चित्रदीप - श्लोक २१ ते ४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


हे जे आकाशाचे चार प्रकार सांगितले त्यापैंई पाहिले तीन तर स्पष्ट समजण्याजोगे आहेत परंतु चवथें जें अभ्राकाश तें कसें समजावें ? कारण जेथें मुळी पाण्याचेच ज्ञान होण्याची पंचाईत तेथें त्यांतील प्रतिबिंब कोठुन समजणार ? असें कोनी म्हणेल तर त्याविषयींची समजुत अशी मेघ ही केवळ वाफ असल्यामुळे त्याचे घटकावयव उदकतपारच आहीत उदक म्हटले म्हणजें यांत प्रतिबिंब पडलेंच पाहिजें या नियमावरुन पुर्वोक्त जें मेघ प्रतिबिंबत आकाश ज्यास आम्हीं अभ्राकाश असें नाव दिलें तें जरीं स्पष्ट दिसलें नाहीं तरी तें तेथें आहे असें अनुमान होतें ॥२१॥

याप्रमाणें दृष्टांतभुत आकाशाचें चार प्रकार सांगितले. तसेच आतां चैतन्यचेही चार प्रकार स्पष्ट करुन सांगतो.पंचीकृत स्थुल आणि अपंचीकृत सुक्ष्म अशा दोन शरीरांना आधारभुत असुन आतप्रोत आंत बाहेर व्यापुन असणारा जो आत्मा त्यास कुटस्थ असे म्हणतात यास कटस्थ म्हनण्याचें कारण कुट म्हणजे पर्वतांचे शिखर तेंजसें वादळांदिकांच्या झपाट्याखाली कांहीं विकार नपावतां जशांचें तसेंच रहातें तसा आत्माहीं निर्विकार असतो ॥२२॥

कुटस्थाचेठायीं कल्पित अशी जी बुद्धि तींत पडलेलें जें चैतन्याचें प्रतिबिंब तोच जीवहा प्राणधारण करतो म्हणुन याला जीव हें नांव दिलें या जीवालाच संसार आहे कुटस्थाला नाहीं ॥२३॥

वरील दृष्टांतात जें जलाकाश सांगितले त्यानें जसे खरें घटाकाश झांजुन टाकलें त्याप्रमाणें येथेही जीवांनें कुटस्थाला अगदे झाकुन टाकल्यामुळे खरा कुटस्थ प्रत्ययास येत नाही हें जें जीवाचें नसुन भासणें आणि कुटस्थाचें असुन न दिसणें यांसच भाष्यकारादिक अन्योन्याध्याम असें म्हनतात ॥२४॥

ह्मा जीवकुटस्थामधील भेद जीवास मुळींच समजत नाही. या अविवेक आजकालचा नव्हें तर अनादि आहे याला मुलविद्या म्हणतात ॥२५॥

या अविद्येची रुपें दोअ एक विक्षेप आणि दुसरें आवृति ( आवरण ) कुटस्थ भासत नाही. व मुळीच तो नाहीं ह्मा व्यवहारास जें हेतुतेंच आवरण समजावें ॥२६॥

अविद्या व तिजपासुण झालेलें आवरण या दोहींचाहीं अनुभव लोकांत आहे. तो कसा म्हणाल तर त्यास उदाहरण एका अज्ञानी मनूष्यांसएक विद्वानानें विचारलें कींकुटस्थ तुं जाणतोस काय ? याजवर तो असे उत्तम देईल की, " मला कुटस्थ ठाऊक नाही" हा त्याचा अविद्यानुभव झाला व जेव्हा तो असें उत्तम देतो कीं कुटस्थ मला दिसत नाही. व तो नाहीं" हा त्या आवरणानुभव झाला ॥२७॥

आत्मा स्वप्रकाश असुन त्याचेठायीं अविद्या कशी आली ? कारण प्रकाश आणि अंधकार यांचा एकव वास कसा संभवेल ? बरें अविद्या नाहीं म्हटलें तर मग तिणें केलेलें आवरण तरी कोठुन येणार ? तें नाहीं तर विक्षेपहीं नाही तेव्हा अर्थातच ज्ञान व्यर्थ झालें व त्यामुळे तत्व्प्रतिपादक सर्व शास्त्राही निष्फळ असे जे प्रतिपक्ष्यच नानातर्‍हेचे तके ते सर्व एका स्वानुभवानें नाहींसे होतात ॥२८॥

