ह्मा प्रकारें अंतर्यामीपासुन स्थावारापर्यंत सर्व पदार्थास ईश्वर मानणारे लोका आहेत. कित्येक लोकांचे अश्वत्थ, कित्येकांचें रुईचेंअ झाड, कित्येकांचे वेळु हें कुलदैवत असलेलें जगांत आढळतें ॥१२१॥
तत्त्वचा निश्वय करण्याचे हेतुनें न्याय आणि आगम यांच्या आधाराने तत्त्ववेश्यांनी ईश्वराविषयां सिद्धांत एकच ठरविला आहे; तो एथें स्पष्ट सांगतों ॥१२२॥
माया हीच प्रकृति ( जगाचें उपादान कारण ) आहे. आणी ही मायोपाधि ज्याणें धारण केली आहे तोच परमेस्वर ( जगाचें निमित्त कारण ) होय. आणि याच्या अंशरुपानें सर्व जग व्यापुन गेलें आहे ॥१२३॥
या श्रुतीच्या आधारानें ईश्वराविषयीं निर्णय करणें योग्य आहे असं केल्यानें स्थावरापर्यंत इश्वर मानणारांपैकी कोणाच्याही मतास विरोध येत नाही ॥१२४॥
ही माया तमोरुप ( जड ) आहे असं तापनीय उपनिषदांत सांगितलें आहे.याविषयीं अनुमुति प्रमाण आहे असं स्वतः श्रुतीच म्हणतें. ॥१२५॥
'जडे मोहात्म्का तच्च " ( तें मायारुप जड आणि मोहात्मक आहे ) असें श्रुति अनुभवास आणिते. तें बाळगोपाळांच्या अनुभवासा आल्यामुळे ती अनंतही आहे असें श्रुति ह्मणते ॥१२६॥
घटादिक अचेतन पदार्थाचें जें स्वरुप तें जड असे समजावें आणि जेथें बुद्धि कुंठीत होत तोच मोह असें लोक म्हाणतात ॥१२७॥
याप्रमाणें लौकिक दृष्टया हें मायांरुप सार्वांच्या अनुभवास येतें . परंतु युक्तीने पाहिलें असतां "नो सदा सोत" या श्रुतीवरुन तें अनिर्वाच्या आहे असें ठरतें ह्मणजे तें आहे असेंही ह्मणतां येत नाहीं. व नाहीं असेंही ह्मणता येत नाही. ॥१२८॥
तें भासतें ह्मणुन नाहीं ह्मणतां येत नाहीं व बाधित होतें ह्मणुन आहे असेंही ह्मणतां येत नाही ह्मणुन ज्ञानदृष्टीनें या मायेंचें रुप तृच्छ आहे असें श्रुतीनें सांगितलें कारण त्याला नेहमीं निवृत्ति ( नाश ) आहे ॥२९॥
याप्रकारें करुन श्रृति युक्ति आणी लौकिक या तीन दृष्टीनी मायेंचें रुप तीन प्रकारचें आहे. ह्मणजे श्रुतीनें ती तुच्छ, युक्तीनें ती अनिर्वाच्य आणि व्यवहारदृष्टीनें ती खरी ॥१३०॥
ज्याप्रमाणें चित्रपट गुंडाळण्यानें व तो पसरण्यानें चित्रानें नसणें व असणें अनुभवाला येतें. त्याप्रमाणें मायेमुले जगाचें असणें व नेमणें घडतें ॥३१॥
ब्रह्मावांचुन मायेची प्रतीति नाहीं म्हणुन हिला स्वतंत्र म्हणता येत नाही बरे असें जर म्हणावें तर असंग जें ब्रह्मा त्याला हिणें संसंग केलें म्हणुन परतंत्रही म्हणता येत नाही. ॥३२॥
असंगाची अन्यथा क्रुति कोणती म्हणाल तर कूटस्थ असंग जो आत्मा त्याला तिनें जगाचेंरुप आणिलें; आणि चिदाभासरुपानें जीव आणि ईश यांना तिनेंच निर्माण केलें ॥३३॥
एवढें जग करुनही तिचा कूटस्थास लवमात्र संपर्क नाहीं मायेचा स्वभावच दुर्घट रचनेचा आहे मग तिच्या या कृतीमध्यें नवल तें काय ? ॥३४॥
ज्याप्रमाणें उदकाचा स्वभाव द्रवत्व अग्रीचा स्वभाव उष्णता, आणि दगडाचा स्वभाव काठिण्य त्याप्रमाणें दुर्घटत्व हा मायेचा स्वभावच आहे. स्वभावास दुसरें प्रमाण लागत नाहीं ॥३५॥
जोंपर्यंत लोकांनी तिचा स्वभावजाणला नाहीं तोंपर्यंत तिचा चमत्कार त्यांस वाटतो. नंतर ही माया आहे असें समजलें कीं तत्काळ समाधान होतें ॥३६॥
सृष्टिसंबंधीं शंका, जगाला खरें मानणारे जे नैय्यायिक आहेत त्यांच्यामध्यें मात्र पुष्कळ चालतात. मायावाद्यापुढें त्यांची लटपट चालत नाही. कारण त्याचें मतेंमायेचें रुप शंकात्मकच आहे. ॥३७॥
शंकारुपी माया आहे असें आम्हीं म्हटलें. त्याजवरही जर कोनी शंका घेईल तर त्यांचे शंकेवर पुनः आम्हीं शंका घतो .म्हनुन शंकेवर शंका घेणें हें योग्य नव्हे .तर शंका घेतल्यावर तिचें निवारणच केलें पाहिजे ॥३८॥
केवळ विस्मयाचीच पुतळी अशी जी माया तिचें रुप शंकामय असल्यामुळे तिचा परिहार काय आहे याचा शोध करण्याविषयीं पंदितांनी प्रयत्न करावा ॥३९॥
ही मायाच आहे असें जर तुमचें मनांत समजावयांचें आहे तर लोकप्रसिद्ध मायेंचे लक्षण समजुन घेतलें म्हणजे झाले ॥१४०॥