तृप्तिदीप - श्लोक १२१ ते १४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


एखाद्या वेळीं समुद्र प्राशन करतां येईल मेरुपर्वत उपडुन टाकितां येईल. व एकाद्यावेळीं अग्नि सुद्धा सेवन करतां येईल पणचित्तनिग्रह असाध्य आहे असें वशिष्ठ म्हणतात ॥२१॥

परंतु कथनादिकांचा जो अभ्यास सांगितला यामध्यें शृखलाबद्ध देहाप्रमाणें अटकाव कोणचाच नाहीं. इतकेंच नव्हें तर नानातर्‍हेंच्या पुराणांतील मनोरंजनक कथा ऐकुन मनाला उलटी मौज वाटते. ॥२२॥

सर्व इतिहासाचेंतत्पर्य आत्मा सत्य आणि जग मिथ्या, या दोन गोष्टीवर ठेवुन कथनादिकांचा अभ्यास केल्यानें इतिहासादिकांच्या योगानें निदेध्यासाला विक्षेप येईल अशी शंका घेण्याचें कारण नाहीं ॥२३॥

परंतु कृषिवाणीज्यसेवा इत्यादिक ज्या प्रपंचांतील क्रिया व अलंकारशास्त्राचा व तर्कशास्त्राचा अभ्यास करण्याचें योगानें मात्र बुद्धीस विक्षेप होतो कारण तेथें तत्वाची विस्मृति होण्याचा संभव आहे. ॥२४॥

एवढ्यावरुन म्हणजे भोजनादिकांचा देखील त्याग करावा, असें कांहीं नहीं कारण आम्हांला भोजन करितां देखील आत्म्याचे अनुसंधान ठेवतां येत. कदाचित तेवढ्या काळा पुरता जरी विक्षेप झाला. तरी पुनः तत्त्वस्मृत्तीचा संभव असल्यामुळें तेथें अत्यंत विक्षेपाची भिति मुळींच नाहीं ॥२५॥

विपरीतभावनेपेक्षां सिद्धांताचें विस्मरण हजार वांट्यानें बरें कारण त्यापासुन अनर्थ होण्याची भीति नाहीं. अनर्थ करणारी कायती विपरीतभावना ती होण्यास तेथें मुळींच आवकाश नाहीं. कारण मुमुक्षुला तत्वाचें स्मरण लागलेंच होतें ॥२६॥

पण काव्य तर्काचा अभ्यास करणार्‍या लोकांना तत्त्व आठवण्यास अवकाशच मिळत नाहीं. इतकेच नव्हें तर तत्त्वभ्यासाशीं त्यांचा विरोध असल्यामुळे त्याजकडुन त्याची उलटी हायगय होते ॥२७॥

अध्यात्म विषयावाचुन दुसर्‍या कोणत्याही शब्दांचा उच्चार करुं नये असें श्रुतींत सांगितलें आहे दुसर्‍याविषयीं संभाषण केल्यानें वाणीन शीण मात्र होतो असेंही एका ठिकाणीं सांगितलें आहे ॥२८॥

भोजनादिकांच्या त्यागाविषयीं इतका दुराग्रह तरी का असावा. आहारादि टाकल्यानें मनुष्य वांचणार नाही परंतु काव्य तर्काची गोष्ट तशी नाही त्यांवाचुन आमचें मुळींच आडत नाहीं ॥२९॥

एथें अशी कोणी शंका घेईल की पुराणांतरी जनकादिक तत्त्वज्ञांच्या ज्या कथा आम्ही ऐकितों, त्याजवरुन ते राज्य करीत होते असें दिसतें मग त्यांच्या अभ्यासांत विघ्र कमें आलें नाहीं ? तर याजवर आमचें असें उत्तर आहे कीं, आम्हीं जो आभ्यास वर सांगितला तो केवळ ज्ञानदार्ढ्याकारितां जनकादिकांचें ज्ञान घट मट्ट होतें त्याप्रमाणें ज्यांस ज्ञान झालें असेल त्यांनीं हवा असल्यास शास्त्राभ्यास करावा कृषि कर्म करावें पाहिजें तें करावें ॥१३०॥

