चित्रदीप - श्लोक ४१ ते ६०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


बरें अहंपणा आणि स्वयंपणा यांमध्यें भेद ठरला; पण त्याचा कुटस्थाशीं काय संबंध ? तर येथें जोस्वयंशब्दाचा अर्थ तो आमचा कुटस्थ ॥४१॥

आतां कोनी म्हणेल स्वयं शब्दांचा अर्थ दुसरी नव्हें असाहोतो तर त्याजवर आमचें असें म्हणनें आहे कीं स्वयं शब्दाप्रमाणें आम्यालाही अन्यावारकत्व येतें आतां कुटस्थ आणि आत्मा हे दोन्हीं ज्याआर्थीं आमच्या मतेंएकच आहेत त्याआधीं तो अर्थ आह्मांस इष्टच आहे ॥४२॥

स्वयं आणि आत्मा हे दोन शब्द एकार्थक आहेत म्हणुनच लोकांमध्यें त्याचा एकत्र प्रयोग आढळत नाहीं त्याकरतां "स्वयं" या शब्दाचा अर्थ जसा अन्य वारक होतो तसा आत्माशब्दाचाही होतो ॥४३॥

"घट स्वतः जानत नाही" इत्यादे प्रयोगावरुन घतादिक अचेत पदार्थास देखील स्वयं शब्द लागतो अशीं शंका कोनी घेईलं तरी तीही आम्हांला विरुद्ध नाहीं कारण अत्म्यांची व्यक्ति स्फुरणरुपनि सर्वत्र असल्यामुळे स्वयंशब्द घटादिकांस लागणेंहें योग्यच आहे ॥४४॥

साचेतन आणि अचेतन हा भेद आत्म्यामुळे झालेले नाहीं म्हणजे अमुक पदार्थात आत्मा आसला म्हणजे त्यास सचेतन म्हणावे व अमुकांत तो नसला म्हणजे त्याला अचेतन म्हणावें असेंकांही नाही. आत्मा सर्वव्यापक असल्यामुळे आत्म्याचें असणें नसणें हेंच मुळीं अशक्य आहे म्हणुनच वरील भेद बुद्धिप्रतिबिंबित चिदाभासामुळेंच झाला आहे. म्हणजे सजीव प्राण्याला अंतःकरण असतें त्या अंतःकरणात जेंआत्म्यांचें प्रतिबिं तोच चिदाभासः तो जड पदार्थात नाही. म्हणुन त्या वे असण्या नसण्यावर चेतनाचेतन भेद अवलंबुन असतो ॥४५॥

आत्मा सचेतन आणि अचेतन या दोनही कल्पनांस आधार आहे. ज्याप्रमाणें चिदाभास कुतस्थावर भ्रांतेने कल्पिलेला आहे त्याप्रमाणें घतादिक अचेतन पदार्थाही कुटस्थावरच कल्पिलेले आहेत. दोन्हींचेंही अधिष्ठान तोच आहे ॥४६॥

येथे अशी एका शंका आहे कीं तु मी इत्यादिक पुरुषामध्यें स्वशब्द जसा सामान्य आहे तसेच तत्ता आणि इदंता हे शब्दाही सामान्यत्वेकरुन लागतात तेव्हा स्वयंशब्दाप्रमानें यालाही आत्मत्व येईल ॥४७॥

तर त्याचें समाधान हेंच कीं तत्ता व इदंता हे शब्द अहमादिकांचीं जशीं विशेषणें आहेत तशी आत्मत्वाचीहीं विशेषणेंअ आहेत म्हणुन बरें, वाईट या विशेषणांस जसें आत्मत्व येत नाहीं यांसहीं येत नाहीं ॥४८॥

( तुं मी ) ( तें हें ) ( आपण दुसरा ) ही शब्दयुग्में परस्पर विरुद्धार्थी आहेत असें लोकांत प्रसिद्ध आहे यांत संशय नाहीं ॥४९॥

अन्यतेचा प्रतियोगी जो स्वयं शब्द तो कुटस्थावाची असें समजावें त्या कुटस्थ आत्म्यावर तुं या शब्दांचा प्रतियोगी जो मी शब्द तो कल्पिलेला आहे ॥५०॥

इदंता आणि रुप्यता यांमध्ये जसा भेद स्पष्ट आहे तसाच अहंता आणि स्वत्व यांमध्येंही आहे असें असुनही मनुष्य भ्रमामुळे ते एकच मानितो ॥५१॥

असे जें जीवकटस्थाचें ऐक्य मानणें यालाच तादात्म्याध्यास म्हणतात तो पुर्वोक्त अविद्येपासुन होतो. त्या अविद्येची निवृत्ति झाली असतां तिचें कार्य ही नाहीसे होते ॥५२॥

अविद्येपासुन होणारें आवरण आणि तादात्मा ही विद्येंचे योगाने नाश पावतात परंतु विक्षेपाचें होनारें आवरण आणि तादाम्य ही विद्येंचे योगाने नाश पावतात परंतु विक्षेपाचें स्वरुप मात्र प्रारब्धक्षयापर्यंत असतें ॥५३॥

उपादान कारणाचा नाश झाला तरी त्याचें कार्य क्षणभर राहतें असें नैयायिकांचें मत अहे त्यांचा स्वीकार आम्ही कां करुं नये ॥५४॥

आतां कोणी म्हणेल कीं, तार्किकाच्यां मतींकार्य क्षणभर रहातें असें आहे. परंतु विक्षेपरुप कार्य वर्षानुवर्ष रहातें हें कसें ? तार ह्माचें उत्तर हेंच कीं दिवसांच्या प्रमाणानें त्यांनी क्षण सांगितल; परंतु आमची भ्रांति असंख्य कल्पापासुन चालत आल्यामुळे येथें वर्षानुवर्ष हाच क्षण आहे ॥५५॥

येवढ्यावरुन तार्किकांचें व आमचें मत एकच असें मात्र समजुं नये. कारण तार्किक केवळ युक्तिवरच अवलंबुन पाहिजे तसा तर्क करितात तशी आमची गोष्ट नाही श्रुति युक्ति आणि अनुभव ह्मा तिन्हीवरुन सिद्धांत करणारास काय भीति आहे ॥५६॥

आतां हा तार्किकांशी वाद पुरे एकंदरांत कुटस्थवाची स्वयंशब्द आणि त्याजवर दिसणारा जो अहंशब्द या दोन्हींचें एकत्व अज्ञानी मानतात असें ठरलें ॥५७॥

असें असुन ही भ्रांति आहे असे लोकांस कां समजत नाहीं ? असें जर म्हणाल तर यांचे कारण हेंच की, मोठमोठे पंडित म्हणविणारे केवळ युक्ति लढवुन मुर्खपणाने श्रुतींचा अनादर करुन भ्रांतित पडतात ॥५८॥

ते शास्त्राचा पुर्वापर संबंध मनांत न आणुन वाक्यचि वरवर दिसणारे अर्थ आपापले यक्ष सिद्ध करण्याकरितां निर्लज्जपणानें योजितात ॥५९॥

कूटस्थापासुन स्थुल शरीरार्पंत जो एक सगळा समुदाय त्यालाच लोकायत आणि पामर ( अज्ञानी ) हे आत्मा असें मानतात. कारण प्रत्यक्ष तेवढें खरें असें त्यांना वाटतें ॥६०॥

N/A


References : N/A
Last Updated : March 18, 2010