चित्रदीप - श्लोक १६१ ते १८०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


अखिल प्राण्यांच्या बुद्धिवासना त्याच्या ठायीं एकत्र झालेल्या आहेत. आणि त्या सर्व वासनांला हें सर्व जग विषय आहे म्हणुन त्याला सर्वज्ञ असें म्हटलें ॥१६१॥

वासना परीक्ष आहेत म्हनुन सर्वज्ञत्व अनुभवास येत नाही खरे; तथापि तेंच सर्वांच्या बुद्धीत असल्यामुळे वासनांतही त्यांचे अनुमान होतें ॥१६२॥

विज्ञानामयादिक कोशामध्यें आणि पृथ्वादिक जड पदार्थामध्ये आंत राहुन नियमन करितो म्हनुन तो अंतर्यामी ॥१६३॥

बुद्धिच्या ठायीं राहुन बुद्धीला अदृश्य बुद्धि हेंच त्यांचे शरीर, असेंअसुन तो बुद्दीचे नियमन करितो असा श्रुतीचा डांगोरा आहे ॥१६४॥

ज्याप्रमाणें पटामध्यें तंतु उपादानरुपानें असतो, त्याप्रमाणें इश्वरही सर्व सृष्टीचें उपादाना असल्यामुळे तोसर्वत्र व्यापक आहे ॥१६५॥

पटाच्या आंत तंतु तंतुच्या आंत अंशु यारीतीने जेथे आंतपणाची सीमा संपुन बुद्धि विश्रान्ति घेते तेथें ईश्वराचे अनुमान करावयाचे ॥१६६॥

एजीच्ता आंत दुसरी दुसरीच्या आंत तिसरी याप्रमाणे कक्षा किती जरी दृष्टीस पडल्या तरी अंतर्यामी परमेश्वर दिसत नाही. म्हणुन त्याचा निर्णय युक्ति आणि श्रुति या दोहोंच्य साहाय्यानेंच केला पाहिजे. ॥१६७॥

तंतु पतरुपानें असतो म्हनुन पत हा तंतुचें बनलेलें असें एक शरीरच आहे. त्याप्रमाणें सर्वरुपाने ईश्वर आले म्हनुन सर्व जगच यांचे शरीर आहे ॥१६८॥

तंतुचा संकोच विस्तर आणि चलन हे जसजसे होतील तसतसा पटही संकोचादिक दशा पावतो. पटाच्याठायीं स्वातंत्र्य मुळींच नाहीं ॥१६९॥

त्याप्रमाणे हा अंतर्यामी जेथें जेथें ज्या ज्या वासनानें जसा विकार पावतो त्या त्या प्रमाणे सर्वगोष्टी घडतात यांत संशय नाही ॥१७०॥

भगवंतांनी अर्जुनास असें सांगितलें आहे की सर्व भुतांच्या हृदयांमध्यें ईश्वर वासकरितो. आणि जणु यंवाववरच बसविलेली भुतें आपल्या मायारुप किल्लेनें फिरवीन आहें ॥१७१॥

येथें "सर्व भुतानां" याचा अर्थ हृदयांत असलेले विज्ञानमय जे कोश तेच एथे भुतें समजावीं. त्यांचे उपादान कारण जो ईश तोच विकारातें पावतो ॥१७२॥

एथें देह, मन, बुद्धि आदिक जे पंजर तेंच यंत्र होय. त्याजवरील जो अभिमान हाच आरोह ( चढणे ) आणि विधिनिषेधात्मककर्माविषयीं जी प्रकृति तेंच भ्रमण होय. ॥१७३॥

आतां "भ्रामयन" ही प्रयोजक क्रिया व माया या दोन शब्दांचा अर्थ सांगतो. त्या कर्माची प्रवृत्ति विज्ञानमयरुपानें असल्यामुळे ईश आपल्या शक्तिच्या योगानें जो विकार करिती त्यालाच मायेंचे योगानें फिरविणें असे म्हणतात ॥१७४॥

श्रुतींत "अन्तर्यामयति " असे जें वचन आहे त्याचाही अर्थ हाच आहे. हाच न्यायाबुद्धिने ष्टाथि व्यादिकांना लावाला ॥१७५॥

मी धर्म जाणतों म्हणुन माझी धर्माकडे प्रवृत्ति आहे असें नाहीं व अधर्म जाणतों म्हणुन अधर्मापासुन माझी निवृत्ती आहे असेंही नाहीं तर हृदयांत बसलेला कोन देव मजकडुन जसे करवितो तसें मी करीत आहे. असें पुराणांत वचन आहे ॥१७६॥

तर मग मनूष्य प्रयत्न व्यर्थ अशी शंका कोणी घेईल तरत्यांचे समाधान इतकें कीं, ईश्वर हा प्रयत्नरुपानेंच असतो ॥१७७॥

या प्रमाणें मानल्यास "अंतर्यमयति" या वाक्यानें जो प्रेरणा सांगितली तो व्यर्थ असें मात्र म्हनुं नयें कारण तशा प्रकारचें ईश्वराचें ज्ञानही आम्हांस असंगत्वज्ञान होण्यास पुरे आहे ॥१७८॥

अशा आत्मज्ञानानें मुक्ति मिळते असें श्रुतिस्मृतीस सांगितलें आहे श्रुति व स्मृति या माझ्याच आज्ञा असें भगवंतांनी प्रत्यक्ष म्हटलें आहे म्हणुन तें अप्रमाणत म्हणतां येत नाहीं ॥१७९॥

भीतीला हेतु आज्ञा आहे एतद्विशयी "भीषास्मात " ही श्रुति प्रमाण आहे. परमेश्वर अंतर्यामी असल्यमुळे तो सर्व जगाहुन निराळा आहे ॥१८०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP