही खोटेंच म्हटलें पाहिजें ॥१६॥

परंतु अशाखोट्या ज्ञनानें संसारनिवृत्ति होत नाहीं असें मात्र समजु नये. कारण जसें ज्ञान मिथ्या आहे तसा संसारही मिथ्याच आहे. जसा यक्ष तसा बली अशी जी लोकांत म्हण आहे तिचा भावार्थ असा कीं पोर रडु लागलें म्हणजे बांगुलवाचें स्वाधीन तुला करितों असेंत्यास भय घालतात तेथें बागुलबावा आणि त्यांचे स्वाधीन करणें या दोन्हीं गोष्टी जरी खोट्याझाल्या तरी त्यापासुन मुलाचें रडणे बंद होतें ॥१७॥

याकरितां चिदाभासांचे स्वरुप कुटस्थच असल्यामुळे पुरुष शब्दवाच्य कुटस्थासहित जो चिदामास तो त्या कुटस्थास आपणापासुन निराळा करुन मी कुटस्थ आहें असे समजण्यास तो योग्य होतो. अशा अभिप्रायानें श्रुतीनें " आस्मि" शब्दाचा उपयोग केला ॥१८॥

याप्रमाणें श्रुतीं तील "पुरुष" आणि "आस्मि" या दोन पदांचा अभिप्राय सांगितला आतां "अयं " शब्दांचा अर्थ सांगतो जमें साधारण लोकांत हा देह मी आहें " असें देहरुप आत्म्याविषयीं निःसंशय ज्ञान असतें तसेंच ज्ञान आत्म्याविषयीहीं असावें असा निर्णय करण्याकरिता अंय या सर्व नामाचा प्रयोग श्रृतीने केला ॥१९॥

वर ज्या प्रकारचें ज्ञान सांगितलें तेंच मुक्तिला साधन आहे एतद्विपयीं आचार्याचें पूढील वाक्य प्रमाण आहे ( देहात्मज्ञानवज्ज्ञानं ) याचा अर्थ असा कीं , "मी मनुष्य" असें साधारण लोकांस जसें दृढ ज्ञान आहे तसें प्रत्यगात्म्याविषयीं " मी ब्रह्मा आहें " असे ज्ञान ज्या पुरुषास झालें त्याला मोक्ष नको म्हटला तरी सुटत नाहीं ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP