ईश्वर आंत बाहेर सर्वव व्यापला आहे असें म्हणण्यास एतस्य वा अक्षरस्य व अंतःप्रविष्ट शास्ता" अशा दोन श्रुति प्रमाण होत ॥१८१॥
ह्याच्यापासुन जगाची उप्तत्ति आणि नाश होतात म्हणुन जगद्योनि ( जगाचें कारण ) असें त्यास म्हणतात. उप्तत्ती आणि प्रलय याचा अर्थ दिसणें आणि गुप्त होणे असा आहे. ॥१८२॥
ज्याप्रमाणें घडी घातलेला पट स्वतःच्य पसरण्यानें आपल्याठायीं असलेली चित्रेंप्रकट करितो, तद्वत ईश्वरही आपल्याठायीं लीन झालेलें जग प्राण्याच्या कर्मभोगास्तव प्रकट करितो. ॥१८३॥
आणि ज्याप्रमाणें तो पट गुंडाळण्याच्या योगानें आपल्याठीयींची चित्रें आपल्यामध्येंच झांकितो त्याप्रमाणें ईश्वरही आपल्याठायींचे जग प्राण्यांच्या कर्मक्षयामुळे आपल्याठायींच लीन करितो ॥१८४॥
ज्याप्रमाणें रात्रं दिवस निद्रा जागृती उघडणे झांकणें मनाचा स्तब्धपणा आणि कल्पना हीं द्वद्वें आहेतं, त्याप्रमाणेंच सृष्टीं आणी लय ही समाजावी ॥१८५॥
आविर्भाव तिरोभाव करण्याची शक्ति इश्वराचेठायें आहे एवढ्या कारणाने आरंभवादाची व परिणामवादाची शंका येण्याचा संभव आहे. ह्या दोनही शंकाचें निवारण विवर्तवादाचा स्वीकार केल्याने होतें ॥१८६॥
एकच परमेश्वर चेतनाचेतनरुप द्विविध जगाला कारण कसाझाला असें पुसेल तर जडांशानें तो अचेतनाचें रुप द्विविध जगाला कारण कसा झाला असें कोनी पुसेल तर जडांशानें तो अनेतनाचें कारण आणि चिदाभासाच्या अंशानंचितनाचें कारण आहे हेंचत्यांचें उत्तर ॥१८७॥
तमःप्रधान जो परमात्मा तो भावना ज्ञान व कर्म यांहीं करुन क्षेत्राचें कारण आहे; आणि चित्प्रधान जो परमात्मा तो चिदाभासाचें कारण आहे ॥१८८॥
या रीतीनें वार्तिककारांनी जड चेतनाचें कारण परमात्म्याकडेसन लाविलें आहे. म्हणुन ईश्वर कांहीं जगत्कारण नव्हे असें जर म्हणतात तर ॥१८९॥
येथेही जीव कुटस्थाप्रमाणें ईश्वर आणि ब्रह्मा यांचा अन्योन्यास्वरुपी सिद्ध करुन सुरेश्वराचार्य बोलले आहेत ते असें; ॥१९०॥
ब्रह्मा हें सत्यज्ञानास्वरुपी असुन अनंत आहे. त्यापासुन आकाशादि देहापर्यंत भाव उप्तन्न झाले अशी श्रुति आहे ॥१९१॥
केवळ बाह्म दृष्टीनें ब्रह्मा हें जगाचें कारण नसुन तें आहे असें दिसतें आणि जगाचें जें कारण मायाधीन चिदाभास तो खोटा असुन खरा दिसतो. यालाच अन्योन्याध्यास म्हणतात ॥१९२॥
ज्याप्रमाणे खळ लाविलेल्या पटांत खळ कोणती आणि पट कोणता हें समजत नाही, त्याप्रमाणें भ्रांतीमुळें वर सांगितलेल्या अन्योन्याध्यासरुप हेतुमुळें ब्रह्मा आणि ईशयांचा भेद समजत नाहीं ॥१९३॥
मेघाकाश कोनतें आणि महाकाश कोणतें हें जसें अज्ञानी लोकांस समजणें कठिण, त्याप्रमाणें वरवर पहाण्यारांना ब्रह्मा आणि ईश हे दोन्हींएकच दिसतात ॥१९४॥
उपक्रमादि श्रुतीनें तात्पर्य काढलें असतां ब्रह्मा असंग आहे. आणी सृष्टिकर्ता ईश्वर आहे असें समजलें ॥१९५॥
"सत्य ज्ञानमनंतें " या श्रुतीने ( उपक्रम ) करुन " यतो वाचो निवर्तते" या श्रुतीनें उपसंहार ( समाप्ति ) करुन ब्रह्माच्या असंगात्वाविषयें शास्त्रांत निर्णय केला आहे. ॥१९६॥
मायावी ईश्वर जग उप्तन्न करितो आणि त्या जगांत जीव मायेनें बद्ध झाला आहे अशी दुसरी एक श्रुति आहे त्यावरुन ईश्वर जगाचा उप्तन्नार्ता, असें होतें ॥१९७॥
आनंदमय जो ईश तो बहुस्या असा संकल्प करुन निद्रा जशी स्वप्न होते त्याप्रमाणें हिरण्यगर्भ झाला ॥१९८॥
ही सृष्टी दोन प्रकारची ध्यावी. एक क्रमसृष्टी आणि दुसरी युगपत्सृष्टी कारण, त्याला दोन प्रकारच्या श्रुतीही प्रमाण आहेत आणि ज्या स्वप्नाचा आम्हीं दृष्टांत दिला तें स्वप्नही दोअ प्रकारचें अनुभवास येतें ॥१९९॥
सुक्ष्म देहाख्य जो सुत्रात्मा तो सर्व जीवांचे समष्टिरुप आहे कारण आम्ही जसे एकेका देहाविषयीं अभिमानी आहोंत त्याप्रमाणे तो सर्व जगाचा अभिमानी आहे आणि क्रियाज्ञान आदिकरुनशक्ति त्याच्यामध्यें आहे ॥२००॥