आतां अनुबह्वावरही आमुचा विश्वास नाहीं असें कोनी म्हणेल तर मग तर्काला आधारच राहिला नाही. तार्किक म्हनाविणारास अनुभवांवाचुन तत्त्वनिश्चय तरी कसा व्हावा ? ॥२९॥

तर्कावाचुन समजुन पडत नाहीं असे जर कोणी म्हणत असेल, तर अवश्य तर्काचें साहाय्य घ्यावें; परंतु जो तर्क करणें तो अनुभवास अनुसरुच करावा. व्यर्थ कुतर्क कधीही करु नये. ॥३०॥

आतां येथें तो अनुभव कोणता म्हणाल तर अविद्या आणि आवरण याविषयींचा वर सांगितलाच आहे; म्हणुन कुटस्थ आणि अविद्या यांत विरोध नाही. असें म्हणण्यास कोणती हरकत आहे. ? ॥३१॥

कारण तसाजर विरोध असता, तर या आवरनाचा अनुभव कोनाला आला असता ? एवढ्यावरुन या अविद्येस विरोधी कोनी नाहीं असे मात्र समजु नये. हिला विवेकजन्य ज्ञानच विरोधी आहे या गोष्टीचा अनुभव तत्त्वज्ञान्याच्याठायीं पहावा ॥३२॥

अविद्येनें वेष्टिलेल्याकुटस्थावर स्थुल आणि सुक्ष्म या दोन देहांनी युक्त असा चिदाभास शिंपीवरील रुप्याप्रमाणें केवळ भ्रमानें दिसतो यालाच विक्षेपाध्यास म्हणतात ॥३३॥

आरोपीति रजतावर ज्याप्रमाणें शुक्तेचा इंदं अंश आणि सत्यत्व दिसुन येतें त्याप्रमाणें आरोपित चिदाभासावरकुटस्थाचेठायीं असणारीं स्वयंत्व आणि वस्तुत्व हीं दोन दिसुन येतात ॥३४॥

शिंपाची निळा पाठ आणि त्रिकोण आकृति ही जशीं शिंपींच्याठायीं आच्छादीत असतात त्याप्रमाणें कुटस्थाचे असंगत्व आणि आनंदरुपता हे गुण त्याचेठायीं झांकलें जातात ॥३५॥

तसेंच ज्याप्रमाणें दृष्टांतामध्यें आरोपितास रुपें हें नांव पडलें त्याप्रमाणें कुटस्थचेष्ठायां अध्यस्त जो विक्षेपरुप चिदाभास त्याला अहं अमें नांव पडेल ॥३६॥

दृष्टांतामध्यें शुक्तिशकल प्रत्यक्ष पहात असुन त्याला मनुष्य रुपें असं म्हणतो त्याचप्रमाणे दाष्तातिकामध्यें स्वतःला पहात असुन तो मी मी असे म्हणतो ॥३७॥

दृष्टांतांत इदंता आणि रुप्यता या जशा दोन्हीं एक मेकांपासुन भिन्न आहेत, त्याचप्रमाणें दाश्तांतिकांतही स्वयंता आणि अहंता ह्मा दोन्हीं भिन आहेत एक सामान्य आणि दुसरें विशेष हाच दोहोंमधील भेद ॥३८॥

स्वयं शब्दास सामान्यत्व आहे यास उदारण तो देवदत्त स्वतः जातो तुं स्वतःपहातोस आणि मी स्वतः करुं शकत नाहीं. असा लोकंमध्यें बोलण्याचा परिपाठ आहे ॥३९॥

हें रुपें हें वस्त्रे ह्मामध्यें इंदुं असे सामान्य आहे तसें हा मी हा तु या तीनही पुरुषामध्यें स्वयं हे सामान्य आहे ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP