स्पष्ट तर भासतें आणि तिचें कारण तर सांगतां येत नाहीं, तीच माया असें लोक म्हणतात, ती माया गारुडादिकांत सर्वांच्या दृष्टीस पडते ॥१४१॥
हें लक्षण जगालाही कसें लागुं पडतें तें पहा. कारण तेंही स्पष्ट भासुन त्यांची उपपत्ति कांहेंच समजत नाही. याकरितां जग मायामय आहे ही गोष्ट निप्पक्षपातदृष्टीने मनांत आणा ॥१४२॥
आजपर्यंत पंडितनीं या जगाचें निरुपणकरण्यास पुष्कळ प्रयत्न केले. परंतु त्याचें पुढें अज्ञानाचा परिघ शेवटीं भासतोच ॥१४३॥
वरील ह्माणणें ज्यांना खरें वाटत नसेल त्यांणीं आह्मी जे प्रश्न करितों त्यांचे उत्तरें द्यावींत:- वीर्यापासुन देहोंद्रियादिक कशी उप्तन्न होतात ? व पुढें त्यांतचैतन्य प्रवेश कसा होतो ? ॥१४४॥
वीर्याचा हा स्वभावच असें जर म्हणाल तर तेंतुम्हाला कसें समजलें ? अन्वयत्र्यतिरेकाचे योगानें ह्मणिजे जेथें वीर्य तेथें देहादिक आहे; आणि जेथें वीर्यनाहीं तेथें तेही नाहींत यानियमावरुन आम्हांस समजलें, असेंकदाचित उत्तर येईल तरतसा नियम अनुभवास येत नाही. कारण वीर्य हें पुष्कळदां निष्फळ होतें ॥१४५॥
यावर मला कांहीं ठाऊक नाहीं हेंच शेवटचें उत्तर येणार. ह्मणुनच मोठमोठ्यांनीं हें जगगारुड असें ठरविलें ॥१४६॥
काय चमत्कार सांगावा ! गर्भात असणार्या रेताला हातपाय, डोकें असे नानांकुर फुटुन शेवटीं तें चेतना पावतें. नंतर क्रमानें बाल यौवन आणि वृद्ध या दशा मनुष्य अनुभवितो. आणि पाहणें ऐकणे, वास घेणे इत्यादिक क्रिया करुन आला तसा जातो यापेक्षा दुसरें गारुड तें कोणतें? ॥१४७॥
देहाप्रमाणेंच वटबीजादिकांचा विचार करुन पहावा कोणीकडे तें सुक्ष्म बीज, आणि कोणीकडे तो अफाट वृक्ष ! तस्मात ही माया आहे अशा निश्चयांतच समाधान आहे ॥१४८॥
आम्हांला जरी यांचे उत्तर देता आलें नाहीं. तरी तार्किकादिक जे आहेत ते त्यांचे उत्तर देण्यास समर्थ आहे. असें जर ह्माणाला तर हर्ष मिश्रांदिक जे आहेत ते त्यांनाही वादांत हटविणारे आहेत ॥१४९॥
ह्माकरितां खरोखर जें तर्कापलीकडे आहे तेथें तर्काची योजना कधीहीं करु नयें. हें जग असें आहे कीं, त्याजविषयें बुद्धिच्या तर्क कांहींच चालत नाहीं. मग उगीच बडबड करण्यांत काय अर्थ आहे ? ॥१५०॥
ही जगाची गोष्ट झाली. परंतु मायेचा संबंध येथे काय आला ? असे जर म्हणाल तर अचिंत्य रचना शक्तिरुप जें जगाचें कारण तीच माया. हें माया बीज सुषुप्तीमध्ये प्रत्ययास येतें ॥१५१॥
त्या कारणांत जागृत्स्वप्न रुप जें जग, तें बीजांत जसा वृक्ष लीन होतो त्याप्रमानें लीन होतें. त्या करितां सर्व जगाच्या वासना त्या करण्यांत आहेत असें ह्मटलें पाहिजे ॥१५२॥
त्या बुद्धिच्या वासनांमध्यें चैतन्यांचें प्रतिबिंब पडतें येथें अभ्राकाशाप्रमाणे अस्पष्ट चिदाभासाचें अनुमान येतें ॥१५३॥
तें मायारुप बीज बुद्धीच्या रुपानें प्रतिबिंब घेऊनच उदयास येतें. याकरितां बुद्धिच्याठायीं चिदाभास स्पष्ट दिसते ॥१५४॥
म्हणुनच श्रुतीत असें सांगितले आहे कीं, माया ही प्रतिबिंबाच्या योगानें जीव आणि ईश यांस करिते. जलाकाश व मेघाकाशाप्रमाणे त्यांचा भेद समजावा ॥१५५॥
येथे मेघाप्रमाणे माया. तुषाराप्रमाणें घीवामना आणि तुषारांत असलेल्या आकाशाप्रमाणे चिदाभास समजावा ॥१५६॥
माया ज्याच्या आधीन आहे त्यालाच श्रुतीमध्ये मायी अंतर्यामी सर्वज्ञ आणि जगद्योनि असेंनांवदिलें आहे ॥१५७॥
ह्माप्रमाणें सुषुप्तीसंबंधीं जो आनंदमय कोश तर इश्वर असे श्रुतीने सांगितलें वेदोक्त इश्वर हाच ॥१५८॥
हा ईश्वर मानला तर त्याचे ठायीं सर्वज्ञत्वदि गुण कसे आले अशी शंका नको. कारण श्रुतीचा अर्थ तर्कास योग्य नाही. आणि मायेचेठायीं सर्व संभव आहे ॥१५९॥
ईश्वर जी सृष्टी उप्तन्न करितो ती अन्यथा करण्यास कोणीसमर्थ नाहीं म्हणुन याला सर्वेश्वर असें म्हनतात ॥१६०॥