|
न. स्त्री. द्वितीया ; शुक्ल किंवा कृष्णपक्षांतील दुसरी तिथि . भाऊबीज . बीजेपासून चढत्या कला । - रावि १ . ३७ . [ सं . द्वितीया ; प्रा . बीइज्ज , बिज्जय ; गु . बीजू ] स्त्री. बीजक पहा . माल पुरविलेली असेल त्याची किंमत यादी ; पट्टी . ' पो मारी गोसावी याची सावुकारी बीज नगदी वगैरे येणें आहे .' - रा १० . ५९८ . बी ; फळाच्या आंतील कठीण भाग . धान्यादिकांचें बीं . मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें । - ज्ञा ९ . ३६ . शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं । - तुगा २२७२ . बीज तैसें फळ येत असे गोड । - ब १२३ . २ . खाण ; कुल ; बिजवट बी . पुरुषाचें वीर्य ; रेत . कारणीभूत किंवा मूळ मुद्दा ; गोष्ट , क्रिया , मूल ; कारण ; उगम ; आधार ; निमित्त . दर्शना बीजें तेथें । जाणीव आणी । - अमृ ७ . ११९ . खोल हेतु ; भाव ; इंगित ; वर्म ; अभिप्राय ; गूढार्थ . हे तुम्ही म्हणतां ह्यांत बीज काय ! नातरी अर्जुना हें बीज । पुढति सांगिजेल तुज । - ज्ञा ९ . ३४ . संख्या किंवा परिमाणें यांबद्दल अक्षरें योजून करावयाचें गणित ; बीजगणित . गूढमंत्राक्षर . परी म्यां अभ्यासिला जो सबीज । तो स्वामी ऐकावा । - जै ६३ . १७ . [ सं . ] म्ह० यथा बीज तथा अंकुर = बीज तसा अंकुर ; झाड तसें फळ . भ्रष्ट किंवा भर्जित बीज - अंकुरत नाहीं , भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं , भाजलें बीज उगवत नाहीं , भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं - निष्काम , निस्स्वार्थी , निवळ अध्यात्मिक , ईशप्रीति प्रेरित अशा कृत्यांना फळ येत नाहीं म्हणजे पुढल्या जन्मीं मिळणारें चांगलें वाईट फळ येत नाहीं . त्यांच्या कर्त्याला श्रेष्ठ सुख जो मोक्ष तोच प्राप्त होतो . सामाशब्द - कणिका - स्त्री . लहान बीज . सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे । - ज्ञा ९ . ४१० . ०कोश बीजाशय - पु . फुलांतील एक भाग ; बीजाची पिशवी . [ बीज + कोश , आशय = सांठा ] ०गणित न. गणिताचा एक प्रकार ; अव्यक्त गणित ; बीज अर्थ ७ पहा . ( इं . ) आलजेब्रा . ०गर्भ वि. स्वाभाविक ; प्रकृतिज . बीजगर्भ गुण अर्थात आपल्यामध्यें संक्रांत होतात . - नीति ३२१ . ०बेंदूर पु. शूद्रांचे विधी ; उत्सव ; चाली संप्रदाय इ० समुच्चयानें ( क्रि० करणें ) आपण आपले कुणबी आपणांस आपला बीजबेंदूरच बरा . शेंदूर , गूळ ; बैलांचीं चित्रें , फुलांच्या माळा इ० चे नजराणे शेतकरी लोक पाटील , कुळकर्णी , देशमुख इ० ना देतात तो . [ बीज आणि बेंदूर हे दोन सण ] ०भरण न. बीं भरण पहा ०भाव पु. बीजरुप अव्यक्त . जयासी कां बीज भावो । वेदांतीं केला ऐसा आवो । - ज्ञा १५ . ५१२ . ०मंत्र पु. ( महानु . ) जादूटोणा ; मंत्रतंत्र . जिए कामाचेनि बीजमंत्रे । फीटेति ना । - शिशु ८०१ . मूलमंत्र . ०मार वि. पेरलेल्या बीजाइतकेंसुद्धां धान्य देत नाहीं अशी ( जमीन ). [ बीज + मारणें ] ०मुद्रा स्त्री. बीजाचा आकार ; बीजाकार . कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु । - ज्ञा १३ . ९५ . ०वर्म न. मुख्य गोष्ट ; रहस्य . ०संस्कार पु. एखाद्या प्राचीन सर्वमान्य ग्रंथादिकांत उणा किंवा अधिक फरक करणें . त्यानें पूर्वीच्या ग्रंथांत सुधारणा केली आहे ; ही सुधारणा कोठें स्वतंत्र रुपानें दिली आहे व कोठें बीजसंस्काराच्या रुपानें सांगितली आहे . - टि ४ . ४२२ . बीजांकित वि . बीजाक्षरानें अंकित , लांछित , परिवेष्टित . रामनाम बीजांकित । [ सं . बीज + अंकित ] बीजांकुरन्याय पु . परस्परांत असलेला कार्यकारणसंबंध ; जसें - बीजापासून अंकुराची उत्पत्ति आणि अंकुरापासून बीजाची उत्पत्ति . आधीं झाड कां बी . याप्रमाणें दोन परस्पर संबद्ध गोष्टींची कालानुपूर्वता ठरवितां येत नाहीं तेव्हां दृष्टांत देतात . अभिमानी जो विश्वांस । तो चतुराननाचा अंश । त्यासीं ऐक्य मानी हा विश्वास । बीजांकुरन्यायें । जसें बी तसें फळ ; जसें कर्म तसा परिणाम . [ बीज + अंकुर + न्याय ] बीजांकुरभाव - पु . बीजाची अंकुरावस्था . घन - अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । - ज्ञा १५ . ८९ . [ बीज + अंकुर + भाव ] बीजारोप , रोपण - पुन . बीज पेरणें . कोणत्याहि कार्याचें किंवा परिणामफलाचें मूळ घालून ठेवणें . करी राम कथा बीजारोपण । - रावि १ . [ सं . बीज + आरोप , आरोपण ] बीजाक्षर - पु . मूळाक्षर . मंत्राक्षर ; मंत्राचें आद्याक्षर . बीज अर्थ ६ पहा . [ बीज + अक्षर ] बीजिका - स्त्री . बीज ; बी . जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचाची भूमिका । - ज्ञा १५ . ८२ .
|