"महतः परमव्यक्त" हेंप्रमाण प्रकृतीविषयीं आणि "असंगोहि " हें प्रमाण पुरुषाविषयीं श्रुतीत आहे ॥१०१॥
चैतन्याजवळ प्रवृत्त झालेली जी प्रकृति तिचे नियमन करणारा जो त्यास योगी ईश्वर असें म्हणतात तो परमेश्वर जीवापासुन भिन्न आहे असें श्रुतींत आहे ॥२॥
प्रधान ( प्रकृति ) व क्षेत्रज्ञ ( जीव ) यांचा पति आणि त्रिगुणांचा ईश अशी श्रुति आहे. याप्रमाणेंच आरण्यक उपनिषदांत अंतर्यामींचे उपपादन केलें आहे ॥३॥
याविषयींही वादी आपापल्या युक्ति लढवुन कलह करतात, आणि आपला पक्ष दृढ, करण्याकरितां यथामति श्रुतिवाक्येंही दाखवितात. ॥४॥
अविद्यादिक क्लेशकर्माचीं फळें व कर्मांचे संस्कार यांचा ज्याला स्पर्श मुळींच नाहीं असा जो पुरुषविश्ष त्याला ईश असें म्हणतात. तो जीवात्म्याप्रमणे असंग आणि चिद्रुप आहे. असें पंतजलि म्हणतात ॥५॥
तथापि हा एक विशेष पुरुष आहे असं श्रुतीनें सांगितलें म्हणुन त्याला नियंतृता असली पाहिजे. कारण तसें जर न घेतलें तर बंधमोक्षांची व्यवस्था होनार नाहीं ॥६॥
"भी षास्मात " इत्यादिक श्रुतीमध्यें असंग परमात्म्याला नियंतृत्व सांगितले आहे आणि ईश्वर असंग असल्यामुळे क्लेशादिकांचा संभव नाही. यावरुन ते श्रुतिप्रमाण युक्तही दिसतें ॥७॥
तर जीवही असंग आहे म्हणुन त्यालाही क्लेशादिक नसावेत असें जर कोनी म्हणेल तर जीवांना तत्त्वज्ञान नसल्यामुळे क्लेशादिक होतात, असें पूर्वीच सांगितलें आहे. ॥८॥
नित्यज्ञान, नित्यप्रयत्न इत्यादिक गुण ईश्वराला आहेत म्हणुन तो असंग नव्हे, कारण असंगाला नियंतृत्व अयोग्य आहे असें तार्किक मानतात ॥९॥
त्यांचें म्हणणें असें; याला नित्य गुण असल्यामुळे विशेष पुरुष म्हणुन जें वर म्हटलें तेंही योग्य आहे. सत्यकाम सत्यसंकल्प असें श्रुतींत प्रमाण आहेच ॥११०॥
ईश्वराचें ज्ञानादि गुण जर नित्य मानले तर सदा सृष्टीच होईल म्हणुन लिंगदेहाने संयुक्त असा हिरण्यगर्भच आमचा ईश असें कित्येक म्हणतात ॥११॥
उद्गीथ ब्राह्मणांत हिरण्यगर्भाचें माहात्म्य विस्तारेंकरुन सांगितलें आहे लिंग शरीर असल्यामुळे त्याला जीवत्व येईल अशी शंका नको. कारण अविद्येमुळे होणारीं कर्मे तीं त्याला संभवत नाहीत ॥१२॥
आतां दुसरें मत स्थुळ देहावोंचुन लिम्गदेह कोठेंच दिसत नाहीं. याकरितां सर्वत्र मस्तकें धारण करणारा असा जो विराट पुरुष तोच इश्वर ॥१३॥
ते विराडुपासक आपल्या मतास "सहस्त्रशीर्षा" "विश्वतश्वक्षु" इत्यादिक प्रमाणें देतात ॥१४॥
जिकडुनतिकडुन हातपाय ज्याला आहेत तो ईश्वर असें मानल्यास कित्येक किड्यांना देखील ईश्वर म्हणावें लागेल. म्हणुन चतुर्मुख जो ब्रह्मादेव तो ईश्वरः त्यावांचुन दुसरा पुरुष इश्वर नाहीं ॥१५॥
हें मत जे लोक पुत्राकरितां उपासना करिताते त्यांचें होय "प्रजापतिः प्रजाः असृजतः" इत्यादिक श्रुतीच हे लोक प्रमणास देतात ॥१६॥
ब्रह्मादेव विष्णुच्या नामिकमलापासुन उप्तन्न झाला आहे, म्हणुन भागवतजन विष्णुच ईश्वर असें म्हणतात ॥१७॥
शंकराचे पाय शोधण्यास विष्णु समर्थ झाला नाही. म्हनुन शिवच ईश्वर होय विष्णु नव्हें; असें आगमाला मुख्य मानणारे शैव ते म्हणतात ॥१८॥
त्या शिवानेंही त्रिपुराचा नाश करन्याकरतां विघ्नेशाची पूजा केली म्हणुन गाणपत्य मताला अनुसरणारे विनायकालाच ईश्वर म्हणतात ॥१९॥
ह्माप्रकारें दुसरे, आपापलींमतें,अभिमानानेंनिरनिराळे मंत्र,अर्थवाद आणि कल्पना यांच्या आधाराने प्रतिपादन करितात. ॥१२०॥