ज्ञानदार्ढ्य होऊनहीं ( हा संसार खोटा आहे असं समजुनहीं ) ज्ञानाची प्रवृत्ति संसाराकडे जी होते ती केवळ प्रारब्ध कर्माच्या क्षयास्तव होते. आपापल्या कर्मास अनुसरुन ते निमुटपणे संसार करितात तेणेंकरुन त्यांस क्लेश मुळींच होत नाहीं ॥३१॥

संसारांच्या प्रवृत्तीस जर प्रारब्धकर्म कारण आहे तर त्याच करणानें तत्त्वज्ञान हातुन अनाचाराची कृत्येंची घडतील अशी कोणी शंका घेईल तर आम्हीं नाहीं कुठें म्हणतों ? घडतील तर घडोत बापडीं . प्रारब्धकर्म टाळण्याचें ब्रह्मादेवाचेहीं हातीं नाहीं मग आमची तुमची कथा काय ? ॥३२॥

ज्ञानी आणि अज्ञानी हे दोघे ही प्रारब्धकर्म भोगण्याविषयीं सारखेंच आहेत. ज्ञान्यास आंतुन धैर्य असल्यामुळे क्लेश होत नाही. आणि मुढास तें नसल्यामुळें तो होतो. इतकाच काय तो भेद ॥३३॥

यास दृष्टांत एका मार्गानें दोन प्रवासी जात असतां दोघाचाही श्रम तितकाच परंतु मार्गाची माहिती असणाराम जाईन असें धैर्य असल्यामुळे तो लवकर लवकर चालतो. व त्यास माहिती नाही तो आतां कसें करु ? म्हणोन रडत बसतो ॥३४॥

ज्याला आत्म्याचा साक्षात्कार झाला आहे आणि त्याच्या मनांतील विपर्यय नाहींसा झाला आहे त्याच्या ठायीं इच्छा करणाराही राहिला नाहीं आणि इच्छेंला विषयही नाही. मग शरीरास संताप झाल्यानें याला जो संताप व्हावयाचा तो कशाने होणार ? ॥३५॥

जगाचा खोटेपणा बुद्धिच्याठायीं ठसला म्हणजे काम्य आणि कामुक हे दोघेही नाहींसे झाले मग आर्थातच तेल नसलेल्या दिव्याप्रमाणें संतापही नाहींसा होतो ॥३६॥

गंधर्वपत्तन म्हनुन जो चमत्कार दिसतो तें सर्व गरुड असें जाणून पाहणारा त्याचा अभिलाषकरीत नाही. केवळ त्यांचा अनादर करुन हंसत बसतो ॥३७॥

त्याप्रमाणें विचारी पुरुष केवळ डोळ्यांस मात्र रमणीय दिसनारे जे स्त्रीधनादिक विषय, ते खोटे असें मानुन दोपबुद्धीनें त्यांचा त्याग करितो ॥३८॥

वर दोषदृष्टि म्हणुन जो म्हटलो ती अशी. प्रथम द्रव्यामध्यें कोणकोणचे दोष आहेत ते पहा. द्रव्य मिलवण्यांत क्लेश रक्षण करण्यात क्लेश त्याचा नाश झाला तरी क्लेश आणीखर्च झाला तरी क्लेशच तस्मात हें दुःख देणारें जें द्रव्य तयस धिःकार असो ॥३९॥

हे द्रव्याचे सोहळे झाले आतां स्त्री पहा, कशी ती. स्त्री म्हटली एक हाड, मांस स्त्रायु, ग्रंथी, इत्यादी क पदार्थाची बनलेली पुतळीच आहे. तिच्या प्राणयंत्रानें चंचल दिसणार्‍या शरीरांत काय सौदर्यं असेल तें असों ॥१४०॥

N/A


References : N/A
Last Updated : March 18, 2010