|
न. ( समुच्चयार्थी ) बीजें ; ( भाजी , गवत इ० चें ) रोपें . पेरावयासाठीं राखून ठेवलेलें धान्य . पेर्याचें बीज , बियाणें . म्ह० बीं तसा अंकुर . ( कों . ) बीं तसें भात . बिया , दाणे , क्षुद्र फळें , आठळ्या , मुळें , कलमें , पानें इ० उत्पादनाचें मूळ म्हणून मानलेली कोणतीहि वस्तु . कापसासारखे ढग ; कसर ; खार ( क्रि० निघणें ; विरणें ; वाहणें ). [ सं . बीज ; प्रा . बीअ ; हिं . बीया ] ०फेंकणें बीं फेंकून पेरणी करणें . ०दाणा - पेरलेलें बीं न उगवणें ; फार पाऊस पडून जमीनीस गारठा आला असतां पेरलेलें बीं गारठून न उगवणें . शिळटणें - पेरलेलें बीं न उगवणें ; फार पाऊस पडून जमीनीस गारठा आला असतां पेरलेलें बीं गारठून न उगवणें . ०बियाणें बिरवण बेणें ब्याणें भरण भरणा - नपु . पेरण्यासाठीं किंवा रोपे लावण्यासाठीं राखून ठेविलेलीं बीजें , मुळें , कांदे , कलमें इ० ( समुच्चयानें ) ०बिंवळा पु. बीं बियाणें . यंदा शेतभात कांहीं करणार होतों , परंतु बींबिवळा कोठें मिळेना म्हणून सोडलें . मुडी ; बिंवळा अर्थ ३ पहा . ०बुडी बूड - स्त्री . पीक बुडणें ; अजीबाद बियापुरेसेंहि न पिकणें . नाश पावणें . ( ल . ) नायनाट ; उच्छेद ; कुलक्षय . तुका म्हणे जरी योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं । - तुगा २७२७ . [ बीं + बुडणें ] ०बेवळा पु. बी बियाणें . बीबिंवळा पहा . बी - बेवळा उसनापासना आणावा आन कष्टांत मरावं . - खेया १३ . ०भरण न. पेरणी . गर्भाधान ; संग . होईल कधीं बीभरण । आठवीन चरण । - प्रला २१८ .
|